*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*
*भाग.. २६*
राजाना परिवार मकरपुरा मजार असतांना ३१ जुलै १८९० ले शिवाजीराजास्ना जनम झाया. मंग १८९१ पासुन राजाना परिवार लक्ष्मी पॅलेस मजार राव्हाले ग्या. पण इतला मोठा राजवाडा राव्हाना कामना नही आस महाराजस्ले वाटे. एक पत्र मजार त्या बोलतस, "लक्ष्मी पॅलेस हाऊ राजवाडा गयरा भव्य शे, पण माणसस्ले राव्हा सारखा नही शे, तठे राहनारस्न्या सोयी सुविधासन दुर्लक्ष करेल शे. उदाहरण देवा न झाय ते मन्ह्या खोल्या नजीक नजीक पाहिजे व्हत्यात, त्या दूर दूर इसकळेल शेत. तेन्ही भव्यता हायीज हेळसांड शे, वाचानी खोलीम्हायीन जपानी खोली लगुन भिडस तवशी मन्ही जपमुडी जास. माल्हे कव्हय मव्हय जप लागत नही. तयमय करत पडत ह्रास. तेन्हामुये गयरा तरास व्हस. तसच गंजय राव्हानायोग्य सोयी ह्या वाडामजार बांधान्या ह्राही ग्यात, तस दख ते गुजरात हावु तापमान ना वरदेश शे तेन्हामुये वाडा न काम दगड मजार बांधाना पेक्षा इट मजार कराले जोयजे व्हत. माल्हे कव्हय मव्हय वाटस हायी इतली मोठी हायलीमजार पोरीस्ना करता काॅलेज चालु करो, नी आपीन बाजुले मस्त टुमदार बंगला बांधी लेव्हो. "
लक्ष्मीविलास पॅलेस मजार राव्हाले येव्हावर १ मार्च १८९२ ले राजकन्या इंदिराराजे येस्ना जनम झाया. एक वरीस नंतर चौथा आंडोर धैर्यशीलराव येस्ना जनम बडोदालेच झाया.
तेन्हानंतर दुकना प्रसंगस्नी मालिका चालू झायी. १८९४ ले अल्पशा आजारमुये उमामाय बडोदालेच हायी जगदुन्या सोडी ग्यात. उमामायले सतेगते लायी उन्हात नी, महाराजस्ना बाजुले तेस्ना भाऊ, चुलतभाऊ बशेल व्हतात तव्हय मायनी याद मजार तेस्ना हुंदका भरी उन्हा तव्हय त्या बोलनात, "मन्ही अडाणी मायनी मन्हावर कितला तरी चांगला सवसकार करात, परोपकार, दयाबुद्दी, ह्या गुण मन्हा मनवर उतारात, माल्हे शेवटलगुन गोपाळ म्हणणारी मन्ही पिरमनी व्यक्ती कायमनी माल्हे सोडी गयी,"
जरासा दिनमजार लगेच बहिण ताराबाबायेस्नी तब्बेत खराब व्हयनी,नी काही दिनमजार सावंतवाडी ले देवबाले आवडी ग्यात. तेन्हामुये महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी आंडेरना धसका लिन्हा, त्या बी गयय्रा आजारी पडण्यात. पुणाले डाॅ आण्णासाहेब पटवर्धन येस्नी आवसद पाणी कर. मंग त्या बडोदाले उन्यात. तेस्नी तब्बेत गयरी खंगरी गयी, नी तेस्नी बी २९ नोव्हेंबर १८९८ ले आखरी श्र्वास लिन्हा. आप्ल नशिब घडवणारी व्यक्ती गयी म्हणीसन महाराजस्ले गयर दुक झाय. पण राजाले बठ्ठ पचाडन पडस.
राजपररिवार मजारला बठ्ठा नातागोताना लोकस्ले महाराज सारखा वागेत. बडेदाना माजी महाराज मल्हारराव येस्ना तरणा आंडोर मरी ग्या, लगेच मल्हारराव ग्यात, नी लगेच काही दिन मजार तेस्नी पयली बायको गयी, पण दुसरी बायको पार्वताबाई येस्नी देखभाल, आर्थिक मदत महाराज येस्नी कर, तिस्ले मानसन्मान दिन्हा. म्हणीसन महाराजस्न मोठपन नी आठे वयख व्हस.
आप्ली मयतरी मजार महाराज धाकला मोठा आसा फरक करेतच नहीत, कवळाणा ले तेस्ना बालमित्र चिंधा भिल व्हता, ढोर चारापासुन तो तेस्ना मयतर व्हता.. महाराज बडोदाले येव्हावर तेस्नी भाऊबंदकी, नातगोत, सगासायी, बठ्ठा बडोदाले राव्हाले यी जायेल व्हतात. पंधरा सोया वरीस उलटी जायेल व्हतात, चिंधा भिल मातर आजुन बडोदाले भिडेल नही व्हता. महाराजस्ले मजार मजारमा तेन्ही याद ये चिंधा ले बडोदाले आनानी महाराजस्नी येवस्था करी. श्रीमंत संपतराव येस्ना कडे चिंधाना मुक्काम व्हता. दुसरा दिन राजवाडाम्हायीन तेल्हे धोतर, कुडची, पांगोट, जुत्ता असा मानपान ना पेहराव धाडा. कारण महाराजस्ले भेटणारास्ना पेहराव ठरेल ह्राहे. त्या दिन कपडा आंगवर चढायीसन चिंधा दादासाहेब, नी संपतराव येस्ना संगे लक्ष्मीविलास पॅलेस कडे जाव्हाले निंघनात, संगे दोन हजार हुजरा व्हतात. राजवाडाना बाजुले गयरी मोठी जागा व्हती, बगीचा व्हता, बाग मजार मेरस्ना आवाज, इकडे तिकडे उड्या मारणारा वांदर, राजवाडाना आभायल् भिडणारा मनोरा,गयर मोठ दालन, गॅलय्रा, लुसलुशीत गालिचा, शोभना पुतळा, हायी बठ्ठ चिंधा आचंबा करीसन दखे. भव्य दिवाणखाना मजार महाराज चांदीना सिव्वासन वर बसीसन पुस्तक वाचत बशेल व्हतात. मानकरी नी हुजराकरी चिंधाले महाराजस्ना दिवाणखाना मजार लयी ग्यात. चिंधाले शिकाडेल व्हत महाराजस्ना कडे जावावर मुजरा कसा कराना, महाराजस्ले दखताच चिंधा बठ्ठा शिष्टाचार इसरी गया, नी तोंडम्हाइन उच्चार व्हयना, "तुमी ते उच्ची जागावर जायीबसनात हो," महाराजस्नी हाशी दिन्ह, नी तेल्हे बाजुना आसनवर बसाडीसत महाराज बोलणात, "तु कव्हळ उन्हा?",
, "कालदीन वनु, "आसनवर सरमाव्हत सरमाव्हत बशीसन चिंधा बोलणा.
"कस काय चालनंस तुन्ह?," महाराज बोलणात.
"मनी मजा शे, पोय्रा लोकस्न कामतं जातंस, त्या मजा करतस, एक उलसा शे तो गायी वाळस, एक पोर व्हती, तिन लगीन करी टाक, गडी आते च्यारी पाय मोक्या स, "चिंधा बोलणा.
" काम काय करस तु?."
"मी गावनी जागल करस"
, "बर पिकपाणी कस काय शे आप्ला कडे? "महाराज बोलणात.
, "ते नका इचारु महाराज, पिकस्न्या व्हळ्या शेतीस, त्यासकडे पाव्हत नही, आपण ज्या डाबल्ला मजार आंग धुवुत तेन्हा मजार पाणी नही "
" मंग गायी, म्हशीस्ना चारा न कसकाय?"
"गवत ना खकाना हिसळी गया, गायी, बैल, म्हशी डांगात पवसाडी दिधात"
" आरे, आरे "महाराज हळहळनात.
"तुम्हणी मातर मजा दखावत मातं, तुम्न इष्टन बारदान आप्ला गावना समदा लोकस्थीन भारी शे ", चिंधा बोलणा.
" हा, शे खर "महाराज बोलणात.
"पण हायी जलमभर आशेच ह्राई का. "चिंधा बोलणा. चिंधाना आखरी सवाल आयकीसन महाराज धीरगंभीर व्हयनात. त्या शुन्य नजम्हायीन दखाले लागणात. ब्रिटिश राजसत्ताना अंकुश तेस्ना कलेजाले टोचायी गया. एक आडानी माणुस राजकीय अस्थिरता सहज बोली ग्या....
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील
९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा