बुधवार, ३१ मार्च, २०२१

ओवी

 ओवी


सपनेस्ना रामपारा

वास पैरतज वना

दिशे पुरबना राजा

सांगे भाट वाजागाजा.....


गानं म्हनीस उठाडे

फांटी फांटीम्हा पाखरू

कोन वना व दारशे

सडा सारवन कर.....


दुर आभायमा झाके

कशा सूर्ये राजा बुवा 

वनी नवी व पहाट

संगे दिन वना नवा.....


गये चांन्नीन झुंबर

लोंबकेल जी रातन

वना सूर्येनारायन

यान दिन व वतन.....


आंग चोरेल पाकोयी

वनी तिले जल्दी जाग 

हात फिरता ऊनना

आश्शी फुले मन्ही बाग.....


वनश्री पाटील जालना 

काशी कन्या लिव्हस 

काव्य संग्रह.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...