*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*
*भाग - ३८*
दुसरी जगदुन्यानी सफरना येले महाराज नेपल्सले थांबणात. ह्या सयरना अवतीभवतीन सृष्टीसौंदर्य गयरच उत्कृष्ट शे. तेन्हा समिंदरकिनाराना बाजुले धाकल्ल्या धाकल्ल्या बल्ल्या शेतीस, तेस्नावर च्यारीमेय फयझाडस्न्यारांगा, द्राक्षस्ना बगिचा, दूरदूर पसरेल शेत. बल्लास्नावर उच्चावर शोभिवान बंगला बठ्ठीकडे पसरेल शेत. समिंदर जव्हय शांत ह्रास तव्हय देखावान प्रतिबिंब पाणीमा भलतच सुंदर दिसस.'जस काय भूमध्य समिंदरले पडेल सपनच' आस कवी बायरनने एक कवितामा वर्णन करेल शे. रोम मजार राजवाडामा चितरंगस्ना मोठा, अप्रतिम नी सुंदर संग्रोह तेस्नी दखा. तेन्हामा मायकल एंजेलोनी जगप्रसिद्ध चितरंग शेत. 'सेंट पीटर्स' हायी जगदुन्या मजारल बठ्ठास्मा गयरमोठ चर्च नी पोपना' व्हॅचकिन'हाऊ राजवाडा दखा. व्हॅटिकन राजवाडामजारल्या दिवानखानास्नी संख्या पाच हजार शे. मजारला कलासंग्रोह बठ्ठ जगमा मोठा शे. रोममजारल 'कलाॅसस' हायी एक, गयरमोठ प्राचीन प्रेक्षकघर शे. तेन्हा मजार ८७ हजार लोकस्नी बसानी सोय करेल शे. ते इतल इशाल शे तरीबी तेन्ही रचना इतली सोयनी करेल व्हती की,गयरा मोठा समुदाय मजार जाईन तव्हय नी बाहेरयीन तव्हय तेस्ले आडचन येव्हाव नही. फ्लाॅरेन्समा तठला गॅलिलिओ ह्या प्रसिद्ध शास्त्रज्ञना तारास्ना नी ग्रहस्ना अभ्यास कराना करता तयार करेल मनोरा शे, तेल्हे वापरेल दुर्बीण तठे ठेल शे. महाराजस्ले तेस्ना परवास मजार करेल बारीकसारीक करेल गोष्टीस्न निरिक्षण बडोदा सयरनी सुंदर रचना कराना करता चांगला उपयोग झाया.
मव्हरली सफर मजार लंडन, लॅकेशायर, मॅंचेस्टर, लिव्हरपुल, शेफिल्ड, नी आखो. औद्योगिक सयरस्मा जायीसन तठला मोठ्ठला उद्योगधंदास्नी माहिती गोया कयी. जर्मनीमजाररली 'नॅशनल म्युझियम' मजार परतेक शतकमजारली कलात्मक, औद्योगिक नी आरमारी वस्तु कालक्रमणा परमाने मांडीसन ठेल शेत. त्यामुये औद्योगिक उन्नतीना इतिहास शिकवणारी ती शायाच शे.नाॅर्वे मजारला 'मध्यरात्रीचा सुर्य' हाऊ निसर्गना चमत्कार दखा. नाॅर्वे उत्तर ध्रुव ना नजीक असामुये तठे दिवसमजार २० ते २२ तास सुर्यना प्रकाश मियु शकस. महाराजस्ले त्यायेले रातना अकराले क्षितीजवर सुय्रा दखाले मियना. नाॅर्वेमजार आभायले जायीसन भिडेल पहाडस्न्या दोन मोठ्ठल्या कपारीस्मायीन कोसना कोस पाणीन्याधारा संथपणे वाहत्या ह्रातीस तेस्ले तठे 'फिओर्द' आस म्हणतस. सृष्टीन भलत शांत नी स्तब्ध स्वरूप आठे दखाले मियस. तेन्हा काचसारख भासणार नीय्यारंगन पाणीम्हायीन होडीस्मा फिरतस तव्हय पृथ्वीवरना बाकीना जीवसृष्टीन आस्तीत्वना भास व्हत नही. बर्जेन मजारला जलसंग्रहालयमा, निय्या, हिरव्या, पिव्व्या नी लाल रंगना सुंदर मासा महाराजस्नी दखात. तठींग जर्मनीमजाररली हॅबुर्ग, बर्लिन ह्या सयरस्ले भेटी दिन्ह्यात. जर्मनीमजार कलापेक्षा सुखसोयीस्ना कडे परवान करता जास्ती ध्यान ह्रास. तठली स्वच्छता नी टापटीप कवतीक करासारखी ह्रास. आसी खास नोंद महाराजस्नी करी ठेल शे.
मव्हरे तेस्नी सफर स्काॅटलंडले गयी. तठला सुंदर सरोवरस्ना परदेस, डोंगरस्न्या रांगास्मायीन घुसेल खाड्या दखावर युरोप नी आशिया ह्या दोन खंडस्नी संयोगभुमी काॅन्स्टॅटिनोपल आठे येल शे. संयोगभुमीना दोन्ही बाजुस्ले समिंदर पसरेल शेत. तुर्कस्थानना सुलतानना दोन बहुमोल सिंव्वासन तठे व्हतात. तेन्हामजारल एक ले सोनाना मुलामा दिसन असंख्य माणिक रतन जडायेल शेत. दुसर सिंव्वासन चंदन शे, तेल्हेबी हिरामोतीस्मा बसाडेल शे तेन्हा मेघडंबरीले एक सोनानी साखय टांगती ठेल शे, तिल्हे तीन इंचन बुंगर पाडीसन पाचू बसाडेल शे. परतीना परवास मजार महाराजस्नी इजिप्तले भेट दिन्ही. कैरो मजारल प्राचीन पिरॅमिड्स आणि स्फिंक्स दखात. 'ममीज' न मर्म समजी लिन्ह.
मव्हरे महाराजस्ले युरोपना परवास्नी गोडी लागी गयी. नी महाराजस्ले गरज बी वाटाले लागनी बडोदानी उष्णहवा नी मानसिक ताण येन्हामुये महाराजस्नी झोपमोड, नी संधीवातना तेस्ले तरास चालु व्हयेल व्हता. तेन्हामुये हवाबदल कराना करता महाराज युरोपले ग्यात. तेस्ले बडोदाना राज्याबाहेर जास्त काय जावान पसंत नही व्हत. पण ते अगतिक व्हत, आस त्या व्हाईसरॉय डफरीस्ले पत्रामजार म्हणतस, "परवानले सोडीसन दुर राव्हानी मन्ही नापसंती शे, पण ह्या विश्रांतीमुये माल्हे आराम भेटना ते मी मन्ही गैरहजेरीनी उणीव दोनपट जोशमजार नी मेहनत करीसन भरी टाकस."
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा