बुधवार, ३१ मार्च, २०२१

कुणबीनी दशा

 😭कुणबीनी दशा 😭

================================

मन्हा  कुणबीनी  दशा

कोन्ही करी माटीमोल...

बुट्या  वामननी  त्येंले

पुरं  गाडी दिन्ह खोल.....1

थंडी, ऊन, वारा,पानी

रात  देखे  ना  पाह्येट...

त्येना  जिवव्हर तुम्ही

गादी  तिजोरीना  शेट.....2

झेले  वैशाखनं  ऊन

बुंजे  धरतीना  तडा...

आब्रू थाटीनी राखाले

टाके घामना तो सडा.....3

इन्ज कर्कडे ती वऱ्हे

ऊर  भुमाताना  फाटे...

ढोलपिट्या त्या ढगनी

चोप त्येन्हा कान चाटे....4

रोज  खुर्चीनं  गणित

तेन्हा गऱ्हानास्ले मांडे...

चौदा पायस्नी खुर्चीबी 

तेल्हे उख्खयम्हा कांडे....5

भुगाभागा फुकीफाकी

सोडं  बजारम्हा  गाडं...

तठे कोल्हा,कुत्रास्नी रे

देखा  हत्तीलेच  नाडं......6

बळीराजा.. बळीराजा

झाया  आदर  रे मोठा...

आते  औतना तो  दोर

रोज  दावस  आंघॊटा.....6

हार   लेताच  गयाम्हा

फासी कलेजामा कुढे... रडे  कोपराम्हा  डोया

जीभ आसूस्मा ती बुडे...7

****************************************

कवी.... प्रकाश जी पाटील

पिंगळवाडेकर =======

================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...