गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार भाग.. २७

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २७*

चिंधा जे बोली गया, तेन्हावर महाराज इचार कराले लागी ग्यात. हुजरा चिंधाना करता पोशाख न ताट लिसन उन्हा. चिंधाले महाराजस्नी मानपान मा पोशाख दिन्हा नी पयस्नानी मदत बी कयी. चिंधाना पोंगोट बांध, नी समदास्ले राम राम ठोका. दिनमाव्हतले महाराजस्ना संगे जेवण कय. तिसरा तालनी गच्चीवर गायकवाड मंडई चिंधाना संगे गप्पाटप्पास्मा गुंग व्हयगी. धाकल पण नी याद उन्ही, दिवाईले ढोरक्या पोर रातना येल्हे घरेघर जाईसन तेल मांगत भवडेत, त्या येले त्या गाण म्हणेत. ती याद दिसन महाराजस्नी चिंधाले गाण म्हणान आग्रोव्ह करा. त्या रातले नीरव शांती मजार चिंधान गाण आयकीसन गायकवाड बंधु भुतकाय मजार चालना ग्यात.

             चिंधानी म्हणेल गाण,

    मनी कपिली गाय तु बरवी

     दुध भरोनी देत असे चरवी 

     नारबा चरततसे डोंगरी //          

     मनी कपीली गायन तोंड 

       जशं कपाशीनं बोंड 

       मनी कपीली गायन्या मांड्या

जश्या पालखीन्या दांड्या 

मनी कपीली गायनी शेप

  जशी नागीन मारे झेप 

  मनी कपीली गाय तू बरवी 

  दुध भरोनी देतसे चरवी 

  नारबा चरतसे डोंगरी //

दिन दिन दिवाळी 

  गायी म्हशी ववाळी

   गायी कुणाच्या

   लक्षुमनाच्या //

महाराज गुंग व्हयसीन आयकी ह्रायनंतात. तेस्ना आंतरमन ना डोयास्मा धाकलपन दिसाले लागी गये. 

         पोशाख ना बाब मजार महाराजस्ले साधपन जास्त आवडे. धाकलपणे राजानी गादीवर येव्हावर जुनी रितभातनुसार मखमली, नी सॅटीनना भरजरी कपडा त्या वापरेत. पण जस जस वय वाढाले लागन तसा तेस्ना पोशाक मजार साधा पणा उन्हा.जितला साधा पणानी तेस्ले आवड व्हती, तितलाच निटनेटक पण, नी स्वच्छता नी आवड व्हती. कपडासवर एक बी डाग, एक बी चुनी नही आवडे. तेस्ले गयरा स्वच्छ धव्याबरप कपडा आवडेत. परतेक नी आप्ला येवसाय नुसार शोभादीन आसा कपडा घालाले पाहिजे. आसा तेस्ना आग्रोव्ह बी राहे. दरबार ना येल्हे बठ्ठास्नी खास पोशाख मजारच येव्हान हाऊ नियम व्हता. महाराजस्ले भेटाले जान व्हयीन तव्हय बी अमुकज पोशाख त्या व्यक्तिना पायजे म्हणजे पायजे आसा रिवाज व्हता. खान्देश ना पाहुणा जव्हय बडोदा मजार जायेत तव्हय तेस्ले, महाराजस्नी भेटना पयले खानगीतर्फे पोशाख देत. तेन्हा मजार धोतर, चुन्या पाडेल कुडची, पांगोट नी उपरन आस देत. गावठी पोशाख तेस्ले गयरा आवडेत. परतेक नी आप्ला गावठी म्हणजे देशी पोशाखज घालो आसा तेस्ना आग्रोव्ह राहे. युरोपीय पोशाख कचेरी मजार ह्रायन्हात ते चालीन आस तेस्न मत ह्राहे. सोताना पोशाख बी गयरा साधा नी टापटीप ह्राहे. सदा साधा नी धव्याबरप लांबा आंगरखा, सुरवार, काया मोजा नी काया जुत्ता, गायकवाडी खान्देशी पांगोट नी हातमजार बांडुक असा तेस्ना पेहराव ह्राहे. कव्हय मव्हय आस बी वाटस की, तेस्ले खान्देश नी माटीनी याद येत व्हयीन म्हनीसन हाऊ पेहराव तेस्ले आवडे हुयीन. मोठलपने खास व्हयकीना माणूस 

  नजीक जरी ह्रायन्हा तरी सहसा त्या आप्ल पांगोट उतारे नहीत. आप्ला खान्देशी पांगोटाना तेस्ले गयरा आभिमान व्हता. हवा उष्ण राव्हावर सुरवार, कुडता आसा पेहराव करीसन राजवाडा मजार त्या फिरेत जेवण ना येल्हे त्या कामना येना पेहराव करेत. तेस्ना संगे कितलाबी नखजिवाइना माणुस राव्हो, तेन्ही बी पेहराव मजारज राव्हाले जोयजे आशी तेस्नी शिस्त ठेल व्हती. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकीपना हायी सवय तेस्ले तेस्ना गुरुजी प्राचार्य इलियट नी युरोपीयन लोकस्नी संगतमुये जडेल व्हती. महाराजस्ना सहवास मजार येल लोकस्ले हायी सवय आंगे लागी जायेल व्हती. धाकलपणे तेस्ले कवळाणाथाईन बडोदा आण व्हत तव्हय ह्या सवयी आंगे नही व्हत्यात. तेस्नी एक याद गयरी मज्यानी शे, ती आयका सारखी शे. महाराजस्न दुसर लगीन आते आतेच व्हयेल व्हयेल व्हत. महाराज जपेल व्हतात तव्हय तेस्ना पायले खाज सुटनी, खाज थांबान नाव ले नही. तव्हय तेस्नी महाराणीले धीरेज हाक मारीसन उठाव. चिमनाबाईस्नी दिवा लायीसन तेस्ना पाय तपासात, तव्हय पायना बोट गंघा व्हतात, तेस्ले माटी लागेल व्हती. लगेच तेस्नी महाराजस्ले इचार, "तुम्ही आंग धोतस तव्हय हातपाय नेम्मन धोतस नही का?," महाराज बोलणात, "पाणीना भरेल चांदीना हौद पाणीना भरेल ह्रास, तेन्हामा मी बसस. माणस आंग वर पाणी टाकतस. मी काहीबी करत नही. माल्हे हायी कोणीज सांग नही. पाणी म्हाईन उठुन की, जाडाजट गुबगुबीत रुमाल आंववर गुंढायीसन मी बाहेर निंघस. आंग चुयीसन धोण, आंग पुसन, बठ्ठ आंग पुसी टाकानी सवय आंगे लागेलच नही व्हती. म्हणीसन चिमनाबाई तेस्ले खेसरमा बोलण्यात, "हायी वयन धाकलपनेज लागाले जोयजे, नी त्या मोठलपने वयन लाव्हान म्हण ते लागाव नही." तव्हय पासुन रोज दिनमाव्हतले चिमनाबाई महाराजस्ना पाय गरम पाणीवरी धुयी काढेत. 

         महाराजस्ना पेहरावराव नी देखभाल करता खास माणस ह्राहेत. कोणता परसंग ले महाराज कोणता पेहराव करतीन येन्ह तेस्ले ग्यान ह्राहे. महाराज ज्या कामना करता बाहेर जाणार शेत, तसा तेस्ले लागीन तसा पेहराव तयार ठेवान, महाराजस्ना आंगवर नामी पद्धत मजार कपडा घालान, पायमोजा घालान, जुत्तास्ना बंद बांधान, रत्नस्ना पदक कोटवर नेम्मन लावान, पांगोट, काठी, आणी आखो बठ्ठ नवकर तयार ठेत. नी महाराज बाहेरथाईन उनात की, तेस्ना आंगवरना कपडा काढाना, कपाट मजार ठेवाना, घरगुती कपडा आंगवर घालान, शिपाकडथाीन शियेल कपडा आनान काम बी ह्या नेमेल नवकर करेत. ह्या कामाकरता तेस्ले इंग्रज नवकर आवडेत. उतार वय मजार प्रवासमा पुस्तक, काठी, पांगोट महाराज इसरी जायेत. ते उचलीसन नवकर महाराज कडे देत, तव्हय महाराज म्हणेत, "अरे म्हन काम माल्हे करु द्या, माल्हे तुम्ही परलांबी नका करु," तव्हय तेस्ना ए डी सी नी बाकीना आधिकारी म्हणेत, "हायी काम नवकरस्न शे, ते तेस्ले करु द्या, त्या काम करता ते तेस्ले ठेल शे," 

            राजवाडा मजारला हर दालन मजारला गालिचा, टेबलवरना कपडा, दारखिडकिस्ना परदा, पलंगपोस, पंघराना कपडा, टांगेल झुंबर हायी भलत नामी स्वच्छ ह्राहेत.. 


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...