*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*
*भाग.. ३२*
समाजन बारीक सारीक अवलोकन, बठ्ठवाचनले स्पर्श करेल नी, गयरा मोठा जगदुन्याना. प्रवासमुये महाराजस्ले आस वाटे की, बठ्ठा सुधारणास्न मुळ समाज सुधारणाज शे. समाजसुधारणा हुयीन तो निस्ता कायदा करीसन व्हनार नही, तेन्हा करता समाज ना भरभक्कम पाठिंबानी गरज शे. तुर्कस्थानना हुकुमशाहा केपालपाशा येस्नी काही समाज सुधारणा कायदाना जोरवर झटपट करी दाखाड्यात. पण काही दिवमजार ते वातावरण तठे टीकन नही. महाराजस्ले धीरे धीरे एकबाजुथाईन लोकमत बनायीसन दुसरीबाजुथाईन समाज सुधारणाना भरभक्कम पाया भरणा व्हता. म्हणीसन तेस्नी धीमी पण टीकनारा रस्ताना स्विकार कया. समाज सुधारणाना बाबत मजार महाराज उतावीळ नी उधय नही व्हतात. तेस्ना इचार ह्या बाबत मजार निश्चित स्वरूपना नी पक्का व्हतात. आप्ला इचार कृतीमजार आणासाठे निश्चयीपना तेस्ना मजार व्हता. तेस्नी समाज मजार होणारा धाकला मोठा दांगडोले वारावांधी न रूप येवु दिन्ह नही.
कोणाताबी सामाजिक प्रश्न हाऊ समाजना धार्मिक राजकीय, नी आर्थिक जीवनले चिटकेल ह्रास. सामाजिक प्रश्नना इचार न्यारा करता येतस नही. तेन्हा बद्दल महाराज आर्यसमाजना संमेलन मजार अध्यक्षन भासन करतांना बोलणात, "कोणाताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक मी धार्मिक आचरण वर आवलंबीसन ह्रास. ज्या समाजमजार आप्ला आप्ला मजार वैर, द्वेष, झगडा चालु ह्रातस तेस्नी राजकीय उन्नती व्हावा नी आशा खुडायी जास. जनता मजार एकोपा6, ग्यान येन्हा जर इकास झाया तेस्ना मांगेमांगे सुराज्य चालत येस. जर का कोणाताबी देश मजार सरकार मजार जनतानी भरती करेल व्हयीन, नी ते सरकार जर आप्ली जनता करता सहानुभूती नसीन तर तो दोस जनताना ह्रास. तेव्हा करता पयले आप्ला मजारला दोस काढा ते तुम्ही तुम्हणी सुधारणा करश्यात. तर सरकारबी तुम्हणी प्रगती ना आडे येणार नही."
मानवी समाजन बठ्ठ दुक तेन्हा मुळ न्यारा न्यारा थरस्वर विभागेल शे, आस महाराजस्ले वाटे. मुंबई मजार 'आर्यन ब्रदरहूड 'हायी संस्थानी महाराजस्ना सत्कारना येले एक पंगत देल व्हती, तव्हय न्या. चंदावरकर येस्ना स्वागतना भासन नंतर उत्तर देवाणा येल्हे महाराज बोलणात, "आप्ला मव्हरल बठ्ठास्मा पयले श्रेष्ठ ध्येय म्हणजे हिंदुस्थान मजार राष्ट्रीयत्व तयार करण हायी शे. ते करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या पाहिजेत. नी त्या होव्हाकरता तेस्ना मजार सामाजिक येवहार चालु व्हवाले जोयजे. सार्वजनिक कामसमजार महिलांस्नी भाग लेन म्हणजे आप्ली प्रगती न लक्सन मी समजस. कारण त्या निमित्ताथाईन माणस्ले दाक्षिण्य सभ्यता यीन., "
सिक्सन ना संगे नया इचारस्ना समाजनी स्विकार कराले जोयजे. म्हणीसन जुन्या गंजेल गोष्टी महाराजस्नी धीरे धीरे बंद कयात. बालविधवास्ना वापस लगीन लाव्हा करता चालना दिन्ही. सोता पुढाकार लिसन महाराजस्नी आस लगीन घडायी आन. १९१८ सालनी गोट शे. गणेश सदाशिव भाटे नाव ना एक पंडीत नी बायको तरणा वय मजार मरी गयी. दुसर लगीन करता एक वीस वरीसनी तरणी रांडमुंड रूपवान कलावती बाईले तेस्नी लगीन करता तयार करी. भाटे माय बापस्नी गयरा इरोध कया. विधवास्न वापस लगीन करा करता महाराजस्नी भाटेले मदत कयी. महाराज सोता हायी लगीन ले हाजार व्हतात. बॅरीस्टर जयकर बी हाजीर व्हतात. नृत्यतारका रोहिणी भाटे हायी त्या भाटेस्नीजस आंडेर. आसा सामाजिक सुधारणास्ले सनातनी लोक टिंगलटवायी करेत. पण महाराजस्ले तेस्नी फिकीर नही व्हती. सामाजिक सुधारणा पजाले थोडीशी जड जाईन हायी महाराजस्ले माहीत व्हत.
महाराजस्नी आप्ला मनथाईन आस ठराव की, धर्म हाऊ हारेक माणुस्नी आवडनी बाब शे. तेन्हावर कोनाबी दबाव नको. आसा दबाव शारीरिक जुलुमस्ना नही ते आर्थिक स्वरूप ना राहु शकस. म्हणीसन १९०१ साल ले 'धार्मिक स्वातंत्र्य निर्बंध' कायदा कया. तेन्हामुये जुलूम करीसन जो धर्मांतर व्हये तेल्हे प्रतिबंध व्हयना. तसच ग्रामपंचायतीस्ले न्याय ना आधिकार देवामुये गावखेडास्मा मजारल्या अन्याय करणाय्रा जातीपमचायतीस्ना नायनाट झाया. बालविवाह नी चाल बंद करी टाकी, नी पोर पोरीस्न लगीन व्हय निश्चित कय. तसा कायदा करीसन त्या कायदा ना काटेकोर पणे आम्मलबजावनी कयी. ब्रिटीश हिंदुस्थान सरकार नी बी शारदा कायदा पास करीसन बालविवाहले बंदी आनी. पण तेस्ना कायदा नी आम्मलबजावनी नेम्मन झायाज. नही.
घटस्फोट ना कायदा पास करीसन महाराजस्नी सामाजिक क्षेत्रा मजार जोरबन क्रांती कयी. दत्तक विधान मजार बी व्यवहार्य आसा कायदाना बदल कया. दत्तक जायेल व्यक्तीले तेस्ना सग्गा भाऊस्ना इस्टन मजार वाटा देव्हाना नही आसी ती तरदुत व्हती. तसज रांडमुंड बाईले तिन्ही इच्छेनुसार जीवन कटता यीन आसा कायदान संरक्षण दिन्ह. परिवार कर्ज फेडीना कायदा कया. गव्हानदी कुटुंब मजारला माणुस्नी जर शिकेल सवरेल ना जोरवर संपत्ती कमायेल. व्हयीन ती तेल्हे, नी तेन्हा वारसस्ले मियाकरता. 'विद्यार्जित धनना' कायदा कया. आसा गयरा कायदा पास कयात. नी त्या कायदा समाजना सुख करता गयरा उपयोगी ठरनात.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा