*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*
*भाग.. २८*
नित्यनेम आहार नी फिरान (विहार) हायी तत्व महाराजस्ले पसंत व्हत. तेस्ना जेवण मजार इसड बी ह्राहे, नी साधा आहार बी ह्राहे. इसड त्या नेम्मनच खायेत. तेस्न आस म्हणण व्हत की, जर माणुस्ले तरतरी पाहिजे तर इसड खाव्हाले पाहिजे आस तेस्न मत व्हत. तेस्ना जेवण मजार एक खास गोट ह्राहे. तेस्ना सोनाना ताटमजार जरी पाचीपकवान वाढेल ह्रायन्ह तरी बी बाजरी नी भाकर ताट मजार ह्राहेज. बाजरीनी भाकर तेस्ले गयरी आवडे, शिवाय बाजरीनी भाकर मुये नादारीनी याद ह्राहीन आसा तेन्हस्ना हेतु बी ह्रावु शकस.
महाराजस्ना सचिव तात्या नेने येस्नी एक आनुभव लिखी ठेल शे. काही तरी गुपीत चर्चा करानाकरता माणिकराव महाराजस्ले मकरपुरा पॅलेस मजार भेटनात. संगे खासेराव जाधव, केशवराव देशपांडे, नी ताथ्या नेने व्हतात तठे पयले जेव्हाना बेत झाया. जेवाले बसावर ताथ्याना चेहरा पडी ग्या. महाराजस्नी त्या दिन जेवण ना बेत काय करो बर? बाजरीनी भाकर, कांदा, लोसन तीख, नी बेसन. नामी लोणी वाटीमजार व्हतच. बस्स तेवढा त्या जेवणले"राॅयल टच" महाराज बोलणात "रोज रोज हायी पाचीपकवान खायीसन इट येल शे, म्हनीसन जानीबुजीसन हाऊ बेत करेल शे" . तेस्नी मुद्दाम आढाऊपणा करीसन तात्यास्ले इचार, "तात्या बेत आवडना की नही?" बठ्ठाजन खिदीखिदी हसनात, तात्या सोताले सावरीसन बोलणात, "महाराजस्ना संगे जेवाले भेटन हाऊज माल्हे आनंद शे. "दखाले गे ते रांधेल पकवानज नंतर वाढात
मंग मातर आवडत जेवण दकीसन तात्यानी कयी खुलनी.
सयपाक मजार कोणकेणता पदार्थ पाहिजेत तेन्हा करता महाराणी चिमनाबाई ह्या सावध ह्राहेत. तिखा, कोशिंबीरनाआंबट चिंबट, गोडधोड आसा न्यारा परकार. महाराणी सोता ध्यान दिसन बनायेत. महाराजस्न वय वाढी जायेल व्हत, म्हनीसन महाराजस्ना सांधा दुखन चालु व्हयेल व्हत, नी गयर वाढी जायेल व्हत, म्हणीसन तेस्ना जेवण मजार सकस अन्न खाव्हाले पयले तेस्ले भाजीपाला खाव्हाले देत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा