*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*
*भाग.. २९*
"मन्ही जनता ना रथ मी आसा हाकलसु, जेन्हामुये जनताले जगन आनंद मजार व्हयीन."आस तरणा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज एक समारंभ मजार बोलणात. तेस्ना राज्य मजारली बहुसंख्य जनता खेती यवसाय करणारी व्हती. नसिबथाईन एक गरीब शेतकरीना आंडोर बडोदाना राजा व्हयना आणि जनता न नशिब फयफयन. महाराजस्नी साहजिकच खेती सुधारले जास्ती महत्व दिन्ह.
महाराजस्नी खेतीनी प्रतवारी ठरायीसन शेतसारा पक्का करा. नदिस्न पाणी आडायीसन धरण बांधात, तेन्हामुये बागाईत खेतीनी. वाढ झायी. दुस्कायमजार नादारीना शेतकरीस्ले हातले कामदीसन तेस्न्याच जमिनी शास्त्रीय पद्धत मजार सपाट करीसन नालाबल्डींगना काम तेस्ना कडथाईन सक्तीनी करी लिन्हात. जंगलतोड थांबाडीसन पडीत जमिनवर. नयी पद्धत मजार जंगलनी लागवड करी. खेतीन्या क्षेत्रामजारल्या प्रयोगशाळा बडोदा नी नवसारीले चालु कयात. शेतकरीस्ले नया. आवजार, हत्यार, खत, बियाण नी आखो बराच बाबत मजार प्रशिक्षण नी सल्ला देव्हान काम प्रयोगशायांस्नामार्फत महाराजसिनी चालु कय. दुस्कायमजार नादारीना शेतकरीस्ले शेतसारा माफ करीसन कर्जफेड थांबाडी दिन्ही नये बियाण, नी जंतूनाशकना वापर करानी पद्धत ना शेतकी खाता मार्फत परसार कया. महाराजस्नी प्रेरणामुये आणि आर्थिक मदतमुये १८८ा सालले बडोदा मजार सूतगिरणी चालु व्हयेल व्हती. तसच गणदेवी मजार भारत मजारला पयला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना चालु करेल व्हता. खेती ना यवसाय, नी कारखानदारी ह्या दोन्ही येरायेरस्ले कस पूरक शे, हायी महाराजस्नी प्रत्यक्ष तेस्नी क़ृतीम्हायीन सिद्ध कये.
कारभार चांगला करता यावा म्हनीसन महाराजस्नी पयलेज खेडापाडास्ना दौरा करीसन परिस्थिती समजी. लेल व्हती. महाराज शेचकरीस्न्या आडीआडचन तेस्ना तोंडे आयकीसन लगेच आधिकारीस्ले उपाय कराले सांगत. पयले गावखेडास्मा दौरा काढेत तव्हय महाजस्ना संगे गयरा मोठा लवाजमा ह्राहे. तेन्हामुये गयरा खर्च व्हये. पण काम काहीच व्हये नही. म्हणुन महाराजस्नी सोताना लवाजमा, थाटमाट कमी करीसन गरज पुरता सामान, कामनाच माणस संगे पायजेत आसा नियम करा. नी तो तंतोतंत पाया.
गावखेडास्मा दौराना येल्हे जनताले भाषण करतांना महाराज म्हणेत, "मन्ही जनता संतुष्ट राव्हाले पायजे नी मव्हरे मव्हरे तिन्हा सुखनी वाढ व्हत जावी, आशी मन्ही आंतरमन पासुन आमना शे जनतान कल्याण हायीज मन्ह कर्तव्य आणि तोच मन्हा मोक्ष शे. गावस्नी सुधारणा हाऊ मन्हा बठ्ठ्या सुधारणास्ना पाया शे.
हर गावमजार एक शाय, एक वाचनालय, एक व्यायामशाय, नी एक दवाखाना पायजेल हायी धोरण पक्क करीसन गावखेडासमजारली सामान्य जनताले नी शेतकरीस्ना इकास घडावानी सुरवात कयी. खेडास्मा कारभार चांगला चालो म्हनीसन त्याच लोकसमा कल्याणकारी योजनास मजार सामील करीसन ग्रामपंचायत नी तालुका पंचायती तेस्नी स्थापन कयात आणि लोकशाही पध्दत मजार निवडणुका लिसन पंचायत राज चालु कये. आपल्या योजनास्नी आम्मल १०० टक्का व्हावी म्हनीसन खेडय़ापाडास्मा जंगलजुंगलस्मा फीरीसन तपासणी करेत. तव्हय महाराजास्न वय २२ ते २३ वरीस व्हत. हायीच ग्रामसुधारनानी योजना महात्मा गांधीस्नी ग्रामीणदारास्ना स्वरुप मजार मव्हरे उचली धरी, नी तिन्हा भारतभर तयमयीनी परचार करा.
महाराजस्न्या शैक्षणिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, नी ग्रामसुधारणाना डंका बठ्ठी कडे वाजाले लागणा. तेस्नी किर्ती म ज्योतीबा फुले येस्ना कानवर पडनी. जोतीबांच्या. मनात ह्या तरणा राजाना बद्दल आदर नी काही अपेक्षा निर्माण झायात. त्या सोता महाराजस्ले भेटाले बडोदाले उन्हात. आप्ली भेट मजार तेस्नी महाराजस्ले जो उपदेश कया आज बी गयरा मुद्दाना वाटस. त्या बोलणात, "भारत सारखा कृषिप्रधान देशमजारला शेतकरी शिकेल सवरेल व्हवाबिगर शेतकरीस्नी उन्नती व्हणार नही. म्हणीसन शेतकरीस्ना पोरस्ले आधुनिक शेतीन तंत्रज्ञान पयदा करी देव्हो, नी तेन्हा करता देशी भाषास्मा पुस्तक छापाले जोयजेत. त्यामुये आधुनिक शेतीन ग्यान सहज मियीन. शेतकरीस्ना पोरस्ले शेतीन सिक्सन सक्तीन कराले जोयजे. शेतीना संगे तेस्ले जोडधंदा न सिक्सन बी देण गरजन शे. आसा तयार व्हयेल शेतकरीस्ना पोरस्लेच शिक्षक म्हनीसन नेमणूक करो. शेतकरी शाणा व्हवाले जोयजे म्हनीसन शेतीन उपयोगी ग्यान प्रयोगशायस्न्या च्यार भितीस्ना आडे न ठेवता ते शेतकरीस्ना दार मजार लयी जाईसन पिकस्न. नी जनावरस्न प्रदर्शन भरावाले जोयजेत., "महाराजस्नी जोतीबास्ना सत्कार कया. तव्हय जोतिबा बोलणात," खेतीना धाकल्ला धाकल्ला तुकडा व्हयी ह्रायन्हात नी मव्हरे तिन्हा कस बी कमी व्हयी ह्रायन्हा. आशी खेतीन संरक्षण करन. गयर गरजन शे. पावसाया ना पाणीमुये जमिन नी धुप व्हस. जमिन ना गय वाही जास. जमिनी पडीत व्हतीस म्हनीसन जमिनीस्ना बांधबंधारा बांधी लेव्हो. तेन्हामुये जमीन नी धुप थांबस. भारत सारखा शेती प्रधान देश मजार खेतीनी मशागत करता जनावरस्नी गरज शे, म्हनीसन पशुधन वाढावाले जोयजे, नी तेन्ह जतन कराले जोयजे. खेतीले जोडधंदा म्हनीसन गायी, म्हशी, बकरी, मेंढ्या पायानी गरज शे. परदेशथाईन चांगला पशुस्नी आयात कराले जोयजे. जनावरस्ले चरा फुकट शेतकरीस्ले जंगल देवाले पाहिजे. लाकुडतोड ना कायदा कराले जोयजे. म्हणजे ढोरस्नी चरान कुराण नाश व्हवाव नही. नी जंगलतोड नही झायी तर देव ना पाणी बी चांगला पडीन. शेतकरीस्ले आधुनिक यंत्रसामग्री पुरायीसन ते वापरान सिक्सन देव्हाले पाहिजे. म. जोतिबा फुले येस्ना बहुमोल उपदेश शंभर टक्का आम्मल मजार आणा करता महाराजास्नी आप्ल कार्य हायातीभर चालु ठेव. महाराजास्नी जोतिबास्ले मानपान ना आहेर, नी देणगी दिन्ही. बडोदाले मुक्काम व्हता तव्हय जेतिबास्नी महाराजास्ले शेतकरीस्ना हीन दिन ना बद्दल आप्ल शेतकय्रांचे आसूड नावन पुस्तक वाची दाखाड. ते तेस्नी ध्यान दिसन आयक, नी जोतीबास्ना संगे चर्या कयी. महाराजास्ना व्यक्तीमत्व नी कार्यावर खुष व्हयीसन जेतिबास्नी महाराजास्वर एक पवाडा लिखा.
येऊ द्या दया मना, दया मना // केली दैना //धृव//
विद्याबंदी मुळ पाया केला दैनवाना
वसुलाचा पैसा खर्चून खिचडी ऐद्यांना
कष्टकरी शेती खाती चटणी भाकरींना
अक्षरशुन्य शुद्रादिका काहीच कळेना
अश्या मुक्यांचे बाप आता तुम्हीच व्हाना//
कष्टाळुंची दैना दाविली मुख्यप्रधाना
गेली घडी पुन्हा येईना माहित सर्वांना
सर्वकाल पूर वाहीना पर्वती दय्रांना
जोतिराव सयाजीरावाला करितो प्रार्थना
वहात्या गंगेमध् एकदा हात का धुवाना//
एक महात्मानी ह्या तरणा महाराजास्वर गौरवपर पवाडा रचा, येन्हा पेक्षा मोठा सन्मान काय व्हवु शकस?
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा