📃✍कशी लिखू कविताले📃✍
नही पेनम्हाबी शाई
नही कागद लिखाले
कशी लिखू कोठे लिखू
मनम्हानी कविताले॥धृ॥
मनम्हानी कविताले
जग दुन्यानी कथाले
जग दुन्यानी कथाम्हा
इसरस मी सोताले॥१॥
तालवर ताल हिना
देखा लागना चढाले
कसा करु व जतन
मनम्हाना मनोराले॥२॥
गन गन भवरीना
खेय येस व खेयाले
मन्हा मननं आंगन
हिले आपुरं रवाले॥३॥
जीव झाया दमेदम
नही टाईम थांबाले
कशी लिखू कोठे लिखू
जाऊ कोनले सांगाले॥४॥
*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी नेहरु नगर, देवपूर, धुळे.
✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍
लिखाले=लिहायला, लिखू=लिहू, मनम्हानी =मनातली,
दुन्यानी =दुनियेच्या, कथाले=कथेला, इसरस=विसरते,
सोताले=स्वतःला, हिना=हिचा, देखा=पहा, लागना=लागला,
चढाले = चढायला, गन गन भवरीना=गोल गोल रानी, खेयं=खेळ, खेयाले=खेळायला, रवाले=खेळायला,मन्हा =माझ्या, हिले=हिला, झाया=झाला, थांबाले=थांबायला, कोनले=कुणाला, सांगाले=सांगायला.
✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा