*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम _आरोग्य _अश्वारोहण_शिकार*
*भाग - ४४*
'शरीरमाद्यं खलु धर्मसाधन' हायी तत्त्व महाराजस्नी सोता आचरण मजार आणेल व्हत. सत्ता, संपत्ती, नी जवानी ह्या तीन्हीबी गोष्टी तेस्नी संयम मा नी समर्थपणाथाईन सांभाळ्यात. येन्ह कारण म्हणजे तेस्नावर व्हयेल चांगला संस्कार हायीच शे. नहीते तेन्हामजारला एकबी गोटना उन्माद सत्यानास कराले कारणीभूत व्हवु शकस सत्ता नी संपत्ती तेस्ले फक्त तेस्ना भागतुन मियेल व्हती निरक शरीर ना वारसा तेस्ले माय बापस्नाकडथाईन मियेल व्हता. पण बलदंड शरीर तेस्नी खेय नी नित्यनेम करेल व्यायाममुये मियेल व्हत.
राज्याभिषेक व्हवावर तेस्ना बौध्दिक नी शारीरिक सिक्सननी सुरुवात व्हयेल व्हती. मि. इलियट ह्या तेस्ले महान शिक्षक लाभनात, नी त्याज महाराजस्ना यशस्वी जीवन ना खरा शिल्पकार शेत. महाराणी जमनाबाईसाहेबना सारख्या करारी माता लाभेलमुये महाराजस्ना जीवनले नियमितपणा नी शिस्त लागणी. धाकलपनपासुन तेस्ना दिनक्रम आखेल ह्राहे. रामपायटामा साडेपाचले त्या उठेत, आंगधुयीसन दंड, बैठका, कुस्ती, नहीतेमंग मल्लखांब आसा व्यायाम करीसन घोडावर बशीसन रपेट मारेत. वापस येव्हावर. न्यारी करीसन एकतास वाचन करेत न्यारीमा दुध भाकर, बिस्किट नी फय येस्ना समावेश ह्राहे.
सोताना शरीरनी त्या गयरी कायजी लेत. पयलापासुन हुजय्रासकडथताइन त्या मालिश करी लेत. बदामन तेल मालीश करता वापरेत. तेन्हामुये शरीरनी कांती जास्ती तेज व्हस, चामडी नरम ह्रास आशी तेस्नी भावना व्हती. लष्करीखान बलुच येस्ले युरोपमा लयीग्यात नी ह्या इषयन शिक्षण दिसन तरबेज करी आण नी तेस्ना कडथाईन त्या मालीश करी लेत.
कुस्तीनी तेस्ले धाकलपणफाईन आवड व्हती. कवळाणाले व्हतात तव्हय चिंधा, सक्य्रा, धनजी, नी खंडू ह्या मयतरस्ना संगे नदीमजार वाळुमा कुस्ती खेयेत. आंगेपांगेना खेडास्मा जत्रा ह्रायन्ही म्हणजे त्या तेस्ना मयतरस्नासंगे तठे जायेत नी खाऊनी पुडी, नहीते मंग नारयवर कुस्त्या जिकेत. बडोदाले येव्हावर तेस्ले नामचीन पहिलवान कुस्तीना सराव करता लाभनात. तेस्नी महाराजास्नी कुस्ती, मल्लखांब, आखो बाकीना खेयस्नी नामी तयारी करी लिन्ही. दसरा सण ना निमित्तखाल सरकारी कुस्तीनी दंगल व्हये. त्यायेले कोल्हापूर, सातारा, मालेगाव नी नाशिकना पहिलवान बडोदाले कुस्त्या खेवानीकरता येत. पंजाब मी उत्तर प्रदेशनाबी नामचीन पहिलवान येत. महाराज बक्षिस दिसन तेस्ले उत्तेजित करेत.
'पहिलवान लोक नी तेस्न्या कुस्तीना नियम' ह्या नावन पुस्तक महाराजस्नी छापी काढेल व्हत. पयले चुरसमुये रगेल नी खुनशी पहिलवान आप्ला प्रतिस्पर्धाना पहिलवान ना शरीरले कायमनी दुखापत व्हयीन आसा न्यारा न्यारा डावपेच खेयेत. तेन्हामुये बदलानी भावना तयारहुयीसन दंगली व्हयेत. तसा परकारना पेच ह्या नियमस्नामुये कमी करी टाकात ह्या कमी करेल पेच म्हणजे गळखोडा बांधाना, पाय जागावर चढावाणा, दोन पायस्नी सवारी बांधानी, हात पाठवर चढावाणा, कसोटा माराणा, मोतीचूर कराण आणि नमाजबंद. करण ह्या व्हतात. तसच नाकवर पुठ्ठी मारण, चावाण, बालस्न्या झितय्रा धरण, गालफड फाडाण, पाय मुरगाडान, बरगडीस्वर ढोपरवरी. मारण ह्या अश्या नेस्त्या करान्या नहीत आसा नियम करीसन कुस्तीना प्रकारमजारला क्रूरपणा नी रानटीपना काढी टाका. खंडेराव महाराजस्ना कायमा बडोदाले हत्तीस्नी साठमारी, बेलस्न्या नी हेलास्न्या टक्करी ह्या गोष्टी लोकप्रिय व्हत्यात. तसच जांबियानी कुस्ती, बिन्नोट, वज्रमुष्टी, ह्याबी, खेय गयरा लोकप्रिय व्हतात नजरबागना शेजारना अग्गडामा ह्या खेय सदा व्हयेत तेन्हापयकी बराज क्रुर खेय महाराजस्नी धीरेधीरे बंद कयात. व्हाईसरॉय लाॅर्ड, हार्डीज येस्नी एकसावा बडोदाले भेट दिन्ही. तेस्नी मुक्काम करा, नी वज्रमुष्टीनी झुंज दखानी आमना व्यक्त कयी. नायलाज म्हनीसन महाराजस्नी आप्ला कारभारीले. हाऊ खेय सादर कराणी सुचना कयी.
खेय दखाले अग्गड प्रेक्षकस्नी बोंबाबोंब भरेल व्हत. महाराज नी व्हाईसरॉय शामियानामजार उच्च आसनवर यी बसनात. जट्टेजमाल आखाडा ना पहिलवान हरका जेठी नी गुलुमिया आखाडाना पहिलवान गजराय येस्नी टक्कर दखाकरता लोक तेलमा पडेल व्हतात. त्या दोन्ही मुष्ठियोद्धा हलगीना ठेकावर अग्गडमजार प्रवेश करीसन महाराजस्ले मुजरा करा करता उनात. उच्चापुरा, धिप्पाड, देखणा जुवान न ते पियदार शरीर! तेस्नी केशरी रंग ना जांग्या घालेल व्हता. हातमा वज्रमूठ घालीसन मुठी वयेल व्हत्यात.. त्या विरोचित आवेशमा यीसन येरमेरले ललकारी ह्रायन्हांत. योध्दास्नी महाराजस्ले मुजरा कया. तव्हय लगेच तेस्नी उच्चा हात करीसन पंचस्ले वज्रमुष्टीयुध्द चालु कराना इसारा कया.
सलामी व्हताच त्या येरमेरले आव्हान करीसन वज्रमुष्टीयुध्दनी सुरवात झायी आक्रमण, प्रतिकार आसा डावपेच चालु झायात. एकदोन मिनिटमजारच गजरायानी हरका जेठीले रंगतबंभाय करी टाक. त्या येरमेरवर कचाकच वार कराले लागी ग्यात. वज्रमुष्टीना नखस्नामुये दणका बसताज रंगत न्या चिरकांड्या उडाले लागी ग्यात. मिय्या डोयास्ना गोरा साहेब हाऊ खेय स्वास धरीसन दखी ह्रायंन्ता. दोन्ही योध्दास्न आंग सोलायी गये. दोन्हीबी रंगतना वल्लाचिंब व्हयी ग्यात. हरका जेठीनी महाराजस्ना कडे वयीसन दख. तेस्नी झुंज थांबाडा करता इसारा करताच. तो महाराजस्ना मव्हरे यीसन मुजरा करीसन विजयना उन्माद करत उड्या मारत गया. हायी झुंज व्हवावर महाराजस्नी हाऊ क्रुर खेय कायमना बंद करी टाका.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६