गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३५*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३५*

         अमरेली आठे सत्कार समारंभ मजार बोलतांना वाईट चालीरिती आपीन झटकी देवाले जोयजेत आस महाराजस्नी आवरजीसन सांग. तव्हय त्या बोलणात, "आप्ला धर्मग्रंथस मजार जर काही चुकीन्या गोष्टी दिसण्यात त्या गोष्टी काढानी आपीन हिंमत दाखाडाले जोयजे. बराज दिनफाईन चालत येल रितीरिवाजस्मा काही हानीकारक गोष्टी व्हतीन त्या सोडाले जोयजेत. सदविवेक बुध्दीना इचार करीसन काही चांगल्या गोष्टी पदरमजार पाडाले जोयजेत. पण नुसता देखावा म्हनीसन काही गोष्टी चुकीन्या येत असतीन त्या टायाले जोयजेत. आस जर तर तरच आपीन ह्या शर्यतना जमाना मजार तग धरसुत. बाईस्ले सिक्सन देव्हानी गरज शे. पण पाश्चात्य देशस्माजसा बाया माणस्ना स्वातंत्र्यना नाववर आतिरेक व्हस तो आप्ला नही व्हवाले जोयजे. तेन्ही आपीन कायजी लेवानी गरज शे. बाईस्ले माणस्ना इतलज स्वातंत्र्य मियाले जोयजे, तेन्हा करता आपीन प्रयत्न कराले जोयजे. बाईस्ना आंगे जे सामर्थ्य शे ते आप्ल कोणज ध्यानमा येत नही. माणस्नी आपला जोये जी शक्ती शे ती बाईस्ना सुख मजार भर टाकाकरता खर्च कराले जोयजे. त्यामुये त्या वर्गाले समानता प्राप्त व्हयीन आशी मन्ही समज शे.

               "व्यक्ती आणि समाज येस्ना येरमेरशी घट्ट संबंध शेत, नी त्या येरायेरवर आवलंबी शेत. व्यक्कीना इकास म्हायीन समाजना इकास घडायी आणता यीन. पण हाऊ इकास कायदा करीसन नही व्हवाव. तेन्हा करता लोकस्ना मन वयाळान, तेस्ले एखादी गोट पटायी देवान आणि तेस्नी बठ्ठी समाजशक्तीनी पातयी उंचावन हाऊज खरा रस्ता शे. जेस्ले समानता जोयजे तेस्नी सोता समानता आचरण मजार आणाले जोयजे. नुस्त्या तोंडन्या वाफा वाया घाला पेक्षा येवाया वायबार घाला पेक्षा आशी सुधारणा घडायी आणाकरता प्रत्यक्ष कृती करेल माल्हे आवडस. "

        बडोदा मजार सयाजीविहार क्लब उघाडा. तेन्हा उद्घाटनना येल्हे धाकल्ला संस्थानस्ना समाजजीवन मजार कस महत्व ह्रास हायी सांगतांना महाराज बोलणात," आश्या सामाजिक संस्थास्ना मुख्य उपयोग समाजमा प्रेमय विचारविनिमय नी परस्पर स्नेहसंबंध पयदा व्हावा हाऊ शे, तठला सभासद या क्लब मजार यीन तव्हय आप्ला वायबार मनोविकार ठिसन नी तठींग बाहेर जायीन तव्हय मजारल प्रेमय इचार लीसन जातीन आशी आस शे."

             महाराज सोता आप्ली गुजराथी जनतामा गयरा प्रिय व्हतात. कारण तेस्नी गुजराथी, मराठा, बामण आसा कोणताबा भेदभाव तेस्ना धोरनस्मा येवु दिन्हा नहीत. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टी इतल्या आदरणीय व्हत्यात की, तेन्हामुये महाराजस्नाकडे बठ्ठास्नी आत्मियता मजारच दख सुवर्ण महोत्सवस्ना समारंभ मजार न्यारा न्यारा जातना लोकस्नीज इचार व्यक्त करात. पारशी समाजना मानपान पत्रा मजार लिखेल व्हत..

   "महाराज, आपण आमच्या लहानशा जातीचे रक्षक आहा."

अंजुमन - इस्लामना मानपान ना पत्रा मजार म्हणेल व्हत...

"जो हक थे रयते सुन्निके, कुछ तो दिये है, कुछ दवोगे /

सबपर है निगा महाराजाकी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह //"

                 आसा सब्देस्मा आप्ले महाराजस्नी समानता मजार वागामुये महाराजस्ना आभार मानात. उत्तर देतांना भाषणमजार महाराज बोलणात, "आप्ला मजार दिसणारा धर्मना मी जातना कितला बी फरक ह्रायन्हा तरी आप्ली संकुचित जातनी नजर टाकी देव्हानी गरज शे. आप्ल्या गंजलागेल चालीरितीस्ना त्याग करीसन आप्लामदारला उपयुक्त रिवादस्ना जतन कराले जोयजे. परकी संस्कृतीमदारला चांगला भागस्ना आपीन जरूर आनुकरन करा. आस कर ते आप्ल कल्याण नी आप्ली प्रगती नक्की व्हयीन. "

              सयाजीरावस्ले ज्या वातावरण मजार आणि ज्या काय मजार सामाजिक सुधारणा करण्या व्हत्यात तेन्ह एक गंमतन उदाहरण - बडोदाले पयला सावा आगीनगाडी सुरु झायी तवयस्नी गोट शे. बडोदा मजारला, नी आजुबाजुना खेजास्ना बामण लोक नवलकरत आगीनगाडी दखाले येल व्हतात हायी गोट सनातनी बामनस्ले सहीन झाय नही. त्या ज्या यवनस्नी आगीनगाडी दखाले जायेल बामण व्हतात तेस्ले जात बाहेर काढी दिन्ह. ह्या उदाहरणवरथाईन महाराजस्न सामाजिक सुधारणास्न कार्य कीतल कठीण व्हत येन्ही कल्पना येस.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...