बुधवार, ३१ मार्च, २०२१

जीवपेक्षा जास्त जपेल

 जीवपेक्षा जास्त जपेल

घास तोंडे व्हता उना

नको येऊ रे पाणी तु

जीव गळालोक उना


जवय वाट मी तुन्ही देखू

तवय पळे तु दुरदुर

आज पिके नासाडात 

तुले काय उना जोर?


कर्जाना डोकावर मोठा

आभायभर पहाड

पोरनं करान लगीन 

तु माले आज नाड


लेनदेन मन्ह, सोन-चांदी

सार से वावर

आते नको तु पडु

स्वतःले आवर


मनी जिरायती शेती

पिकाडस तिनामा सोन

माय से काळीमाती

हिरवगार माळरान


पिके येथीन चांगला

येनी लागनी होती आस

जगु देरे माले

नको देऊ गळफास


कवी- दिपक भाऊसाहेब चव्हाण

9975663626

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...