*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*
*भाग.. ३४*
सोवळापणाना बाबत मजार महाराज आप्ला एक जुना आनुभव तेस्नी एक व्याख्यानमाला मजार सांगा.त्या बोलणात, "मी पयले चांगला लोकस्ले जेवण ले बलाऊ लागनु, त्यायेले मन्हा सामने गयय्रा आडचणी येव्हाले उन्ह्यात. त्याकायले आप्ला लोकस्ना मन मजार गयय्रा खोल समजुती व्हत्यात. आप्ला जातना लोकस्ना संगेबी त्या जेवाले बसेत नही, तयारबी व्हयेत नही. नी बाकीना सामाजिक येवहार ठेवाले बी त्या खालनी पातयी समजेत. ज्या शामियाना मजार जेवणनी येवस्था करेल ह्राहे तेन्हा कपडाना परदा, जेवणन्या खुर्चीस्ना खाले टाकेल सतरंज्या नी टेबलवरना कपडा ह्या गोष्टीस्ले त्या इटाय मानेत. आसा परसंगले जेवणन पक्वान्न आणि वाढन येस्ना बाबत पाहुणास्नी मी समजूतले मान देव्हान काम तेन्ही तजवीज माल्हे करनी पडे. तरी बी मी देल निवतालेबी काही लोकस्ले जातन बंधन मोडाना प्रयत्न नी शक येत ह्राहे. पण ह्या कामले मी चिकाटी धरीसन ठी. मन्ह निवत लेवानं मी कोणलेज जबरदस्ती करी नही. नी मन्हा निवताले नकार दिन्हा तरी मी तुम्हणावर नाराज नही आसा सब्द देवु. लोकस्ना मत जरी माल्हे आवडना नहीत, तरी मी तेस्ना मानपान नी कायजी लेत ह्रावु. आशी जव्हय पंगती व्हयेत तव्हय मी न्यारा न्यारा जातीस्ना न्यारा सयपाक, न्यारी पंगत, न्यारा वाढपी, तेस्ना पान न्यारा मांडानी मी येवस्था करु. जेस्नी इच्छा ह्राहे तेस्ना पाटला खालनी सतरंजी काढी टाकुत. हायी चिकाटी मुये मव्हरे माल्हे यस उन्ह. लोकस्न्या चालीयेल समजुतीस्ना इरुध्द तेस्ले जबरदस्तीन वर्तन कराले भाग पाडन ह्या पध्दतवर मन्हा आजिबात भरोसा नही व्हता. हायी ध्यानमा ठेवा. आतेलगुन मी सक्कीना पेक्षा मन वयावयावानी पद्धतच सदानकदा वापरी. माल्हे वाटस सक्तीना वापर अचीतटीलेच वापराले पाहिजे. बाकीना येल्हे मनपरीवर्तननाज रस्ता परिणामकारक ह्रास. खास करिसन बाकीना आधिकारीस्नी हायी गोट ध्यानमा ठेवानी गरज शे, ".
बडोदा मजार संस्कृत पाठशायना बक्षीस समारंभना पुजाइधीना कारेकम मजार त्या बोलणात," पुजारी लोकस्नी बदलतली परिस्थिती दकीसन आप्ल धोरण बी बदली कराले जोयजे. तेन्हा करता तेस्ले आप्ला कर्तव्यान ग्यान जोयजे. जठे ज्या विधीनी गरज नही त्या अनाठायी इधीस्ले फाटा देव्हानी गरज शे, ते तेस्नी कराले जोयजे. तसज लगीन वयनी मर्यादा, लगीन सोबन ना खर्च, जातपोट जातीस्ना लग्न, परदेस वारी, श्रध्दानी संस्कार, दान नी पध्दत, आखो बाकीन्या गोष्टीस्ना पुजारीस्नी सुक्ष्म इचार करीसन नयी परिस्थितीले धरीसन लोकस्ले आदर्श वाटतीन आश्या पुजाइधी ठेवाले जोयजे, ".
बडोदा मजार मराठा सिक्सनपरिषदनी बैठक भरायेल व्हती. सरदार शंभुसिंहराजे मालेगावकर ह्या अध्यक्ष व्हतात. त्यायेले समाजसुधारणांस्नी उपयुक्तता नी आवश्यकता येन्हा बाबत महाराज मार्गदर्शन करतांना बोलणात," छत्रपती शिवाजी महाराज येस्ना इतिहास वरथाईन गयरा बोध लेव्हा सारख शे. प्राचीन नी आर्वाचीन गोष्टीस्ना इचार करीसन इतिहास ना आर्थ ध्यानमा ठेवाले जोयजे. युरोप मजार मार्टिन ल्युथरना येल्हे धर्म सुधारणा झायी. त्याच येल्हे आप्ला कडे संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास नी आखो गयरा महापुरुषस्नी सामाजिक सुधारणा कयात. तेस्ना इतिहास दखा. छत्रपती शिवाजी महाराजस्न नी त्याकायना साधुपुरुषस्ना इचार संकुचित नही व्हतात. तेस्नी बठ्ठा लोकस्नी उन्नती करता काम कय. तसाच तुम्ही बी बठ्ठा देशवासियांनस्ना करता प्रयत्न कराले पाहिजेत., "
न्या. रानडे, डाॅ भांडारकर नी सार्वजनिक काका येस्नी महाराजस्ले पुणाले'फिमेल हायस्कुलना' वार्षिकउत्सवले अध्यक्ष म्हणीसन बलायेल व्हत. त्यायेले तठली सामाजिक तणावले ध्यानमा ठिसन महाराज बोलणात," बामण, नी मराठा येस्नामा सध्या जी तेढ तयार व्हयेल शे, ती बठ्ठा समाजस्ले गयरी हानीकारक शे. समाजस्ले प्रगतीना रस्तावर लयी जावा करता बठ्ठ्या जास्तीस मजार एकी ह्राव्हाले जोयजे. आणि सुज्ञ लोकस्नी त्या दृष्टीकोन म्हायीन मनापासून प्रयत्न कराले जोयजे.,".
त्याच मुक्काम मजार मराठा पुढारीसनी महाराजस्ले पानसुपारी दिन्ही. त्या येले वरला बठ्ठा पुढारी हाजार व्हतात. तेस्नी महाराजस्ना नेतृत्वामजार मराठा नी बामन कार्यकरतास्नी दिलजमाई घडायी आनी. त्यायेले महाराज फक्त बावीस वरीस्ना व्हतात.
लंडन युनिव्हर्सिटीना मुख्य दिवाणखाना मजार न्यारा न्यारा देशस्ना राजा, इद्वान नी मुत्सद्दी येस्नी जगदुन्यानी शांती करता जागतिक शांतता परिषदन पयल आधिवेसन भरायेल व्हत. त्या समारंभन अध्यक्षस्थान महाराजस्ले देल व्हत. अध्यक्षीय भाषण मजार सामाजिक समतान व्यापक स्वरूप म्हणजे इस्वबंधुत्व हायी तत्व समजाडीसन सांगतांना महाराज बोलणात, "जगमजारला मानवस्ना सामाजिक प्रश्न काही नया नहीत. पण म्हनीसन त्या सोडाले बी सोप्या शेत आस बी नही. तरी बी माल्हे आशी आस शे की, सध्या जागेव्हयेल सद्सद्विवेकबुद्दीनी मदत लीसन बठ्ठास्ना बद्दल पिरीम, सहकार्यांनी भावना पयदा हुयीसन मुख्य प्रश्न सोडाकरता मदत व्हयीन. जदलगुन बठ्ठा मनुष्यजातीना बाबत एकत्वानी नी समतानी भावना आप्ला मजार येणार नही, तदलगुन दुरावा नष्ट व्हनार नही. येन्हा करता जर आप्ला मजारला फरक येरमेरशी न झगडता आपीन समजु शकू नी सहानुभूतीनी एकमत करीसन सहकार्य करसुत तव्हयज ह्या प्रश्न सुटतीन, ".
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा