*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*
*भाग.. ३३*
आंधश्रध्दा नी भोयापणामुये लाखो रुप्या ना जो चुराया खिचडी (तांदुय, दाय) ना व्हये, नी दानधर्म करता वाटाये तो महाराजस्नी बंद कया आणि आयसी, भुकटखाऊ लोकस्नी मिजास बंद कयी. सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन कायदाना सामने बठ्ठा सारखा शेत, हायी तत्व आम्मल मजार आनीसन खरा आर्थ ना सामाजिक न्याय प्रस्थापित कया. धाकल्ला पोरस्ले कारखाना मजार कामले लावान, नी तेस्ले बिडी, तंबाखू इकाले लाव्हन येन्हावर बंदी कयी, नी तसा कायदा कया. तो गुन्हा शे आस बी ठराव. बडोदा संस्थान मजार आफु पेण हाऊ गुन्हा शे आस ठरायीसन गुन्हेगारले सजा व्हवाले लागणी. आफु नी लागवड बी धीरे धीरे बंद करी टाकी.
या काय मजारली आजुन एक सुधारणा म्हणजे 'येडास्ना आश्रम' चालु कया. येन्हा पयले येडास्नाकरता न्यारी आसी सोयज नही व्हती, तेस्ले साधा तुरंगस्मजार कोंडी देत. पण हायी निरदयपन नी पध्दत बंद करीसन १८९६-९७ सालले आसा लोकस्ना करता आरधा लाख रुप्या मोडीसन एक हायली न बांधकाम कये. नी येडास्ना डाॅक्टरस्ना देखरेख मजार तो आश्रम तेस्ना ताबा मजार दिन्हा.
. मुंबईल् 'हिंदु क्लबन' आधिवेशन भरेल व्हत. त्या वखतले महाराजस्ना सत्कार कया व्हता. त्यायेले स्त्री शिक्षणाबद्दलना आप्ला दृष्टीकोन सांगतांना महाराज बोलणात, ", मी आते आतेज जपान, अमेरिका, युरोप नी आखो बराज ठिकाणवर जायेल व्हतु. त्यामुये न्याय्रा न्याय्रा चालीस्नी वयख कराले माल्हे मियनी. बाकीना लोकस्न्या चालीरीतीस्नी वयख करीसन आपीन आप्ली सुधारणा कराले जोयजे. बाईस्ले सिक्सन देव्हाले पाहिजे येन्हा बाबत आते कोठेबी मतभेद दिसणार नहीत. पण ते सिक्सन म्हणजे नुस्ती परिक्षा दिसन पास व्हनआस नही व्हस. बाईस्ले सवसार करान बी सिक्सन देव्हानी गरज शे. आप्ला कारभारीस्ले तिस्नी येसन पासुन दुर कस ठेवता यीन हायी बी तिस्ले शिकाडानी गरज शे. जर घर मजार बाई शिकेल सवरेल ह्रायन्ही ते ती ग्यानना नी घरसुखसमाधानना उज्ज्वल प्रकाश घर मजार पाडाले समर्थ ह्रास. नी आप्ला आजुबाजुना लोकस्ना निर्दय नी आपमतलबी कपट युक्त्यासफाईन जशी फसस तशी फसणार नही. "
युवराज फत्तेसिंहराव येस्ना लगीन सोबन ना निमित्तथाईन युरोपना लोकस्ले पंगत दिन्ही. तव्हस्ना परसंगले बाईस्ले समभावमजार वागाले जोयजे आसी तयमय महाराज येस्नी व्यक्त कयी. त्या बोलणात," आम्हणा हिंदु समाज मजार कितल्या तरी जुन्या रुढीस्ना योग मुये बाया आसा समारंभ मजार मिसयतीस नही, हायी गयरी खद करानी गोट शे. तरीबी बाहेरनी पाश्चिमात्य सिक्सन नी इचार येस्नी प्रगती इकडे जल्दी व्हयी ह्रायन्ही. हायी गयरी आनंद नी गोट शे. बाईस्ले बी माणस्ना इतलच स्वातंत्र मियाले पाहिजे तेन्हा करता आपीन खटाटोप कराले जोयजे. बाया माणस कव्हय ना कव्हय माल्हे एकंदर बशेल भेटतीन आसी माल्हे आशा शे. बाया आप्ला संगे शेत, नी त्या आप्ला परतेक सुकदुक मजार सामिल व्हतीन येन्ही माल्हे आस शे, त्या हरएक काम मजार आप्ला संगे समर्थ शेत हायी आस मी संगे लीसन फिरस. बाईस्ना ज्या कलागुण शेत त्या आप्ला हिंदु समाजमुये उजाया मजार येतीस नही. माणस्नी आप्ला जोये जी ताकद शे ती आपल्या बाईस्ना सुकदुक करता खर्च कराले जोयजे. बाया, माणस हाऊ वर्ग सारखाच समसमान शे आसी मन्ही पक्की समज शे. आम्हना धाकला महाराज आप्ली कारभारीना संगे मायाळुपणी वागणुक करतीन नी तिस्ले उच्च दर्जा न सिक्सन देथीन आसी माल्हे आस शे. महाराजस्ना ह्या पुरोगामी इचार त्या १०० वरीस पयले समारंभ मजार हाजीर व्हयेल बामण, मराठा मंडईस्ले जीरना नसतीन, पण कायना ओघ मजार धीरे धीरे तेस्ना पचनी पडेल ध्यान मजार यीन.
काही समाजस्मा गोषानी गयरी वाईट चाल व्हती. त्यामुये बाईस्न गयर नुकसान व्हयेल शे. गोषा. पध्दत बंद कराना करता सोताना परिवारन्या बाईसपासुन महाराज स्नी सुरवात कयी. महाराणी चिमनाबाई येस्नी धीरे धीरे गोषा पध्दत बंद कयी. त्यामुये महाराजास्वर चांगल्या बी नी वाईट बी टीका झायात. पण टीकास्ले उत्तर देवानी हिंमत तेस्ना मजार व्हती. आप्ले नाव ठेवाबिगर समाज मजार ह्राहता. येत नही, ते गयर कठीण शे. मातर नामी टीका आपीन समजी लेवाले जोयजे. तशी दखल लेव्हाणी गरज शे.
एक समारंभ मजार महाराज बोलणात, "कोणताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक नी धार्मिक आचरणवर आवलंबी ह्रास. ज्या समाज मजार आपसम्हा द्वेष, झगडा चालु शेत तेस्नी प्रगती ना इचार करालेज. नको. जनता मजार येकी नी ग्यान येस्नी जर वाढ झायी ते तेस्ना मांगेमांगे सुराज्य खात्रीमजार यीन आप्ल बठ्ठास्न महान श्रेय हायी शे की हिंदुस्थान मजार एकराष्ट्रीयत्व पयदा करण हायी शे. हायी करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या जोयजेत. नी तश्या त्या व्हवा करता तेस्ना मजार सामाजिक येवहार सुरू व्हवाले पाहिजे. "
सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन तेस्ले कायदा मजार आनीसन बठ्ठा कायदा ना सामने समान शेत हायी तत्त्व आम्मल मजार लयनात. धाकल्ला पोरस्ले कारखाना, नी हाटेल मजार कामले बंदी कयी.
हिंदू समाजनागत जैन लोकस्ना मजार बी गैरसमजुती व्हत्यात, कमी वय मजार पोर पोरीस्ले जबरी करीसन दिक्षा देत तेन्हा मुये मव्हरल आयुष्य त्या मरेल सारख कठेत. म्हणीसन पयले महाराजस्नी जैन धर्म मजार धाकल्ला पोरी पोरस्ले दिक्षा देतस तेन्ह काय धर्मशास्त्र मजार आधार शे का, हायी तपासा करता समिती बनायी. शास्त्र मजार आसा काहीज आधार नही, आसा जव्हय महाराजस्नी खात्री व्हयनी तव्हय तेस्नी कायदा कया. ह्या कायदामुये. देल दिक्षा बेकायदेशीर शे आस ठराव. नी मियकत मजार तेस्ना हक्काले कोणताबी प्रकारनी बाधा येत नही आस ठराव. धाकल्ला पोर पोरीस्ले जर दिक्षा दिन्ही ते ते करणार वर फौजदारी गुन्हा दाखल करीसन जेल मजार टाकेत.आस.प्रकारे महाराजस्नी जुनाट रुढ्या मोडी काढयात. नी कायदा मजार कठोर शिक्षा करान नियोजन कये. ह्या सुधारणास्ना मुये जैन लोकस्ना राग महाराजस्नी आंग वर व्हढी लिन्हा.
.... सामाजिक सुधारणा करतांना लोकमत दुखावणार नही येन्ही त्या कायजी लेत. गयर धीरगंभीर पणा लिसन तेस्न समाज सुधारणाना काम तेस्नी चालु कय.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा