😭😭आग 😭😭
================================
जेव्हा पोटात भुकेची आग
थैमान घालते....
तेव्हा,
आग विझवाया...
फायर ब्रिगेडगत धावून येतात...
दोन्ही डोळ्यातून आसवं.
मग मात्र...
ह्या उदरतृप्त जगाला पेटवून द्यावंसं वाटतं...
पण, करणार काय...ह्या भ्रष्ट जगात...
कारण...
मातलेल्या भ्रष्टाचाराला पाहून... हतबल डोळे,
गुपचूप पिऊन घेतात....
आपल्या ताब्यातलं ते,
खारं खारं पाणी.....
खारं खारं पाणी...
****************************कवी ********
प्रकाश जी पाटील....
........ पिंगळवाडेकर......
********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा