रविवार, ४ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास* *भाग-३७*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*

*भाग-३७*

          श्रीमंत सयाजीराव महाराज येस्नी गयरा सावा युरोप, आमेरीकाना परवास कया. देशदेशस्ना जीवन, कला, वाडयम, संस्कृती, नगररचना नी उद्योगधंदा येस्ना कायजीकरीसन आभ्यास कया. सोतान जीवन समृद्ध कराकरता आणि आप्ला राज्याना च्यारीमेय इकास कराकरता करेलपरवास ना तेस्नी नामी उपयोग करी लिन्हा.

            आप्ला कारकिरदना पयला सात आठ वरीस रातदिन नथकता श्रम करीसन राज्यकारभारले महाराजस्नी वयन लाव. काही महत्वान्या सुधारणा कयात. राज्यानी इसकचेल घडी नेम्मन बसाडी.त्या श्रमना नी पारिवारिक दुःखना वाईट परिणाम तेस्नी तब्बेतवर व्हयना म्हणीसन तब्बेतनी कायजीकरता डाॅक्टर मूर येस्ना सल्लामुये हवाबदला करता युरोप मजार जावान महाराजस्नी ठरायी लिन्ह. त्याकायन्या धरमनीसमजुत प्रमाणे युरोपले जाण म्हणजे अपवथीर नी पाप समजेत. सामान्य लोकस्ले समिंदर परवासनी भिती वाटे तसच ब्रिटिश सरकार महाराजस्ले बंदी करतीन, महाराज आणि तेस्ना संगे जायेल लोक आते बडोदाले येवाव नहीत. हायी कल्पना करीसन बरीच परवान दुःखी आंतरकरन मजार डोयामा आसू आणीसन स्टेशन वर निरोप देवाले उन्हात. पहिला परवासना बाबत महाराज लिखतस, "मना युरोप परवास ना प्रश्न पयदा झाया त्यायेले माल्हे काही जास्ती माहिती नही व्हती, नी मन्हा लोक ते मन्हा पेक्षा अज्ञानी व्हतात. आम्ही आम्हना संगे पंचावन्न मंडयी लेल व्हती. तेस्नामा मानकरी, ए. डी. सी., पुरोहित, शागीर्द, शिपा, न्हायी, पानक, कपडास्नी देखरेख करा साठे व्हॅले, तसच पुरोहितस्ना समाधान करता गायी संगे लेल व्हत्यात. संगे लोकस्ना आवडना पदार्थ लोणच, पापड, हिंग, जिरे ह्या युरोप मजार मियतस नही म्हनीसन संगे त्याबी संगे लिन्हात. दुर्दैवआस की, पुरोहितस्ले विलायतना आचार इचार, बाईस्ना मोक्या पणा, खाणपान, इतल आवडन की, तेन्हामुये आम्ले तेस्ना उपद्रव झाया. "

             २९ मे १८८७ ना दिन मुंबईथाइन *बुरखा*. बोटवर युरोप ना परवासले महाराज निंघनात. संगे महाराणी व्हत्यात. या सफर मजार महाराजस्ना संगे उखाजीकाका, दादासाहेब माने, कृष्णाराव जाधव आखो नजीकना लोक धामणकर, समर्थ नी मोठा आधिकारी, शमशुद्दीन सुलेमानी ह्या वैद्यकीय अधिकारी म्हनीसन संगे व्हतात. बोटवर बाईस्ना करता पडदानी स्वतंत्र येवस्था करेल व्हती. स्वारीना बठ्ठा खर्च गायकवाड सरकारनी कया. या पयली सफर ना खर्च चाळीस लाख रुप्या झाया म्हणजे आज हिसाबमा पंधरा इस कोटी रुप्या. महाराजस्नी ह्या परवासमा अति आधुनिक सुएझ कॅनाॅल, ऐतिहासिक व्हेनिस सयर, तठला कालवाना रस्ता, त्या रस्ताले दोन्ही बाजुले उच्च्या उच्च्या शिखररस्ना सुंदर मंदिर नी मोठ्ठला घुमटना भव्य राजवाडा, तठल श्रीमंती नी मोहकपना दखा. जिनेव्हा नी फ्रान्समजारला साहित्यिक, राजकारणी, मुत्सद्दी येस्ना स्मारक, पुतळा, नामचीन वस्तुसंग्रहालय, चित्रसंग्रालय, दख. युरोपन प्रसिद्ध 'सेंटमाॅरिटझ' सारख रम्य ठिकाण, प्रशांत सरोवरे, पॅरिसमजारला नेपोलियनन्या विजयीकमानी, झाडस्ना भरेल राजरस्ता मोठ्ठला चौक, उच्चा उच्चा आयफेल टाॅवर, आखो दखासारका स्थळ दखात. सौंदर्यवादी कलादृष्टी महाराजस्ले निसर्गमजारत प्राप्त व्हयेल व्हती. ती सवसकार मजार वाढेल व्हती. प्रेक्षणीय स्थळ दखतांना कला नी उपयुक्तता ह्या नजरमा अवलोकन करणारा गयरा कमी प्रेक्षक ह्रातस. महाराजस्नी नजर उपयुक्त असामुये कोणतीबी सुंदर वस्तू नही ते संस्था दखी की, तिन्ही प्रकीकृती आप्ला राज्याना परवान करता पयदा करा देत. सत्ता नी संपत्ती व्हती म्हनीसन तेस्ले ते शक्य व्हत. लंडनमजापल हाईड पार्क, पार्लमेंटनी हायली, वस्तुसंग्रहालय, काचना क्रिस्टल पॅलेस, आगबोचीस्ना कारखाना, नी आरमारनी तटबंदी दखी. ऑक्सफर्ड नी केंब्रिज इद्यापीठ, हॅरो नी ईटन मजारली गुरुकुलसारख्या इद्यापीठस्ले भेटी दिन्ह्यात.

         महाराणी व्हिक्टोरिया येस्नी भेट करता महाराज चिमनाबाईस्ले संगे लिसन विंडसरले ग्यात. महाराजस्नी गाडी विंडसप स्टेशनवर उन्ही तव्हय हिंदुस्थानना परदा पध्दतले मान देवा करता येल आधिकारी बी हाजीर व्हतात. महाराजस्ले स्टेशन फाईन विंडसर पॅलेसलगुन व्हिक्टोरिया महाराणीना च्यार घोडास्नी बग्गीमजार बसाडीसन सोड. हाऊ सन्मान युरोप मजार गयरा कमी लोकस्ले मिये. युरोप मजारला राजाबी महाराजस्ना हेवा करेत. महाराजस्ना स्वागत कराकरता सोता व्हिक्टोरिया राणी राजवाडाना प्रवेशदारलगुन उन्ह्यात. महाराजस्नी हिंदु रिवाजना नुसार महाराणीना पायस्ले स्पर्श करीसन नमस्कार कया. नी भेट म्हनीसन काठेवाडी पध्दतनी चांदी नी गाडी दिन्ही. हाऊ परसंगले महाराणी व्हिक्टोरिया गयय्रा भारायी ग्यात. महाराजस्ले च्यार पाच दिन विंडसर पॅलेस मजार पाहुनच्यार करता थांबाडी लिन्ह. मंग औद्योगिक सयरस्ले भेटी दिसन महाराज परत व्हयनात. बडोदानी परवान नी महाराज सुखीसमाने वापस उन्हात म्हनीसन तेस्ना गयरा मोठा सत्कार कया.

             च्यार सहा महिना युरोप मजार राव्हामुये तेस्ले आराम लागना. तेस्नी आभ्यासुदानत, तेस्न मार्मिक आणि बारिकसारिक अवलोकन, निसर्गसौंदर्यनी चव लेवानी रसिकता ह्या गुण वाखाणण्यासारखा व्हतात. त्यामुये युरोपमजारल्या नया सुधारणा आप्ला राज्यामजार तेस्ना कसा उपयोग करी लेता यीन येन्ह महाराजस्ले चिंतन लागन.

             परवास मजार मन्हा देश, मन्ह राज्य, नी मन्ही परवान, हाऊज इचार तेस्ना मनमा घोयेत ह्राहे. युरोप मजारला प्रेक्षणीय स्थळस्न मंथन करेत तव्हय तठला समाज, कला, वाडयम,न्याय्रा न्याय्रा संस्था, मोठ्ठला प्रार्थना मंदिर, मोठ्ठला राजवाडा, नया शास्त्रीय शोध, नी तेस्ना प्रसार ह्या बठ्ठ्या गोष्टीसवर तेस्नी बारीक नजर व्हती. आस तेस्नी लिखेल प्रवासवर्णनम्हायीन दिशी येस.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...