गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार* *भाग.. २५

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २५*

        सुक दुकना परसंग परतेक ना जीवन मजार कमी जास्ती येत ह्रातस. महाराजस्ना भाग मजार परमभाग्याना पल येल व्हतात,तसा गयरा दुकना बी पल येल व्हतात. पण महाराज सवसारना सुकदुकन्या घटना गयरा समतोल बुध्दीनी नजर मजार दखेत. त्या एकसावा सपरिवार दौरावर जायी ह्रायन्हांत तव्हय तेस्नी दुसरी आंडेर पुतळाबाबास्ले. एक दिन पालखीम्हायीन लयी जायी ह्रायन्हांत. तेवढाम्हा पालखी मुडीसन पडनी, नी राजकन्याले बराज मार लागना. पालखी मुडनी म्हणजे काहीतरी आपशकुन झाय आस महाराणी चिमनाबाई येस्ले ग्रह झाया नी तेस्ना आंतपमनले धक्का लागना.मव्हरे राजकन्या न दुखन वाढन नी तीस्ले देवबा लयी ग्या. तव्हय पासुन महाराणी चिमनाबाई येस्नी तब्बेत बिगडी गयी, तीस्ले तपास तव्हय कयन की तेस्ले क्षय रोग व्हयेल शे, हवा बदलावा करता तेस्ले मुंबईले ठेव. मंग काही दिन जावावर तेस्ले वापस बडोदाले आण. पण बडोदाले येव्हावर तेस्नी तब्बेत आजुन बिघडनी, नी ७ मे १८८५ले तेस्नी जीवनयात्रा सरी गयी. हाऊ परसंग मुये महाराज गयरा दुखी व्हयनात. जास्त कामना याप, नी राणी न दुक मुये महाराजस्नी झोप गयी.. तेस्ले झोपमोड ना आजार जडी ग्या. तेस्नी तब्बेत बिघडत गयी. त्या अशक्त व्हत ग्यात, तेस्ना डाॅक्टरनी तेस्ले हबाबदल करा कराता इलायेत जाव्हाना सल्ला दिन्हा. तेस्ना युरोप ना दौरा न कारण हायी दुकच व्हत. 

         पाच सहा महिना महाराज गयरा नरवस व्हतात. महाराणी जमनाबाईसाहेब, नी बाकीना जेठा मंडईस्नी तेस्ले दुसर लगीन करता मनायी लिन्ह. तेस्नी सम्मती देव्हावर पोरीस्ना तपास चालू करा. देवास्ना सरदार घाटगे येस्नी आंडेर गजराबाई हायी वधू म्हनीसन पक्क कर. पसंती व्हवावर साधी पध्दत मजार महाराजास्न लगीन लागण. महाराज तब्बेत, स्वास्थ्य करता नयी महाराणी ना संगे काही दिन उटी नी अबु ले ह्रायन्हात. उटी ले व्हतात तव्हयच महाराणी तठे बायतीन व्हयन्यात तेस्ले आंडोर झाया. तेन्ह नाव जयसिंहराव आस ठेव. 

          पयली महाराणी चिमनाबाई येस्नी याद करा करता सुरसागर तलावनानजीक न्यायमंदीर नी गयरी मोठी देखावानी हायली बांधी. त्या हायली मजार उच्च न्यायालयनी स्थापना करी. हायी हायली गयरी मोठी, नी मोहक शे, नी बडोदान भुषण शे. महाराणी ना संगमरवरी पुतळा हायली ना गयर मोठ समागृहमजार बसाडा. त्या पुतळा ना खाले स्मृतीलेख कोरेल सशल शे, 'ह्या हायली तर्फे एक प्रेमळ पत्नी नी वत्सल माता व्हयेल महाराणी ना शांत, परोपकारी, नी मनमिळाऊ स्वभाव बद्दल वाटस म्हनीसन हायी आदरतुन स्मारक करानी मन्ही इच्छा शे' 

         उमामाय महाराजस्नी माय, ह्या बडोदा मजार रमण्यानहीत,तेस्ले राजवैभव पचन नही. बडोदाले तेस्न मन लागे नही. उमामाय नी अवचितरावस्नी माय नवलीबाई ह्या दोन तीन महिना फक्त बडोदाले ह्राहेत, बाकीना दिन त्या कवळाणालेज ह्राहेत. तठे तेस्ना कडे खंडोगणती गायी, ढोर व्हतात. दुधदुभतानी रेलचेल ह्राहे. नजीक ना कोणी नातलग जर बडोदा जाव्हाले निंघनात की, उमामाय महाराजस्ना करता गावठी तुपनी बरणी भरीस वाट लायेत. तेन्हा संगे तेस्नी तयार करेल करंज्या, सांजय्रा, रायत, पापड आसा पदार्थ धाडेत. महाराज आप्ला भाऊस्ना संगे जुनी याद करेत, नी गप्पा टप्पा करत करत त्या पदार्थ खायेत. 

         माय उमामाय नी महाराजस्न्या चुलत्या बडोदा मजारली शाही रितभात, नी पडता पध्दत नी सवय नही व्हती म्हनीसन त्या कटाई जायेत. सदानकदा तेस्ना चुका दाखाळेत  म्हनीसन तेस्ले आखळेल सारख वाटे. कवळाणा कडेज जाव्हा नी तेस्ले ओढ लागे, अहिरानी मजारल्या तेस्न्या गप्पा गयय्रा मज्यान्या ह्राहेत. 

      . उमामाय म्हणेत, "बडोदा मजार काय करमत नही माय! वावरात जानं नही, शिवरात जानं नही, येळान मायीक धरेल बांधेल सारख एक जागे बशी ह्राव्हो. तेवढ खिडकी वाटे बिटीबिटी पाहि ह्राव्हा. हाऊ ते कच्चा तुरुंग शे!, तेन्हावर नवलीबाई म्हणेत," हाव ना माय, कोणी म्हणस आठे बसु नका, तठे बसु नका. कोनी म्हणस मोठाईन बोलु नका, जीव कटाळी जास आठे! सोनाना बलका खाव्हाले मिळस, पण सोनाना पिंजरा म्हा ह्रान पडस", 

         महाराजस्नी परवानगी भेटनी का मंग त्या गयय्रा खुशीमा कवळाणाले जाव्हानी तयारी करेत. तठे ग्यात की पाहुनास्ना पावनच्यार मजार त्या गुंग व्हयी जायेत. बडोदा न्या राजवैभव न्या गोटम्हा त्या गुंग व्हयी जायेत. तठला बठ्ठा कारभार निंबाळकर समायेत. त्या येले महाजस्नी माय उमामायले पत्र लिखेल व्हत. तेन्हा वरथाईन तेस्ना इचार कयतस. ते पत्र मव्हरे शे... 

                                 बडोदा 

                     मकरपुरा पॅलेस 

                        दिनांक १८ ८९ 

तीर्थरूप, गंगारुप मातोश्री आईसाहेब, मुक्काम कवळाणे, ता मालेगाव जि नाशिक 

वडिलांच्या सेवेशी अपत्य बालके सयाजीराव गायकवाड यांचा दोन्ही कर जोडुन त्रिकाळचरणी मस्तक ठेवुन कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार. 

    चि विजयीभव फत्तेसिंहराव व जयसिंहराव यांची, आमची इकडील सर्वांची तब्बेत चांगली आहे. आपणही प्रकृतीची काळजी घेणे. आपणास पंढरपूर जायचे असल्यास नात्यातील चांगली माणसे बरोबर घ्यावीत. त्यांचाही खर्च आपणच करावा. निबांळकरांना बरोबर नेल्यास आम्हांला काळजी राहणार नाही. पंढरपूरहुन आल्यावर सहस्रभोजन करावे. त्यानंतर बडोद्यास निघुन येणे. बाळराजे फत्तेसिंहराव आपली आठवण करतात. आपल्या कडील कुशल कळविणे. 

                 आपला आज्ञाधारक 

                     सयाजीराव 

*क्रमशः*

         (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

     ..... सुरेश पाटील 

     ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...