गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा* *भाग.. २९

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*

*भाग.. २९*

           "मन्ही जनता ना रथ मी आसा हाकलसु, जेन्हामुये जनताले जगन आनंद मजार व्हयीन."आस तरणा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज एक समारंभ मजार बोलणात. तेस्ना राज्य मजारली बहुसंख्य जनता खेती  यवसाय करणारी व्हती. नसिबथाईन एक गरीब शेतकरीना आंडोर बडोदाना राजा व्हयना आणि जनता न नशिब फयफयन. महाराजस्नी साहजिकच खेती सुधारले जास्ती महत्व दिन्ह.

              महाराजस्नी खेतीनी प्रतवारी ठरायीसन शेतसारा पक्का करा. नदिस्न पाणी आडायीसन धरण बांधात, तेन्हामुये बागाईत खेतीनी. वाढ झायी. दुस्कायमजार नादारीना शेतकरीस्ले हातले कामदीसन तेस्न्याच जमिनी शास्त्रीय पद्धत मजार सपाट करीसन नालाबल्डींगना काम तेस्ना कडथाईन सक्तीनी करी लिन्हात. जंगलतोड थांबाडीसन पडीत जमिनवर. नयी पद्धत मजार जंगलनी लागवड करी. खेतीन्या क्षेत्रामजारल्या प्रयोगशाळा बडोदा नी नवसारीले चालु कयात. शेतकरीस्ले नया. आवजार, हत्यार, खत, बियाण नी आखो बराच बाबत मजार प्रशिक्षण नी सल्ला देव्हान काम प्रयोगशायांस्नामार्फत महाराजसिनी चालु कय. दुस्कायमजार नादारीना शेतकरीस्ले शेतसारा माफ करीसन कर्जफेड थांबाडी दिन्ही नये बियाण, नी जंतूनाशकना वापर करानी पद्धत ना शेतकी खाता मार्फत परसार कया. महाराजस्नी प्रेरणामुये आणि आर्थिक मदतमुये १८८ा सालले बडोदा मजार सूतगिरणी चालु व्हयेल व्हती. तसच गणदेवी मजार भारत मजारला पयला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना चालु करेल व्हता. खेती ना यवसाय, नी कारखानदारी ह्या दोन्ही येरायेरस्ले कस पूरक शे, हायी महाराजस्नी प्रत्यक्ष तेस्नी क़ृतीम्हायीन सिद्ध कये.

               कारभार चांगला करता यावा म्हनीसन महाराजस्नी पयलेज खेडापाडास्ना दौरा करीसन परिस्थिती समजी. लेल व्हती. महाराज शेचकरीस्न्या आडीआडचन तेस्ना तोंडे आयकीसन लगेच आधिकारीस्ले उपाय कराले सांगत. पयले गावखेडास्मा दौरा काढेत तव्हय महाजस्ना संगे गयरा मोठा लवाजमा ह्राहे. तेन्हामुये गयरा खर्च व्हये. पण काम काहीच व्हये नही. म्हणुन महाराजस्नी सोताना लवाजमा, थाटमाट कमी करीसन गरज पुरता सामान, कामनाच माणस संगे पायजेत आसा नियम करा. नी तो तंतोतंत पाया.

        गावखेडास्मा दौराना येल्हे जनताले भाषण करतांना महाराज म्हणेत, "मन्ही जनता संतुष्ट राव्हाले पायजे नी मव्हरे मव्हरे तिन्हा सुखनी वाढ व्हत जावी, आशी मन्ही आंतरमन पासुन आमना शे जनतान कल्याण हायीज मन्ह कर्तव्य आणि तोच मन्हा मोक्ष शे. गावस्नी सुधारणा हाऊ मन्हा बठ्ठ्या सुधारणास्ना पाया शे. 

                   हर गावमजार एक शाय, एक वाचनालय, एक व्यायामशाय, नी एक दवाखाना पायजेल हायी धोरण पक्क करीसन गावखेडासमजारली सामान्य जनताले नी शेतकरीस्ना इकास घडावानी सुरवात कयी. खेडास्मा कारभार चांगला चालो म्हनीसन त्याच लोकसमा कल्याणकारी योजनास मजार सामील करीसन ग्रामपंचायत नी तालुका पंचायती तेस्नी स्थापन कयात आणि लोकशाही पध्दत मजार निवडणुका लिसन पंचायत राज चालु कये. आपल्या योजनास्नी आम्मल १०० टक्का व्हावी म्हनीसन खेडय़ापाडास्मा जंगलजुंगलस्मा फीरीसन तपासणी करेत. तव्हय महाराजास्न वय २२ ते २३ वरीस व्हत. हायीच ग्रामसुधारनानी योजना महात्मा गांधीस्नी ग्रामीणदारास्ना स्वरुप मजार मव्हरे उचली धरी, नी तिन्हा भारतभर तयमयीनी परचार करा. 

           महाराजस्न्या शैक्षणिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, नी ग्रामसुधारणाना डंका बठ्ठी कडे वाजाले लागणा. तेस्नी किर्ती म ज्योतीबा फुले येस्ना कानवर पडनी. जोतीबांच्या. मनात ह्या तरणा राजाना बद्दल आदर नी काही अपेक्षा निर्माण झायात. त्या सोता महाराजस्ले भेटाले बडोदाले उन्हात. आप्ली भेट मजार तेस्नी महाराजस्ले जो उपदेश कया आज बी गयरा मुद्दाना वाटस. त्या बोलणात, "भारत सारखा कृषिप्रधान देशमजारला शेतकरी शिकेल सवरेल व्हवाबिगर शेतकरीस्नी उन्नती व्हणार नही. म्हणीसन शेतकरीस्ना पोरस्ले आधुनिक शेतीन तंत्रज्ञान पयदा करी देव्हो, नी तेन्हा करता देशी भाषास्मा पुस्तक छापाले जोयजेत. त्यामुये आधुनिक शेतीन ग्यान सहज मियीन. शेतकरीस्ना पोरस्ले शेतीन सिक्सन सक्तीन कराले जोयजे. शेतीना संगे तेस्ले जोडधंदा न सिक्सन बी देण गरजन शे. आसा तयार व्हयेल शेतकरीस्ना पोरस्लेच शिक्षक म्हनीसन नेमणूक करो. शेतकरी शाणा व्हवाले जोयजे म्हनीसन शेतीन उपयोगी ग्यान प्रयोगशायस्न्या च्यार भितीस्ना आडे न ठेवता ते शेतकरीस्ना दार मजार लयी जाईसन पिकस्न. नी जनावरस्न प्रदर्शन भरावाले जोयजेत., "महाराजस्नी जोतीबास्ना सत्कार कया. तव्हय जोतिबा बोलणात," खेतीना धाकल्ला धाकल्ला तुकडा व्हयी ह्रायन्हात नी मव्हरे तिन्हा कस बी कमी व्हयी ह्रायन्हा. आशी खेतीन संरक्षण करन. गयर गरजन शे. पावसाया ना पाणीमुये जमिन नी धुप व्हस. जमिन ना गय वाही जास. जमिनी पडीत व्हतीस म्हनीसन जमिनीस्ना बांधबंधारा बांधी लेव्हो. तेन्हामुये जमीन नी धुप थांबस. भारत सारखा शेती प्रधान देश मजार खेतीनी मशागत करता जनावरस्नी गरज शे, म्हनीसन पशुधन वाढावाले जोयजे, नी तेन्ह जतन कराले जोयजे. खेतीले जोडधंदा म्हनीसन गायी, म्हशी, बकरी, मेंढ्या पायानी गरज शे. परदेशथाईन चांगला पशुस्नी आयात कराले जोयजे. जनावरस्ले चरा फुकट शेतकरीस्ले जंगल देवाले पाहिजे. लाकुडतोड ना कायदा कराले जोयजे. म्हणजे ढोरस्नी चरान कुराण नाश व्हवाव नही. नी जंगलतोड नही झायी तर देव ना पाणी बी चांगला पडीन. शेतकरीस्ले आधुनिक यंत्रसामग्री पुरायीसन ते वापरान सिक्सन देव्हाले पाहिजे. म. जोतिबा फुले येस्ना बहुमोल उपदेश शंभर टक्का आम्मल मजार आणा करता महाराजास्नी आप्ल कार्य हायातीभर चालु ठेव. महाराजास्नी जोतिबास्ले मानपान ना आहेर, नी देणगी दिन्ही. बडोदाले मुक्काम व्हता तव्हय जेतिबास्नी महाराजास्ले शेतकरीस्ना हीन दिन ना बद्दल आप्ल शेतकय्रांचे आसूड नावन पुस्तक वाची दाखाड. ते तेस्नी ध्यान दिसन आयक, नी जोतीबास्ना संगे चर्या कयी. महाराजास्ना व्यक्तीमत्व नी कार्यावर खुष व्हयीसन जेतिबास्नी महाराजास्वर एक पवाडा लिखा. 

         येऊ द्या दया मना, दया मना // केली दैना //धृव//

          विद्याबंदी मुळ पाया केला दैनवाना

           वसुलाचा पैसा खर्चून खिचडी ऐद्यांना

             कष्टकरी शेती खाती चटणी भाकरींना 

              अक्षरशुन्य शुद्रादिका काहीच कळेना 

               अश्या मुक्यांचे बाप आता तुम्हीच व्हाना//

                कष्टाळुंची दैना दाविली मुख्यप्रधाना 

                गेली घडी पुन्हा येईना माहित सर्वांना 

                 सर्वकाल पूर वाहीना पर्वती दय्रांना

                  जोतिराव सयाजीरावाला करितो प्रार्थना 

                    वहात्या गंगेमध् एकदा हात का धुवाना//

   एक महात्मानी ह्या तरणा महाराजास्वर गौरवपर पवाडा रचा, येन्हा पेक्षा मोठा सन्मान काय व्हवु शकस? 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार* *भाग.. २८*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २८*

            नित्यनेम आहार नी फिरान (विहार) हायी तत्व महाराजस्ले पसंत व्हत. तेस्ना जेवण मजार इसड बी ह्राहे, नी साधा आहार बी ह्राहे. इसड त्या नेम्मनच खायेत. तेस्न आस म्हणण व्हत की, जर माणुस्ले तरतरी पाहिजे तर इसड खाव्हाले पाहिजे आस तेस्न मत व्हत. तेस्ना जेवण मजार एक खास गोट ह्राहे. तेस्ना सोनाना ताटमजार जरी पाचीपकवान वाढेल ह्रायन्ह तरी बी बाजरी नी भाकर ताट मजार ह्राहेज. बाजरीनी भाकर तेस्ले गयरी आवडे, शिवाय बाजरीनी भाकर मुये नादारीनी याद ह्राहीन आसा तेन्हस्ना हेतु बी ह्रावु शकस.

                    महाराजस्ना सचिव तात्या नेने येस्नी एक आनुभव लिखी ठेल शे. काही तरी गुपीत चर्चा करानाकरता माणिकराव महाराजस्ले मकरपुरा पॅलेस मजार भेटनात. संगे खासेराव जाधव, केशवराव देशपांडे, नी ताथ्या नेने व्हतात तठे पयले जेव्हाना बेत झाया. जेवाले बसावर ताथ्याना चेहरा पडी ग्या. महाराजस्नी त्या दिन जेवण ना बेत काय करो बर? बाजरीनी भाकर, कांदा, लोसन तीख, नी बेसन. नामी लोणी वाटीमजार व्हतच. बस्स तेवढा त्या जेवणले"राॅयल टच" महाराज बोलणात "रोज रोज हायी पाचीपकवान खायीसन इट येल शे, म्हनीसन जानीबुजीसन हाऊ बेत करेल शे" . तेस्नी मुद्दाम आढाऊपणा करीसन तात्यास्ले इचार, "तात्या बेत आवडना की नही?" बठ्ठाजन खिदीखिदी हसनात, तात्या सोताले सावरीसन बोलणात, "महाराजस्ना संगे जेवाले भेटन हाऊज माल्हे आनंद शे. "दखाले गे ते रांधेल पकवानज नंतर वाढात

मंग मातर आवडत जेवण दकीसन तात्यानी कयी खुलनी.

                सयपाक मजार कोणकेणता पदार्थ पाहिजेत तेन्हा करता महाराणी चिमनाबाई ह्या सावध ह्राहेत. तिखा, कोशिंबीरनाआंबट चिंबट, गोडधोड आसा न्यारा परकार. महाराणी सोता ध्यान दिसन बनायेत. महाराजस्न वय वाढी जायेल व्हत, म्हनीसन महाराजस्ना सांधा दुखन चालु व्हयेल व्हत, नी गयर वाढी जायेल व्हत, म्हणीसन तेस्ना जेवण मजार सकस अन्न खाव्हाले पयले तेस्ले भाजीपाला खाव्हाले देत..

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार भाग.. २७

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २७*

चिंधा जे बोली गया, तेन्हावर महाराज इचार कराले लागी ग्यात. हुजरा चिंधाना करता पोशाख न ताट लिसन उन्हा. चिंधाले महाराजस्नी मानपान मा पोशाख दिन्हा नी पयस्नानी मदत बी कयी. चिंधाना पोंगोट बांध, नी समदास्ले राम राम ठोका. दिनमाव्हतले महाराजस्ना संगे जेवण कय. तिसरा तालनी गच्चीवर गायकवाड मंडई चिंधाना संगे गप्पाटप्पास्मा गुंग व्हयगी. धाकल पण नी याद उन्ही, दिवाईले ढोरक्या पोर रातना येल्हे घरेघर जाईसन तेल मांगत भवडेत, त्या येले त्या गाण म्हणेत. ती याद दिसन महाराजस्नी चिंधाले गाण म्हणान आग्रोव्ह करा. त्या रातले नीरव शांती मजार चिंधान गाण आयकीसन गायकवाड बंधु भुतकाय मजार चालना ग्यात.

             चिंधानी म्हणेल गाण,

    मनी कपिली गाय तु बरवी

     दुध भरोनी देत असे चरवी 

     नारबा चरततसे डोंगरी //          

     मनी कपीली गायन तोंड 

       जशं कपाशीनं बोंड 

       मनी कपीली गायन्या मांड्या

जश्या पालखीन्या दांड्या 

मनी कपीली गायनी शेप

  जशी नागीन मारे झेप 

  मनी कपीली गाय तू बरवी 

  दुध भरोनी देतसे चरवी 

  नारबा चरतसे डोंगरी //

दिन दिन दिवाळी 

  गायी म्हशी ववाळी

   गायी कुणाच्या

   लक्षुमनाच्या //

महाराज गुंग व्हयसीन आयकी ह्रायनंतात. तेस्ना आंतरमन ना डोयास्मा धाकलपन दिसाले लागी गये. 

         पोशाख ना बाब मजार महाराजस्ले साधपन जास्त आवडे. धाकलपणे राजानी गादीवर येव्हावर जुनी रितभातनुसार मखमली, नी सॅटीनना भरजरी कपडा त्या वापरेत. पण जस जस वय वाढाले लागन तसा तेस्ना पोशाक मजार साधा पणा उन्हा.जितला साधा पणानी तेस्ले आवड व्हती, तितलाच निटनेटक पण, नी स्वच्छता नी आवड व्हती. कपडासवर एक बी डाग, एक बी चुनी नही आवडे. तेस्ले गयरा स्वच्छ धव्याबरप कपडा आवडेत. परतेक नी आप्ला येवसाय नुसार शोभादीन आसा कपडा घालाले पाहिजे. आसा तेस्ना आग्रोव्ह बी राहे. दरबार ना येल्हे बठ्ठास्नी खास पोशाख मजारच येव्हान हाऊ नियम व्हता. महाराजस्ले भेटाले जान व्हयीन तव्हय बी अमुकज पोशाख त्या व्यक्तिना पायजे म्हणजे पायजे आसा रिवाज व्हता. खान्देश ना पाहुणा जव्हय बडोदा मजार जायेत तव्हय तेस्ले, महाराजस्नी भेटना पयले खानगीतर्फे पोशाख देत. तेन्हा मजार धोतर, चुन्या पाडेल कुडची, पांगोट नी उपरन आस देत. गावठी पोशाख तेस्ले गयरा आवडेत. परतेक नी आप्ला गावठी म्हणजे देशी पोशाखज घालो आसा तेस्ना आग्रोव्ह राहे. युरोपीय पोशाख कचेरी मजार ह्रायन्हात ते चालीन आस तेस्न मत ह्राहे. सोताना पोशाख बी गयरा साधा नी टापटीप ह्राहे. सदा साधा नी धव्याबरप लांबा आंगरखा, सुरवार, काया मोजा नी काया जुत्ता, गायकवाडी खान्देशी पांगोट नी हातमजार बांडुक असा तेस्ना पेहराव ह्राहे. कव्हय मव्हय आस बी वाटस की, तेस्ले खान्देश नी माटीनी याद येत व्हयीन म्हनीसन हाऊ पेहराव तेस्ले आवडे हुयीन. मोठलपने खास व्हयकीना माणूस 

  नजीक जरी ह्रायन्हा तरी सहसा त्या आप्ल पांगोट उतारे नहीत. आप्ला खान्देशी पांगोटाना तेस्ले गयरा आभिमान व्हता. हवा उष्ण राव्हावर सुरवार, कुडता आसा पेहराव करीसन राजवाडा मजार त्या फिरेत जेवण ना येल्हे त्या कामना येना पेहराव करेत. तेस्ना संगे कितलाबी नखजिवाइना माणुस राव्हो, तेन्ही बी पेहराव मजारज राव्हाले जोयजे आशी तेस्नी शिस्त ठेल व्हती. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकीपना हायी सवय तेस्ले तेस्ना गुरुजी प्राचार्य इलियट नी युरोपीयन लोकस्नी संगतमुये जडेल व्हती. महाराजस्ना सहवास मजार येल लोकस्ले हायी सवय आंगे लागी जायेल व्हती. धाकलपणे तेस्ले कवळाणाथाईन बडोदा आण व्हत तव्हय ह्या सवयी आंगे नही व्हत्यात. तेस्नी एक याद गयरी मज्यानी शे, ती आयका सारखी शे. महाराजस्न दुसर लगीन आते आतेच व्हयेल व्हयेल व्हत. महाराज जपेल व्हतात तव्हय तेस्ना पायले खाज सुटनी, खाज थांबान नाव ले नही. तव्हय तेस्नी महाराणीले धीरेज हाक मारीसन उठाव. चिमनाबाईस्नी दिवा लायीसन तेस्ना पाय तपासात, तव्हय पायना बोट गंघा व्हतात, तेस्ले माटी लागेल व्हती. लगेच तेस्नी महाराजस्ले इचार, "तुम्ही आंग धोतस तव्हय हातपाय नेम्मन धोतस नही का?," महाराज बोलणात, "पाणीना भरेल चांदीना हौद पाणीना भरेल ह्रास, तेन्हामा मी बसस. माणस आंग वर पाणी टाकतस. मी काहीबी करत नही. माल्हे हायी कोणीज सांग नही. पाणी म्हाईन उठुन की, जाडाजट गुबगुबीत रुमाल आंववर गुंढायीसन मी बाहेर निंघस. आंग चुयीसन धोण, आंग पुसन, बठ्ठ आंग पुसी टाकानी सवय आंगे लागेलच नही व्हती. म्हणीसन चिमनाबाई तेस्ले खेसरमा बोलण्यात, "हायी वयन धाकलपनेज लागाले जोयजे, नी त्या मोठलपने वयन लाव्हान म्हण ते लागाव नही." तव्हय पासुन रोज दिनमाव्हतले चिमनाबाई महाराजस्ना पाय गरम पाणीवरी धुयी काढेत. 

         महाराजस्ना पेहरावराव नी देखभाल करता खास माणस ह्राहेत. कोणता परसंग ले महाराज कोणता पेहराव करतीन येन्ह तेस्ले ग्यान ह्राहे. महाराज ज्या कामना करता बाहेर जाणार शेत, तसा तेस्ले लागीन तसा पेहराव तयार ठेवान, महाराजस्ना आंगवर नामी पद्धत मजार कपडा घालान, पायमोजा घालान, जुत्तास्ना बंद बांधान, रत्नस्ना पदक कोटवर नेम्मन लावान, पांगोट, काठी, आणी आखो बठ्ठ नवकर तयार ठेत. नी महाराज बाहेरथाईन उनात की, तेस्ना आंगवरना कपडा काढाना, कपाट मजार ठेवाना, घरगुती कपडा आंगवर घालान, शिपाकडथाीन शियेल कपडा आनान काम बी ह्या नेमेल नवकर करेत. ह्या कामाकरता तेस्ले इंग्रज नवकर आवडेत. उतार वय मजार प्रवासमा पुस्तक, काठी, पांगोट महाराज इसरी जायेत. ते उचलीसन नवकर महाराज कडे देत, तव्हय महाराज म्हणेत, "अरे म्हन काम माल्हे करु द्या, माल्हे तुम्ही परलांबी नका करु," तव्हय तेस्ना ए डी सी नी बाकीना आधिकारी म्हणेत, "हायी काम नवकरस्न शे, ते तेस्ले करु द्या, त्या काम करता ते तेस्ले ठेल शे," 

            राजवाडा मजारला हर दालन मजारला गालिचा, टेबलवरना कपडा, दारखिडकिस्ना परदा, पलंगपोस, पंघराना कपडा, टांगेल झुंबर हायी भलत नामी स्वच्छ ह्राहेत.. 


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार* *भाग.. २६

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २६*

    राजाना परिवार मकरपुरा मजार असतांना ३१ जुलै १८९० ले शिवाजीराजास्ना जनम झाया. मंग १८९१ पासुन राजाना परिवार लक्ष्मी पॅलेस मजार राव्हाले ग्या. पण इतला मोठा राजवाडा राव्हाना कामना नही आस महाराजस्ले वाटे. एक पत्र मजार त्या बोलतस, "लक्ष्मी पॅलेस हाऊ राजवाडा गयरा भव्य शे, पण माणसस्ले राव्हा सारखा नही शे, तठे राहनारस्न्या सोयी सुविधासन दुर्लक्ष करेल शे. उदाहरण देवा न झाय ते मन्ह्या खोल्या नजीक नजीक पाहिजे व्हत्यात, त्या दूर दूर इसकळेल शेत. तेन्ही भव्यता हायीज हेळसांड शे, वाचानी खोलीम्हायीन जपानी खोली लगुन भिडस तवशी मन्ही जपमुडी जास. माल्हे कव्हय मव्हय जप लागत नही. तयमय करत पडत ह्रास. तेन्हामुये गयरा तरास व्हस. तसच गंजय राव्हानायोग्य सोयी ह्या वाडामजार बांधान्या ह्राही ग्यात, तस दख ते गुजरात हावु तापमान ना वरदेश शे तेन्हामुये वाडा न काम दगड मजार बांधाना पेक्षा इट मजार कराले जोयजे व्हत. माल्हे कव्हय मव्हय वाटस हायी इतली मोठी हायलीमजार पोरीस्ना करता काॅलेज चालु करो, नी आपीन बाजुले मस्त टुमदार बंगला बांधी लेव्हो. "

लक्ष्मीविलास पॅलेस मजार राव्हाले येव्हावर १ मार्च १८९२ ले राजकन्या इंदिराराजे येस्ना जनम झाया. एक वरीस नंतर चौथा आंडोर धैर्यशीलराव येस्ना जनम बडोदालेच झाया.

               तेन्हानंतर दुकना प्रसंगस्नी मालिका चालू झायी. १८९४ ले अल्पशा आजारमुये उमामाय बडोदालेच हायी जगदुन्या सोडी ग्यात. उमामायले सतेगते लायी उन्हात नी, महाराजस्ना बाजुले तेस्ना भाऊ, चुलतभाऊ बशेल व्हतात तव्हय मायनी याद मजार तेस्ना हुंदका भरी उन्हा तव्हय त्या बोलनात, "मन्ही अडाणी मायनी मन्हावर कितला तरी चांगला सवसकार करात, परोपकार, दयाबुद्दी, ह्या गुण मन्हा मनवर उतारात, माल्हे शेवटलगुन गोपाळ म्हणणारी मन्ही पिरमनी व्यक्ती कायमनी माल्हे सोडी गयी,"

         जरासा दिनमजार लगेच बहिण ताराबाबायेस्नी तब्बेत खराब व्हयनी,नी काही दिनमजार सावंतवाडी ले देवबाले आवडी ग्यात. तेन्हामुये महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी आंडेरना धसका लिन्हा, त्या बी गयय्रा आजारी पडण्यात. पुणाले डाॅ आण्णासाहेब पटवर्धन येस्नी आवसद पाणी कर. मंग त्या बडोदाले उन्यात. तेस्नी तब्बेत गयरी खंगरी गयी, नी तेस्नी बी २९ नोव्हेंबर १८९८ ले आखरी श्र्वास लिन्हा. आप्ल नशिब घडवणारी व्यक्ती गयी म्हणीसन महाराजस्ले गयर दुक झाय. पण राजाले बठ्ठ पचाडन पडस.

              राजपररिवार मजारला बठ्ठा नातागोताना लोकस्ले महाराज सारखा वागेत. बडेदाना माजी महाराज मल्हारराव येस्ना तरणा आंडोर मरी ग्या, लगेच मल्हारराव ग्यात, नी लगेच काही दिन मजार तेस्नी पयली बायको गयी, पण दुसरी बायको पार्वताबाई येस्नी देखभाल, आर्थिक मदत महाराज येस्नी कर, तिस्ले मानसन्मान दिन्हा. म्हणीसन महाराजस्न मोठपन नी आठे वयख व्हस.

             आप्ली मयतरी मजार महाराज धाकला मोठा आसा फरक करेतच नहीत, कवळाणा ले तेस्ना बालमित्र चिंधा भिल व्हता, ढोर चारापासुन तो तेस्ना मयतर व्हता.. महाराज बडोदाले येव्हावर तेस्नी भाऊबंदकी, नातगोत, सगासायी, बठ्ठा बडोदाले राव्हाले यी जायेल व्हतात. पंधरा सोया वरीस उलटी जायेल व्हतात, चिंधा भिल मातर आजुन बडोदाले भिडेल नही व्हता. महाराजस्ले मजार मजारमा तेन्ही याद ये चिंधा ले बडोदाले आनानी महाराजस्नी येवस्था करी. श्रीमंत संपतराव येस्ना कडे चिंधाना मुक्काम व्हता. दुसरा दिन राजवाडाम्हायीन तेल्हे धोतर, कुडची, पांगोट, जुत्ता असा मानपान ना पेहराव धाडा. कारण महाराजस्ले भेटणारास्ना पेहराव ठरेल ह्राहे. त्या दिन कपडा आंगवर चढायीसन चिंधा दादासाहेब, नी संपतराव येस्ना संगे लक्ष्मीविलास पॅलेस कडे जाव्हाले निंघनात, संगे दोन हजार हुजरा व्हतात. राजवाडाना बाजुले गयरी मोठी जागा व्हती, बगीचा व्हता, बाग मजार मेरस्ना आवाज, इकडे तिकडे उड्या मारणारा वांदर, राजवाडाना आभायल् भिडणारा मनोरा,गयर मोठ दालन, गॅलय्रा, लुसलुशीत गालिचा, शोभना पुतळा, हायी बठ्ठ चिंधा आचंबा करीसन दखे. भव्य दिवाणखाना मजार महाराज चांदीना सिव्वासन वर बसीसन पुस्तक वाचत बशेल व्हतात. मानकरी नी हुजराकरी चिंधाले महाराजस्ना दिवाणखाना मजार लयी ग्यात. चिंधाले शिकाडेल व्हत महाराजस्ना कडे जावावर मुजरा कसा कराना, महाराजस्ले दखताच चिंधा बठ्ठा शिष्टाचार इसरी गया, नी तोंडम्हाइन उच्चार व्हयना, "तुमी ते उच्ची जागावर जायीबसनात हो," महाराजस्नी हाशी दिन्ह, नी तेल्हे बाजुना आसनवर बसाडीसत महाराज बोलणात, "तु कव्हळ उन्हा?",

, "कालदीन वनु, "आसनवर सरमाव्हत सरमाव्हत बशीसन चिंधा बोलणा.

"कस काय चालनंस तुन्ह?," महाराज बोलणात.

"मनी मजा शे, पोय्रा लोकस्न कामतं जातंस, त्या मजा करतस, एक उलसा शे तो गायी वाळस, एक पोर व्हती, तिन लगीन करी टाक, गडी आते च्यारी पाय मोक्या स, "चिंधा बोलणा.

" काम काय करस तु?."

"मी गावनी जागल करस"

, "बर पिकपाणी कस काय शे आप्ला कडे? "महाराज बोलणात.

, "ते नका इचारु महाराज, पिकस्न्या व्हळ्या शेतीस, त्यासकडे पाव्हत नही, आपण ज्या डाबल्ला मजार आंग धुवुत तेन्हा मजार पाणी नही "

" मंग गायी, म्हशीस्ना चारा न कसकाय?"

"गवत ना खकाना हिसळी गया, गायी, बैल, म्हशी डांगात पवसाडी दिधात"

" आरे, आरे "महाराज हळहळनात.

"तुम्हणी मातर मजा दखावत मातं, तुम्न इष्टन बारदान आप्ला गावना समदा लोकस्थीन भारी शे ", चिंधा बोलणा.

" हा, शे खर "महाराज बोलणात.

"पण हायी जलमभर आशेच ह्राई का. "चिंधा बोलणा. चिंधाना आखरी सवाल आयकीसन महाराज धीरगंभीर व्हयनात. त्या शुन्य नजम्हायीन दखाले लागणात. ब्रिटिश राजसत्ताना अंकुश तेस्ना कलेजाले टोचायी गया. एक आडानी माणुस राजकीय अस्थिरता सहज बोली ग्या....

*क्रमशः*

    (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

                 

              सुरेश पाटील

            ९००४९३२६२६

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

 *भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड*

आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५८ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले. 

दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. *सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली*. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले.व भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय सुरू केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. *महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते*. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.


सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी,हिजड्यांच्या लिंग छेदावर बंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. *घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला*. *हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२)*. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक नंतरची शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, तसेच उच्च शिक्षणासाठी लंडन पाठविले व पाऊण लाखाची शिक्षवृत्ती दीली, आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).


बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. *लक्ष्मीविलास राजवाडा*, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.


सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. दुष्काळाच्या काळात ज्यावेळेस ते दौऱ्यावर होते, त्यावेळेस शेतकरींची अवस्था बघुन त्यांना रडू कोसळले, त्यांनी त्वरीत दरबारातील चांदीचे हत्ती घोडे मोडून बारडोली, गणदेवी परीसरात लगेच मदत केली, पहिला साखर कारखाना गणदेवी येथे उभारला, सयाजी सरोवर बांधले, शेतकरी करीता बॅक आॅफ बडोद्याची स्थापना केली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली


बडोद्यात १९२७च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा  जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.


सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती, असे म्हणतात व्यासांनी जग उष्टविले, तसेच महाराजांनी जग भ्रमण केले. त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांनी १३ भारत रत्नांना मदत केली, राष्ट्रीय  आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना बडोद्यात बोलवून त्यांचा भव्य सत्कार केला होता. ज्योतीबांचे शेतकऱ्यांचे आसूड ह्या पुस्तकाचा प्रकाशनाचा संपूर्ण खर्च महाराजांनी केला होता, तसेच महात्मा फुले यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे, महात्मा ज्योतिबा गेल्यावर सुध्दा सावित्रीबाई फुले यांना मरेपर्यंत पेंशन दिली होती, यशवंत आजारी असतांना मदत केली होती, दादाभाई नौरोजी यांना परदेशात निवडणूक लढविण्यास निधी दिला होता. भुमिगतांना व त्यांच्या परिवारांना आर्थिक मदत केली होती, आज मुंबईत पोलीस मुख्यालय आहे त्याचा बांधकामाचा संपूर्ण खर्च गायकवाड परिवाराने केला आहे.

असा हा राजा दुर्लक्षित का राहिला हे न उमगलेले कोढेआहे. ज्यांच्या मदतीने १३ भारत रत्न घडले, ते मात्र उपेक्षित राहिले, आम्ही खान्देशी लोक सुध्दा इतके करंटे आहोत की, आमचा राजा आम्हाला सुध्दा कळाला नाही, श्रीमंत सयाजीराव महाराज यांचे ज्या वेळेस मुंबईत देहावसान झाले, त्यावेळेस आचार्य अत्रे यांनी मराठा मध्ये अग्रलेख लिहिला होता की, राजा अशोक सम्राट व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्त मिश्रण तयार करुन जे रसायन तयार होईल ते रसायन म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड होय, *अश्या ह्या भारत वर्षाच्या, भारत खंडाच्या शेवटच्या आदर्श राजास त्यांच्या जयंती निमित्त खान्देश हित संग्राम व तमाम खान्देश हित संग्राम च्या कार्यकर्त्यांकडून कोटी कोटी प्रणाम!*

प्रवक्ता

खान्देश हित संग्राम

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार* *भाग.. २५

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २५*

        सुक दुकना परसंग परतेक ना जीवन मजार कमी जास्ती येत ह्रातस. महाराजस्ना भाग मजार परमभाग्याना पल येल व्हतात,तसा गयरा दुकना बी पल येल व्हतात. पण महाराज सवसारना सुकदुकन्या घटना गयरा समतोल बुध्दीनी नजर मजार दखेत. त्या एकसावा सपरिवार दौरावर जायी ह्रायन्हांत तव्हय तेस्नी दुसरी आंडेर पुतळाबाबास्ले. एक दिन पालखीम्हायीन लयी जायी ह्रायन्हांत. तेवढाम्हा पालखी मुडीसन पडनी, नी राजकन्याले बराज मार लागना. पालखी मुडनी म्हणजे काहीतरी आपशकुन झाय आस महाराणी चिमनाबाई येस्ले ग्रह झाया नी तेस्ना आंतपमनले धक्का लागना.मव्हरे राजकन्या न दुखन वाढन नी तीस्ले देवबा लयी ग्या. तव्हय पासुन महाराणी चिमनाबाई येस्नी तब्बेत बिगडी गयी, तीस्ले तपास तव्हय कयन की तेस्ले क्षय रोग व्हयेल शे, हवा बदलावा करता तेस्ले मुंबईले ठेव. मंग काही दिन जावावर तेस्ले वापस बडोदाले आण. पण बडोदाले येव्हावर तेस्नी तब्बेत आजुन बिघडनी, नी ७ मे १८८५ले तेस्नी जीवनयात्रा सरी गयी. हाऊ परसंग मुये महाराज गयरा दुखी व्हयनात. जास्त कामना याप, नी राणी न दुक मुये महाराजस्नी झोप गयी.. तेस्ले झोपमोड ना आजार जडी ग्या. तेस्नी तब्बेत बिघडत गयी. त्या अशक्त व्हत ग्यात, तेस्ना डाॅक्टरनी तेस्ले हबाबदल करा कराता इलायेत जाव्हाना सल्ला दिन्हा. तेस्ना युरोप ना दौरा न कारण हायी दुकच व्हत. 

         पाच सहा महिना महाराज गयरा नरवस व्हतात. महाराणी जमनाबाईसाहेब, नी बाकीना जेठा मंडईस्नी तेस्ले दुसर लगीन करता मनायी लिन्ह. तेस्नी सम्मती देव्हावर पोरीस्ना तपास चालू करा. देवास्ना सरदार घाटगे येस्नी आंडेर गजराबाई हायी वधू म्हनीसन पक्क कर. पसंती व्हवावर साधी पध्दत मजार महाराजास्न लगीन लागण. महाराज तब्बेत, स्वास्थ्य करता नयी महाराणी ना संगे काही दिन उटी नी अबु ले ह्रायन्हात. उटी ले व्हतात तव्हयच महाराणी तठे बायतीन व्हयन्यात तेस्ले आंडोर झाया. तेन्ह नाव जयसिंहराव आस ठेव. 

          पयली महाराणी चिमनाबाई येस्नी याद करा करता सुरसागर तलावनानजीक न्यायमंदीर नी गयरी मोठी देखावानी हायली बांधी. त्या हायली मजार उच्च न्यायालयनी स्थापना करी. हायी हायली गयरी मोठी, नी मोहक शे, नी बडोदान भुषण शे. महाराणी ना संगमरवरी पुतळा हायली ना गयर मोठ समागृहमजार बसाडा. त्या पुतळा ना खाले स्मृतीलेख कोरेल सशल शे, 'ह्या हायली तर्फे एक प्रेमळ पत्नी नी वत्सल माता व्हयेल महाराणी ना शांत, परोपकारी, नी मनमिळाऊ स्वभाव बद्दल वाटस म्हनीसन हायी आदरतुन स्मारक करानी मन्ही इच्छा शे' 

         उमामाय महाराजस्नी माय, ह्या बडोदा मजार रमण्यानहीत,तेस्ले राजवैभव पचन नही. बडोदाले तेस्न मन लागे नही. उमामाय नी अवचितरावस्नी माय नवलीबाई ह्या दोन तीन महिना फक्त बडोदाले ह्राहेत, बाकीना दिन त्या कवळाणालेज ह्राहेत. तठे तेस्ना कडे खंडोगणती गायी, ढोर व्हतात. दुधदुभतानी रेलचेल ह्राहे. नजीक ना कोणी नातलग जर बडोदा जाव्हाले निंघनात की, उमामाय महाराजस्ना करता गावठी तुपनी बरणी भरीस वाट लायेत. तेन्हा संगे तेस्नी तयार करेल करंज्या, सांजय्रा, रायत, पापड आसा पदार्थ धाडेत. महाराज आप्ला भाऊस्ना संगे जुनी याद करेत, नी गप्पा टप्पा करत करत त्या पदार्थ खायेत. 

         माय उमामाय नी महाराजस्न्या चुलत्या बडोदा मजारली शाही रितभात, नी पडता पध्दत नी सवय नही व्हती म्हनीसन त्या कटाई जायेत. सदानकदा तेस्ना चुका दाखाळेत  म्हनीसन तेस्ले आखळेल सारख वाटे. कवळाणा कडेज जाव्हा नी तेस्ले ओढ लागे, अहिरानी मजारल्या तेस्न्या गप्पा गयय्रा मज्यान्या ह्राहेत. 

      . उमामाय म्हणेत, "बडोदा मजार काय करमत नही माय! वावरात जानं नही, शिवरात जानं नही, येळान मायीक धरेल बांधेल सारख एक जागे बशी ह्राव्हो. तेवढ खिडकी वाटे बिटीबिटी पाहि ह्राव्हा. हाऊ ते कच्चा तुरुंग शे!, तेन्हावर नवलीबाई म्हणेत," हाव ना माय, कोणी म्हणस आठे बसु नका, तठे बसु नका. कोनी म्हणस मोठाईन बोलु नका, जीव कटाळी जास आठे! सोनाना बलका खाव्हाले मिळस, पण सोनाना पिंजरा म्हा ह्रान पडस", 

         महाराजस्नी परवानगी भेटनी का मंग त्या गयय्रा खुशीमा कवळाणाले जाव्हानी तयारी करेत. तठे ग्यात की पाहुनास्ना पावनच्यार मजार त्या गुंग व्हयी जायेत. बडोदा न्या राजवैभव न्या गोटम्हा त्या गुंग व्हयी जायेत. तठला बठ्ठा कारभार निंबाळकर समायेत. त्या येले महाजस्नी माय उमामायले पत्र लिखेल व्हत. तेन्हा वरथाईन तेस्ना इचार कयतस. ते पत्र मव्हरे शे... 

                                 बडोदा 

                     मकरपुरा पॅलेस 

                        दिनांक १८ ८९ 

तीर्थरूप, गंगारुप मातोश्री आईसाहेब, मुक्काम कवळाणे, ता मालेगाव जि नाशिक 

वडिलांच्या सेवेशी अपत्य बालके सयाजीराव गायकवाड यांचा दोन्ही कर जोडुन त्रिकाळचरणी मस्तक ठेवुन कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार. 

    चि विजयीभव फत्तेसिंहराव व जयसिंहराव यांची, आमची इकडील सर्वांची तब्बेत चांगली आहे. आपणही प्रकृतीची काळजी घेणे. आपणास पंढरपूर जायचे असल्यास नात्यातील चांगली माणसे बरोबर घ्यावीत. त्यांचाही खर्च आपणच करावा. निबांळकरांना बरोबर नेल्यास आम्हांला काळजी राहणार नाही. पंढरपूरहुन आल्यावर सहस्रभोजन करावे. त्यानंतर बडोद्यास निघुन येणे. बाळराजे फत्तेसिंहराव आपली आठवण करतात. आपल्या कडील कुशल कळविणे. 

                 आपला आज्ञाधारक 

                     सयाजीराव 

*क्रमशः*

         (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

     ..... सुरेश पाटील 

     ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार भाग २४.

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*.        

*भाग २४......*

महाराज, महाराणी चिमणाबाई, मातोश्री जमनाबाईसाहेब हायी बठ्ठ राजघराणी जुना राजवाडा मजार ह्राहेत. काशिराव बाबा, उमामाय, नी बाकीना नमस्कार परिवार मातर सामने ना वाडा मजार ह्राहेत. तेस्ना रोजना कार्यक्रम ठरायेल ठरायेल ह्राहे. रामपायटा मजार आंग धोन, मंग कसरत, मंग न्यारी, मंग दोन तास मजार वाचन बिचन झाये की ११ वाजता जेवण करेत, नी मंग सरकारी काम तीन ते च्यार तास करेत, ते झाय की येल लोकस्न्या भेटी गाठी करेत, दिनमाव्हतले फिराले जायेत, फिरी उन्हात की मयतर मंडइ संगे गप्पाटप्पा करेत, मंग जेवण करेत, जेवण झाय की दोन तास वाचन करेत नी ११ वाजता जपी जायेत. सयर पासुन दुर मकरपुरा पॅलेस मजार राव्हाले जाव्हावर महाराज आले १८८३ मजार पयला आंडोर झाया. तव्हय हत्तीवर बशिसन साखर वाटी. राजपुत्रा न नाव फत्तेसिहराव आस ठेव. दान धर्म करीसन आनंद मनाया.

महाराजस्ना संगे मानकरी म्हनीसन आनंदराव गायकवाड, माधवराव गायकवाड, दादासाहेब गायकवाड, केशवराव सावंत, गजाननराव शेवाळे नी खंडेराव पवार हायी मंडई ह्राहे. महाराजास्ना नजीक ह्राहीसन तेस्न्या सुखसोयीस्वर देखरेख ठेवान, तेस्न बठ्ठ नेम्मन चालु शे का नही हायी दखण ह्या काम हायी मानकरी मंडई करे. महाराजस्ना संगे खेय मजार भाग लेव्हाना, करमणुकी मजार भाग लेव्हान, तेस्ना संगे जेवण करण, राजवाडा मजार राव्हान, आसा तेस्ना नित्तनेम व्हता. ह्या पैकी बराज जणी आडानी व्हतात म्हनीसन महाराज कोणत पुस्तक वाचतस ते ध्यान मजार ठेवान. तारा, पत्रा उणात म्हणजे मव्हरली येवस्था करण, महाराजस्नी लिखेल पत्रा धाडन, येल पाव्हणास्नी येवस्था करण, आसा कामस मजार खास करीसन तेस्ना उपयोग व्हये. तस तेस्न बोलणबी असुद ह्राहे. आनंदराव बडोदा सयर मजार फिरेत तव्हय रस्तावर पाणी न्या डाबा भरेल ह्राहेत. त्या डाबा दकिसन त्या म्हणेत, "बडोदामा समदीकडे डाबोल्ला हायेत," आस तेस्न मराठी व्हत. महाराजस्नी सारखी शिकानी तेस्नी दानत नही व्हती. मातर ह्या लोक महाराजस्ना नखजिव्हा यीना व्हतात, तेस्ना मुये महाराजस्नी करमणूक व्हयी जाये. महाराज खुशीमा ह्राहेत तव्हय तेस्ना भासा गजाननराव शेवाळे येस्ले मोटेवरचे गाण, खंडाबान गाण, लगीन ना पंगत मजार व्हयेत त्या क्ष्लोक गायान काम सांगेत, कव्हय मव्हय रंगमा ह्रायन्हात की, आप्ली माय उमामाय ना संगे अहिरानी बोलेत, तेस्नी खेसर करेत, राजवाडा मजार, आबुदाबी, इटु दांडू खेत, मज्या मस्ती करेत म्हनीसन त्या सदा प्रसन्न ह्राहेत.

         महाराजास्न सिक्सन शायनी पध्दतप्रमाने सर्वांगीण नही व्हयेल मुये व्यवहार मजार गयय्रा आडचनी पयदा व्हयेत. व्यवहारी अपूर्णांक, वजन, मापे, हिशोब ह्या महाराजस्ना कच्चा राव्हा मुये काही धाकल्ला मोठ्ठ्या चुका तेस्न्या व्हयेत. ह्या इषय मोठाव्हवावर त्या जाणीबुजीसन शिकणात. तीनचर्तुथांश, पाच सप्तामांश, ह्या सबद्स्ना तेस्ले बोध व्हये नही, सरदेसाईस्नी तेस्ले हायी मांगताईन शिकाड. शिके तव्हय त्या बारीक सारीक गोष्टीस्नी पारक करेत आप्ली चुकी व्हव्हाले नको म्हणीसन गयरी कायजी लेत. महाराज रोज तेस्नी नित्यक्रम नी वही लिखेत. ह्या वहीना बाबत मजार एक सावा माधवराव गायकवाड येस्नी महाराजस्ले इचार, "आपीन रोज बारीक सारीक गोष्टी लिखी काडतस तेन्ह महत्व काय सशल शे,? " तव्हय महाराज बोलणात, "आश्या गोष्टी लिखीसन ठेयात म्हणजे जुनी याद जित्ती ह्रास, तेस्ना संगे आपल्या भावना जुडेल ह्रातीस. कव्हय मव्हय ह्या बारीक सारीक गोष्टीस्ले इतिहास मजार महत्व यी जास. उदाहरण देवान झाय ते, आप्ला वाडवडिलस्नी नाशिक नी तिरमेकेश्वर तीर्थस्ले भेटी देल शेत, तेस्नी नोंद तठला बाम्हणस्नी चांगली पध्दत मजार लिखी ठेल व्हती, तेन्हामुयेच आप्ल कवळाणा न घरान बडोदा न राजघराण एकच शे हायी सिद्ध करता उण. म्हणीसन आप्ला भाग्योदय घडान मांगे नाशिक नी तिरमेकेश्वर ना बाम्हणस्ना सिव्हाना वाटा शे आस मी मानस, ते लिखी ठेल नोंदीज आपले कामले उन्ह्यात, म्हनीसन आपला खरा भाग्यविधाता ह्या बाम्हन शेत. 

            बडोदाले महाराज खान्देश म्हायीन जाव्हा मुये सुरवात पासुन तेस्न मन बडोदा ना येव्हार मजार अलिप्त व्हत. तेन्हा मुये तेस्ना सभाव चौकस बनत गया, कोणज मन नही दुखावता त्या परिवार नी राजकारभार मजारला मंडईसना मन समायी लेत. तेस्ना इचार समजी लेवानी सवय पाडी. कटकारस्थानी, चुगलीखोरस्न काहीच चाले नही. नाताना लोक, नी नोकरचाकर येस्ना संगे कामापुरता संबंध ठीसन त्या आप्ला मन ना ठाक्या कोणलेज लागु देत नही. केणतीबी गोटनाबारामा आप्ल मत बनावर बी, आजुन काही नवीन माहिती नियानी आग्रह न करता दिलखुलास पणानी आप्ल मत बदली करेत. राजाजी इठ्ठल पुणावालाले राजवाडा ना हापीसर बनायेल व्हता. हाऊ माणुस सज्जन नी निपापी व्हता. पण तेस्ना चांगुलपणा ना फायदा तेस्ना हात खालना लोक लेत. नी लबाड्या करेत. तस युरोपियन लोकस्न्या भेटीगाठी, नी जेवण नी येवस्था जुना आधिकारीस्ना हात वरी नेम्मन नही व्हये. म्हणीसन पेस्तनजी येस्ले खाजगी कारभारी म्हनीसन नेम. तेन्हा पयले तेस्नी आप्ला खान्देश मजार कवळाणा गावले आनंदराव येस्ना करता वाडा न काम बांधाले सुरवात करेल व्हती. तेन्हावर देखरेख करा करता पेस्तनजी येस्नी नेमणूक करेल व्हती. ते काम तेस्नी मोठी कायजी लिसन खंडाळवाला ह्या ठेकेदार कडथाईन करी लिन्ह. म्हणीसन महाराजस्नी तेस्ले आजुन आप्ला नजीक कर. १८८५ ले वाडा न बांधीसन झायावर घरशांती ना निमितथाईन आंगेपांगेना बठ्ठा खेडास्ले पुरणपुयी न जेवण दिन्ह. तव्हय सोता उमामाय हाजीर व्हत्यात. चुलत भाऊस्ना करता बी वाडा बांधी दिन्हा. त्या दोन ताल ना वाडा आज बी रुबाब मजार उभा शेत. पण इतला मोठा शेत, तठे धाकल्ला परिवार राहु शकतस नही, त्या घाबरी जातीन. मुख्य वाडा उजाड व्हयी जायेल शे, पण त्या वाडानी जुन्या आठवणी जित्त्या ठेल शेत. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...