*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*.
*भाग २४......*
महाराज, महाराणी चिमणाबाई, मातोश्री जमनाबाईसाहेब हायी बठ्ठ राजघराणी जुना राजवाडा मजार ह्राहेत. काशिराव बाबा, उमामाय, नी बाकीना नमस्कार परिवार मातर सामने ना वाडा मजार ह्राहेत. तेस्ना रोजना कार्यक्रम ठरायेल ठरायेल ह्राहे. रामपायटा मजार आंग धोन, मंग कसरत, मंग न्यारी, मंग दोन तास मजार वाचन बिचन झाये की ११ वाजता जेवण करेत, नी मंग सरकारी काम तीन ते च्यार तास करेत, ते झाय की येल लोकस्न्या भेटी गाठी करेत, दिनमाव्हतले फिराले जायेत, फिरी उन्हात की मयतर मंडइ संगे गप्पाटप्पा करेत, मंग जेवण करेत, जेवण झाय की दोन तास वाचन करेत नी ११ वाजता जपी जायेत. सयर पासुन दुर मकरपुरा पॅलेस मजार राव्हाले जाव्हावर महाराज आले १८८३ मजार पयला आंडोर झाया. तव्हय हत्तीवर बशिसन साखर वाटी. राजपुत्रा न नाव फत्तेसिहराव आस ठेव. दान धर्म करीसन आनंद मनाया.
महाराजस्ना संगे मानकरी म्हनीसन आनंदराव गायकवाड, माधवराव गायकवाड, दादासाहेब गायकवाड, केशवराव सावंत, गजाननराव शेवाळे नी खंडेराव पवार हायी मंडई ह्राहे. महाराजास्ना नजीक ह्राहीसन तेस्न्या सुखसोयीस्वर देखरेख ठेवान, तेस्न बठ्ठ नेम्मन चालु शे का नही हायी दखण ह्या काम हायी मानकरी मंडई करे. महाराजस्ना संगे खेय मजार भाग लेव्हाना, करमणुकी मजार भाग लेव्हान, तेस्ना संगे जेवण करण, राजवाडा मजार राव्हान, आसा तेस्ना नित्तनेम व्हता. ह्या पैकी बराज जणी आडानी व्हतात म्हनीसन महाराज कोणत पुस्तक वाचतस ते ध्यान मजार ठेवान. तारा, पत्रा उणात म्हणजे मव्हरली येवस्था करण, महाराजस्नी लिखेल पत्रा धाडन, येल पाव्हणास्नी येवस्था करण, आसा कामस मजार खास करीसन तेस्ना उपयोग व्हये. तस तेस्न बोलणबी असुद ह्राहे. आनंदराव बडोदा सयर मजार फिरेत तव्हय रस्तावर पाणी न्या डाबा भरेल ह्राहेत. त्या डाबा दकिसन त्या म्हणेत, "बडोदामा समदीकडे डाबोल्ला हायेत," आस तेस्न मराठी व्हत. महाराजस्नी सारखी शिकानी तेस्नी दानत नही व्हती. मातर ह्या लोक महाराजस्ना नखजिव्हा यीना व्हतात, तेस्ना मुये महाराजस्नी करमणूक व्हयी जाये. महाराज खुशीमा ह्राहेत तव्हय तेस्ना भासा गजाननराव शेवाळे येस्ले मोटेवरचे गाण, खंडाबान गाण, लगीन ना पंगत मजार व्हयेत त्या क्ष्लोक गायान काम सांगेत, कव्हय मव्हय रंगमा ह्रायन्हात की, आप्ली माय उमामाय ना संगे अहिरानी बोलेत, तेस्नी खेसर करेत, राजवाडा मजार, आबुदाबी, इटु दांडू खेत, मज्या मस्ती करेत म्हनीसन त्या सदा प्रसन्न ह्राहेत.
महाराजास्न सिक्सन शायनी पध्दतप्रमाने सर्वांगीण नही व्हयेल मुये व्यवहार मजार गयय्रा आडचनी पयदा व्हयेत. व्यवहारी अपूर्णांक, वजन, मापे, हिशोब ह्या महाराजस्ना कच्चा राव्हा मुये काही धाकल्ला मोठ्ठ्या चुका तेस्न्या व्हयेत. ह्या इषय मोठाव्हवावर त्या जाणीबुजीसन शिकणात. तीनचर्तुथांश, पाच सप्तामांश, ह्या सबद्स्ना तेस्ले बोध व्हये नही, सरदेसाईस्नी तेस्ले हायी मांगताईन शिकाड. शिके तव्हय त्या बारीक सारीक गोष्टीस्नी पारक करेत आप्ली चुकी व्हव्हाले नको म्हणीसन गयरी कायजी लेत. महाराज रोज तेस्नी नित्यक्रम नी वही लिखेत. ह्या वहीना बाबत मजार एक सावा माधवराव गायकवाड येस्नी महाराजस्ले इचार, "आपीन रोज बारीक सारीक गोष्टी लिखी काडतस तेन्ह महत्व काय सशल शे,? " तव्हय महाराज बोलणात, "आश्या गोष्टी लिखीसन ठेयात म्हणजे जुनी याद जित्ती ह्रास, तेस्ना संगे आपल्या भावना जुडेल ह्रातीस. कव्हय मव्हय ह्या बारीक सारीक गोष्टीस्ले इतिहास मजार महत्व यी जास. उदाहरण देवान झाय ते, आप्ला वाडवडिलस्नी नाशिक नी तिरमेकेश्वर तीर्थस्ले भेटी देल शेत, तेस्नी नोंद तठला बाम्हणस्नी चांगली पध्दत मजार लिखी ठेल व्हती, तेन्हामुयेच आप्ल कवळाणा न घरान बडोदा न राजघराण एकच शे हायी सिद्ध करता उण. म्हणीसन आप्ला भाग्योदय घडान मांगे नाशिक नी तिरमेकेश्वर ना बाम्हणस्ना सिव्हाना वाटा शे आस मी मानस, ते लिखी ठेल नोंदीज आपले कामले उन्ह्यात, म्हनीसन आपला खरा भाग्यविधाता ह्या बाम्हन शेत.
बडोदाले महाराज खान्देश म्हायीन जाव्हा मुये सुरवात पासुन तेस्न मन बडोदा ना येव्हार मजार अलिप्त व्हत. तेन्हा मुये तेस्ना सभाव चौकस बनत गया, कोणज मन नही दुखावता त्या परिवार नी राजकारभार मजारला मंडईसना मन समायी लेत. तेस्ना इचार समजी लेवानी सवय पाडी. कटकारस्थानी, चुगलीखोरस्न काहीच चाले नही. नाताना लोक, नी नोकरचाकर येस्ना संगे कामापुरता संबंध ठीसन त्या आप्ला मन ना ठाक्या कोणलेज लागु देत नही. केणतीबी गोटनाबारामा आप्ल मत बनावर बी, आजुन काही नवीन माहिती नियानी आग्रह न करता दिलखुलास पणानी आप्ल मत बदली करेत. राजाजी इठ्ठल पुणावालाले राजवाडा ना हापीसर बनायेल व्हता. हाऊ माणुस सज्जन नी निपापी व्हता. पण तेस्ना चांगुलपणा ना फायदा तेस्ना हात खालना लोक लेत. नी लबाड्या करेत. तस युरोपियन लोकस्न्या भेटीगाठी, नी जेवण नी येवस्था जुना आधिकारीस्ना हात वरी नेम्मन नही व्हये. म्हणीसन पेस्तनजी येस्ले खाजगी कारभारी म्हनीसन नेम. तेन्हा पयले तेस्नी आप्ला खान्देश मजार कवळाणा गावले आनंदराव येस्ना करता वाडा न काम बांधाले सुरवात करेल व्हती. तेन्हावर देखरेख करा करता पेस्तनजी येस्नी नेमणूक करेल व्हती. ते काम तेस्नी मोठी कायजी लिसन खंडाळवाला ह्या ठेकेदार कडथाईन करी लिन्ह. म्हणीसन महाराजस्नी तेस्ले आजुन आप्ला नजीक कर. १८८५ ले वाडा न बांधीसन झायावर घरशांती ना निमितथाईन आंगेपांगेना बठ्ठा खेडास्ले पुरणपुयी न जेवण दिन्ह. तव्हय सोता उमामाय हाजीर व्हत्यात. चुलत भाऊस्ना करता बी वाडा बांधी दिन्हा. त्या दोन ताल ना वाडा आज बी रुबाब मजार उभा शेत. पण इतला मोठा शेत, तठे धाकल्ला परिवार राहु शकतस नही, त्या घाबरी जातीन. मुख्य वाडा उजाड व्हयी जायेल शे, पण त्या वाडानी जुन्या आठवणी जित्त्या ठेल शेत.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा