बुधवार, ३१ मार्च, २०२१

जीवपेक्षा जास्त जपेल

 जीवपेक्षा जास्त जपेल

घास तोंडे व्हता उना

नको येऊ रे पाणी तु

जीव गळालोक उना


जवय वाट मी तुन्ही देखू

तवय पळे तु दुरदुर

आज पिके नासाडात 

तुले काय उना जोर?


कर्जाना डोकावर मोठा

आभायभर पहाड

पोरनं करान लगीन 

तु माले आज नाड


लेनदेन मन्ह, सोन-चांदी

सार से वावर

आते नको तु पडु

स्वतःले आवर


मनी जिरायती शेती

पिकाडस तिनामा सोन

माय से काळीमाती

हिरवगार माळरान


पिके येथीन चांगला

येनी लागनी होती आस

जगु देरे माले

नको देऊ गळफास


कवी- दिपक भाऊसाहेब चव्हाण

9975663626

आग

 😭😭आग 😭😭

================================

जेव्हा पोटात भुकेची आग

थैमान घालते....

तेव्हा,

आग विझवाया...

फायर ब्रिगेडगत धावून येतात...

दोन्ही डोळ्यातून आसवं.

मग मात्र...

ह्या उदरतृप्त जगाला पेटवून द्यावंसं वाटतं...

पण, करणार काय...ह्या भ्रष्ट जगात...

कारण...

मातलेल्या भ्रष्टाचाराला पाहून... हतबल डोळे,

गुपचूप पिऊन घेतात....

आपल्या ताब्यातलं ते,

खारं खारं पाणी.....

खारं खारं पाणी...

****************************कवी ********

प्रकाश जी पाटील....

........ पिंगळवाडेकर......

********************

हिनं मन्हं नातं📋🖋

 [अहिरानी(खान्देशी) बोली भाषा ]                                  *✒📋आसं हिनं मन्हं नातं📋🖋

कविताना व गावम्हा

हायी सदा झयकस

आठे तठे कविता बी 

          मन्ही आरस मिरस॥धृ॥

हिना मुयेच दुनिया 

देखा माले वयखसं

मन्हा जीवनम्हा हायी

             चमचम चमकस॥१॥

दिवा जसा दिवायीना

नवं साल उजयस

तशी हायी उजयस

              जठे तठे नवाजस॥२॥

हिना बिगर जीवन

नही माले उमजसं

आसं हिनं मन्हं नातं 

           नही मोल त्यानं व्हस॥३॥

सई बहिन जशी का

आशी मनले भिडस

नातं जीवन भरनं

           मन्हा संगे निभाडस ॥४॥

*बालांगण* म्हा रमस

*बहरम्हा*, बहरस

 *शब्दझुला* ना बी देखा

           झोकावर झोका ल्हेस॥५॥

     *--निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

     दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

शब्दार्थ- गावम्हा =गावात, हायी=ही, झयकसं=झळकते,

आठे तठे=इथे तिथे, मन्ही =माझी, आरस मिरस=मिरवते,

हिना मुयेच=हिच्या मुळेच, देखा=पहा, माले=मला, वयखसं=ओळखते, दिवायीना =दिवाळीचा,  साल=वर्ष

उजयसं=उजळते, नवाजसं=नावाजते, उमजस=उमजते, त्यानं=त्याचं, व्हस=होते,होतं, सईबहिन=मैत्रीण, भिडस=पोहचते, जीवन भरनं=जीवन भराचं, निभाडस=निभवते.

       ✒📋🖋   ✒📋🖋   ✒📋🖋

📃✍कशी लिखू कविताले📃✍

 📃✍कशी लिखू कविताले📃✍

नही पेनम्हाबी शाई

नही कागद लिखाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           मनम्हानी कविताले॥धृ॥

मनम्हानी कविताले 

जग दुन्यानी कथाले 

जग दुन्यानी कथाम्हा

              इसरस मी सोताले॥१॥

तालवर ताल हिना

देखा लागना चढाले 

कसा करु व जतन

              मनम्हाना मनोराले॥२॥

गन गन भवरीना 

खेय येस व खेयाले

मन्हा मननं आंगन 

              हिले आपुरं रवाले॥३॥

जीव झाया दमेदम

नही टाईम थांबाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           जाऊ कोनले सांगाले॥४॥

     *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी  नेहरु नगर, देवपूर, धुळे.

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

लिखाले=लिहायला, लिखू=लिहू, मनम्हानी =मनातली, 

दुन्यानी =दुनियेच्या, कथाले=कथेला, इसरस=विसरते,

सोताले=स्वतःला, हिना=हिचा, देखा=पहा, लागना=लागला,

चढाले = चढायला, गन गन भवरीना=गोल गोल रानी, खेयं=खेळ, खेयाले=खेळायला, रवाले=खेळायला,मन्हा =माझ्या, हिले=हिला, झाया=झाला, थांबाले=थांबायला, कोनले=कुणाला, सांगाले=सांगायला. 

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

शिवमुजरा

 ◆ शिवमुजरा◆


हाऊ मुजरा मानना शिवरायस्ना कार्यले

चला वंदन करुत हो या मानसातला देवले ॥धृ॥


माय जिजाई पुत्र हाऊ वीर

मऱ्हाटभूमीना व्हयना कैवार

भाग्य रयतनं किती हो थोर

असा राजा जन्मना आठे शुर

सदा स्मरन ठेऊत शिवप्रभुना शौर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥१॥


सह्याद्रीनी कुसना महामेरू

वर्नन शब्दस्मा त्यानं कसं करु

शेतकरीस्ना व्हयना कल्पतरू

दीन-दुःखीस्ना दयासागरू

सदा हिदयात जपूत हो या निर्मय दर्याले

हाऊ मुजरा मानना.....॥२॥


लढवय्या जिजाऊना नंदन

मायभूमीले करीस्नी वंदन

करी टाके दुश्मननी दानाफान

फुलायं स्वराज्यनं नंदनवन

रोज प्रनाम करुत हो या तेजस्वी सुर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥३॥


शीलवंत राजा हाऊ महान

नारीशक्तीले देये सन्मान

सगळा मावळा त्याना पंचप्रान

करेत आया-बहिनीस्नं रक्सन

सदा आनूत कृतीत शिव-मावळास्ना धैर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥४॥


✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼

नामपुर ता.बागलान जि.नाशिक.

मो.नं.९४२१५०१६९५.

ओवी

 ओवी


सपनेस्ना रामपारा

वास पैरतज वना

दिशे पुरबना राजा

सांगे भाट वाजागाजा.....


गानं म्हनीस उठाडे

फांटी फांटीम्हा पाखरू

कोन वना व दारशे

सडा सारवन कर.....


दुर आभायमा झाके

कशा सूर्ये राजा बुवा 

वनी नवी व पहाट

संगे दिन वना नवा.....


गये चांन्नीन झुंबर

लोंबकेल जी रातन

वना सूर्येनारायन

यान दिन व वतन.....


आंग चोरेल पाकोयी

वनी तिले जल्दी जाग 

हात फिरता ऊनना

आश्शी फुले मन्ही बाग.....


वनश्री पाटील जालना 

काशी कन्या लिव्हस 

काव्य संग्रह.....

कुणबीनी दशा

 😭कुणबीनी दशा 😭

================================

मन्हा  कुणबीनी  दशा

कोन्ही करी माटीमोल...

बुट्या  वामननी  त्येंले

पुरं  गाडी दिन्ह खोल.....1

थंडी, ऊन, वारा,पानी

रात  देखे  ना  पाह्येट...

त्येना  जिवव्हर तुम्ही

गादी  तिजोरीना  शेट.....2

झेले  वैशाखनं  ऊन

बुंजे  धरतीना  तडा...

आब्रू थाटीनी राखाले

टाके घामना तो सडा.....3

इन्ज कर्कडे ती वऱ्हे

ऊर  भुमाताना  फाटे...

ढोलपिट्या त्या ढगनी

चोप त्येन्हा कान चाटे....4

रोज  खुर्चीनं  गणित

तेन्हा गऱ्हानास्ले मांडे...

चौदा पायस्नी खुर्चीबी 

तेल्हे उख्खयम्हा कांडे....5

भुगाभागा फुकीफाकी

सोडं  बजारम्हा  गाडं...

तठे कोल्हा,कुत्रास्नी रे

देखा  हत्तीलेच  नाडं......6

बळीराजा.. बळीराजा

झाया  आदर  रे मोठा...

आते  औतना तो  दोर

रोज  दावस  आंघॊटा.....6

हार   लेताच  गयाम्हा

फासी कलेजामा कुढे... रडे  कोपराम्हा  डोया

जीभ आसूस्मा ती बुडे...7

****************************************

कवी.... प्रकाश जी पाटील

पिंगळवाडेकर =======

================

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...