◆ शिवमुजरा◆
हाऊ मुजरा मानना शिवरायस्ना कार्यले
चला वंदन करुत हो या मानसातला देवले ॥धृ॥
माय जिजाई पुत्र हाऊ वीर
मऱ्हाटभूमीना व्हयना कैवार
भाग्य रयतनं किती हो थोर
असा राजा जन्मना आठे शुर
सदा स्मरन ठेऊत शिवप्रभुना शौर्यले
हाऊ मुजरा मानना.....॥१॥
सह्याद्रीनी कुसना महामेरू
वर्नन शब्दस्मा त्यानं कसं करु
शेतकरीस्ना व्हयना कल्पतरू
दीन-दुःखीस्ना दयासागरू
सदा हिदयात जपूत हो या निर्मय दर्याले
हाऊ मुजरा मानना.....॥२॥
लढवय्या जिजाऊना नंदन
मायभूमीले करीस्नी वंदन
करी टाके दुश्मननी दानाफान
फुलायं स्वराज्यनं नंदनवन
रोज प्रनाम करुत हो या तेजस्वी सुर्यले
हाऊ मुजरा मानना.....॥३॥
शीलवंत राजा हाऊ महान
नारीशक्तीले देये सन्मान
सगळा मावळा त्याना पंचप्रान
करेत आया-बहिनीस्नं रक्सन
सदा आनूत कृतीत शिव-मावळास्ना धैर्यले
हाऊ मुजरा मानना.....॥४॥
✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼
नामपुर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा