बुधवार, ३१ मार्च, २०२१

📃✍कशी लिखू कविताले📃✍

 📃✍कशी लिखू कविताले📃✍

नही पेनम्हाबी शाई

नही कागद लिखाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           मनम्हानी कविताले॥धृ॥

मनम्हानी कविताले 

जग दुन्यानी कथाले 

जग दुन्यानी कथाम्हा

              इसरस मी सोताले॥१॥

तालवर ताल हिना

देखा लागना चढाले 

कसा करु व जतन

              मनम्हाना मनोराले॥२॥

गन गन भवरीना 

खेय येस व खेयाले

मन्हा मननं आंगन 

              हिले आपुरं रवाले॥३॥

जीव झाया दमेदम

नही टाईम थांबाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           जाऊ कोनले सांगाले॥४॥

     *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी  नेहरु नगर, देवपूर, धुळे.

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

लिखाले=लिहायला, लिखू=लिहू, मनम्हानी =मनातली, 

दुन्यानी =दुनियेच्या, कथाले=कथेला, इसरस=विसरते,

सोताले=स्वतःला, हिना=हिचा, देखा=पहा, लागना=लागला,

चढाले = चढायला, गन गन भवरीना=गोल गोल रानी, खेयं=खेळ, खेयाले=खेळायला, रवाले=खेळायला,मन्हा =माझ्या, हिले=हिला, झाया=झाला, थांबाले=थांबायला, कोनले=कुणाला, सांगाले=सांगायला. 

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

शिवमुजरा

 ◆ शिवमुजरा◆


हाऊ मुजरा मानना शिवरायस्ना कार्यले

चला वंदन करुत हो या मानसातला देवले ॥धृ॥


माय जिजाई पुत्र हाऊ वीर

मऱ्हाटभूमीना व्हयना कैवार

भाग्य रयतनं किती हो थोर

असा राजा जन्मना आठे शुर

सदा स्मरन ठेऊत शिवप्रभुना शौर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥१॥


सह्याद्रीनी कुसना महामेरू

वर्नन शब्दस्मा त्यानं कसं करु

शेतकरीस्ना व्हयना कल्पतरू

दीन-दुःखीस्ना दयासागरू

सदा हिदयात जपूत हो या निर्मय दर्याले

हाऊ मुजरा मानना.....॥२॥


लढवय्या जिजाऊना नंदन

मायभूमीले करीस्नी वंदन

करी टाके दुश्मननी दानाफान

फुलायं स्वराज्यनं नंदनवन

रोज प्रनाम करुत हो या तेजस्वी सुर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥३॥


शीलवंत राजा हाऊ महान

नारीशक्तीले देये सन्मान

सगळा मावळा त्याना पंचप्रान

करेत आया-बहिनीस्नं रक्सन

सदा आनूत कृतीत शिव-मावळास्ना धैर्यले

हाऊ मुजरा मानना.....॥४॥


✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼

नामपुर ता.बागलान जि.नाशिक.

मो.नं.९४२१५०१६९५.

ओवी

 ओवी


सपनेस्ना रामपारा

वास पैरतज वना

दिशे पुरबना राजा

सांगे भाट वाजागाजा.....


गानं म्हनीस उठाडे

फांटी फांटीम्हा पाखरू

कोन वना व दारशे

सडा सारवन कर.....


दुर आभायमा झाके

कशा सूर्ये राजा बुवा 

वनी नवी व पहाट

संगे दिन वना नवा.....


गये चांन्नीन झुंबर

लोंबकेल जी रातन

वना सूर्येनारायन

यान दिन व वतन.....


आंग चोरेल पाकोयी

वनी तिले जल्दी जाग 

हात फिरता ऊनना

आश्शी फुले मन्ही बाग.....


वनश्री पाटील जालना 

काशी कन्या लिव्हस 

काव्य संग्रह.....

कुणबीनी दशा

 😭कुणबीनी दशा 😭

================================

मन्हा  कुणबीनी  दशा

कोन्ही करी माटीमोल...

बुट्या  वामननी  त्येंले

पुरं  गाडी दिन्ह खोल.....1

थंडी, ऊन, वारा,पानी

रात  देखे  ना  पाह्येट...

त्येना  जिवव्हर तुम्ही

गादी  तिजोरीना  शेट.....2

झेले  वैशाखनं  ऊन

बुंजे  धरतीना  तडा...

आब्रू थाटीनी राखाले

टाके घामना तो सडा.....3

इन्ज कर्कडे ती वऱ्हे

ऊर  भुमाताना  फाटे...

ढोलपिट्या त्या ढगनी

चोप त्येन्हा कान चाटे....4

रोज  खुर्चीनं  गणित

तेन्हा गऱ्हानास्ले मांडे...

चौदा पायस्नी खुर्चीबी 

तेल्हे उख्खयम्हा कांडे....5

भुगाभागा फुकीफाकी

सोडं  बजारम्हा  गाडं...

तठे कोल्हा,कुत्रास्नी रे

देखा  हत्तीलेच  नाडं......6

बळीराजा.. बळीराजा

झाया  आदर  रे मोठा...

आते  औतना तो  दोर

रोज  दावस  आंघॊटा.....6

हार   लेताच  गयाम्हा

फासी कलेजामा कुढे... रडे  कोपराम्हा  डोया

जीभ आसूस्मा ती बुडे...7

****************************************

कवी.... प्रकाश जी पाटील

पिंगळवाडेकर =======

================

अन्नदाता

 🙏😄अन्नदाता 😄🙏

================================

कोल्ली नदीम्हा हाकले

त्येन्हीं  हयातीनी  नाव...

ऊगे  माटीम्हा  जो  मरे

त्यान्ह  कुणबी  शे नाव...1

जात त्येन्ही  ती कुणबी

धंदा  त्येन्हा  कुणबाऊ

चोर -ढोर -चिडी -मुंगी

येस्ना  तोच  बापभाऊ....2

कुणबीनी त्या थाठीमा

बारा  बलुतास्ना  वाटा...

भले, देव  नको  देवो

त्येल्हे बाडगीम्हा आटा...3

बारा  परतन्ना  खेडू

झाया  पतना  भिकारी...

चोर घेरे  शावसंगे 😭

त्येल्हे फाडेत शिकारी....4

भाते  झाडखाले  सोडे

देस  धरनीले  घास 🙏

त्येना  हिरिदम्हा  सदा

नेती  करे  रहिवास........5

सरकार... सावकार

लुच्चा  कुचकामी  शेत...

हुजऱ्यास्ना भर्से लागी

राजा  उलगाये  खेत......6

दिसे   कालानं  कीर्तन

न्यारा म्हधम्हा तमासा...

जीव  किदरना  त्येन्हा

लेस  कवटायी  फासा....7

खिसाभरू ह्या दुन्यामा

लुच्चा  ठोकस रे बाता...

हाने ढुंगणले लाता 😭

आणि  म्हणे  अन्नदाता...8

****************************************

कवी... प्रकाश जी पाटील 

पिंगळवाडेकर /////////////

********************

🌷बठ्ठ जग बदली ऱ्हायनं🌷

 🌷बठ्ठ जग बदली ऱ्हायनं🌷

           --------------------

      ...नानाभाऊ माळी


भाऊ-बहिनीस्वन!

मी आते दोन-च्यार दिन झाये गावलें गयथू!तश्या वरीसम्हा सव- सात चक्रा व्हतीस!धकल्पने ज्यास्ना संगे खेयेल,हुस्त्या-मस्त्या करेल त्या!...त्या धाकल्ला लंगटी दोस्तांरं,नातू पंतून्हा सेतस!गावं न्हा पुढारी सेतस!चांगला नाव काढी ऱ्हायनात!तव्हय पेवालें पानी भेटे नई!आते घरमा नयलें पानी यी ऱ्हायनं!..मी बदली।   ऱ्हायनू!...गावं बदली ऱ्हायनं!दोस्तस्ना पोरे वयखातसं नई!वय आनी काय आदली-बदली करत ऱ्हास!🌷


मी कालदिंन धव्वी कुडची घाली व्हती!कोपरी घाली व्हती!डोकाम्हा फेटा व्हता!कंबरलें सहीनंन्ह धोतर व्हत!जगन्ह दखी मंग मी भी बदली गवू!धोतरनी जागा पॅन्टनी लिधी!भाऊस्वन... धोतरलें लागनी उधी आनी आते उनी नवीन सद्दी!🌷


मी बदली ऱ्हायनू!मन्ह मन बदली ऱ्हायन!मन्हा घरंनां बदली ऱ्हायनात!नाता-गोतानां!गाव गल्लीनां  बठ्ठा बदली ऱ्हायनातं!महाराष्ट्र संगे देश बदली ऱ्हायना!इकासन्ही गंगाम्हा... भाउस्वन...जग बदली ऱ्हायन!लोके बदली ऱ्हायनातं!गावंम्हा दिन रात उजागरा  करणारा मनोरंजन्हा डफडा-डुफडा चालना ग्यात!बँडवाजा गावभर कान फोडी ऱ्हायनात!लाऊडस्पीकरवर गाण म्हनी ऱ्हायनात!धांगडधिंगाम्हा मन  मोक्या करी ऱ्हायनातं!भाउस्वन!बहिनीस्वनं!..मानसे उज्जी-उज्जी बदली ऱ्हायनातं!जग बदली ऱ्हायनं!🌷


 पावसायाम्हा पानी पडे!माटीनां धाबावर भी पडतं ऱ्हाये!तेचं पंढायम्हा व्हातं ऱ्हाये!धाबावरनी खारी पंढायम्हा व्हातं ऱ्हाये!घर खाले टिपटीपतं करत ऱ्हाये!    घरम्हा झोपालें-बसालें जागा नई ऱ्हाये!गयकं घर मांगे पडी ऱ्हायनं!सिमेंटन्हा घरे बांधायी ऱ्हायनातं!सिमेंटनां मने सांधायी ऱ्हायनातं!🌷.....


"डभुई पानीन्हा लोंढा 

धाबानी खारी लयी पये!

पानीनी धोयेलं धाब कसं

 खालें टिपटिप व्हयी गये!🌷


शेंननी सारेलं वंडी व्हती

 पानीम्हा धवायी जाये!

वरीसभर यादनीं खून

हिरदम्हा वल्ली ऱ्हाये!🌷


आली गलीम्हा चिखोल

 बठ्ठा आंगने कोरतं ऱ्हाये!

  डभुई पाणीनां लोंढा

   मव्हरे नदी बनी व्हाये!"🌷


भाऊ-बहिनीस्वन!

 लपेलं-सारेलं वंडीनां चर व्हडी- व्हडी पावसाया लयी पये!.. सरता पावसाया धाबानी वंडीलें उघडंनागडी करी जाये!माटी खल्ली धोयी-चोयी मांगे खडगंनं ठी जाये !सरमट,उसनी बांडी टाकेल माटीनं धाब थेंब-थेंब गयेत ऱ्हाये!पन उंढायांम्हा तेच धाब कायम कूलरनां थंडावा देत ऱ्हाये!🌷


"सऱ्याम्हाइन बुरुबुरु माटी

 घरमा भूगला करत ऱ्हाये!

हूबा खांब आडा सऱ्या 

 बठ्ठ वजन पेलतं जाये!


घरनं सानं चूल्हानं धुक्कय

 वारावर भवडतं जाये!

वल्ल बयतंनं धुगुधुगु 

चूल्हाम्हा बयेतं ऱ्हाये!"🌷


 धव्य धुक्कय भिंगोटांमायेक!भवरांमायेक ...गोल गोल गिटिंग फिरी सानाम्हाईन वर उडतं ऱ्हाये!धवी माटीन्या             पोतारेलं भीतां धुक्कयमुये काया मटक पडी जायेतं!वल्ल बयतंनं चेटे नई!इस्तु धुक्कयम्हा गुदमरतं ऱ्हाये!एखादी गवरी इस्तुवर टाकाये!तोंडन्ही फुकनी इस्तुले जागे करत ऱ्हाये!चेटेलं उब्याम्हा तावानी गरमा गरम भाकर शेकात ऱ्हाये!🌹


भाऊ-बहिनीस्वन!

आते धाबानी वंडी गयी!माटी गयी!चूल्हा मांगे पडी ऱ्हायना!   गाव-खेडास्मा सिमेंटनां चुल्हा  नजरे पडी ऱ्हायनातं!गॅस वट्टावर हुन्या-हुन्या श्याक-भाकरी व्हयी ऱ्हायन्यात!गॅसवर सिजेलं बिन चवन्ह वरपी-वरपी खायी ऱ्हायनातं!भाऊस्वनं,मी बदली ऱ्हायनू!जग बदली ऱ्हायनं!🌷


"फुकनीव्हरी धुक्कयलें 

कितला दिन फुकानं?


बयी-बयी बयतंन्ना

धव्या धुवाम्हा वाकानं!"🌷


भाऊ-बहिनीस्वन!

सिमेंटनां घरे बांधायी ऱ्हानात!

मन्हा इकास व्हयी ऱ्हायना!    जगनां इकास व्हयी ऱ्हायना! इकासनी गंगाम्हा आंग धोयी  बठ्ठा पवतीर व्हयी ऱ्हायनूत!🌷


"तन मन पवतीर मन्ह 

वारावर हुलकी ऱ्हायनं!

मन पवतीर आंग पवतीर

न्यामिंन डुलकी ऱ्हायनं!


बाशी कुशी जुनं मन

उज्जी मव्हरे सरकी ऱ्हायन!

जूनं ते व्हयी गये नवख 

बठी गल्ली उधयी ऱ्हायनं!


भु-भारी नवखी जिभलें

भारी गुईचट लागी ऱ्हायन!

जीभ जोर लायेलं मनलें

उज्जी चटकी ऱ्हायनं!'🌷


ऊसनं टिपरं दखी दखी

 मन जीभलें चखी ऱ्हायनं!

मधाय गोड साखरलें दखी

बघोनं उकयी ऱ्हायनं दायनं!"🌷


चूल्हावरं उकयेलं पुरनंनी दाय चव देत ऱ्हास!गॅसवरनं रांधेलंनी चव मार खायी जास!..भाऊस्वन... तिचं गत सिमेंटनं घरनं व्हयी बठेल से!घर से!घरपन से!दिखावा से!फॅन,फ्रीज से!पन जीव निवात नई!दिनलें धपस, रातलें उकयेतं ऱ्हास!रातभर हुपारा व्हत ऱ्हास!...भाऊस्वन..…तरी भी मांगला सासुल लिसनी मव्हरे परवास से!...जग बदली ऱ्हायनं!मी भी बदली ऱ्हायनू!🌷


"लाली पावडर लायीलुई 

घर बंगला बांधायी गया!

थंडगार व्हवानं सोडी

 जीवलें हुपारा व्हयी गया!"🌷


भाऊस्वन!....गाव-खेडास्मा जोरबन इकास व्हयी ऱ्हायना!रस्ता-गल्ल्या बठ्ठा सिमेंटनां व्हयी ऱ्हायनात!जुना घरेस्ना भीतडास्नि माटी धसी ऱ्हायनी!दिनेदिन माटीनां भीतडां सऱ्यालें आध्दरं लटकायी इघरी ऱ्हायनात


"डोकावरनां आधार 

 उधार धुंडी ऱ्हायना

  पडेल घरमा डुकरे

 निशानी खुंडी ऱ्हायनातं!


कायेजनं नातं तोडी

 यव्हारं जोडी ऱ्हायनांत!

जग भारी मतलबी त्या

भीती फोडी ऱ्हायनातं!"🌹


भाऊ बहिनीस्वन!

वावरम्हा मोटरनं पानी जिरी ऱ्हायनं!मोटक्या भवडी ऱ्हायनां!उपसा वर उपसा जिमीन वलायी ऱ्हायनी!हेरन्ह थायनं कोल्ल पडी ऱ्हायन!पिक मातरं जोरबन यी ऱ्हायनं!आडची,गावरान सोडी युरियानं पिक नाची ऱ्हायनं!मातेलं पीक भूक भागाडी ऱ्हायनं!रोगराई संगे लयी फिरी ऱ्हायनं!डॉक्टरस्न भल करी ऱ्हायनं!जग मुकलं मव्हरे जायी बदली ऱ्हायनं!बागे बागे उकली ऱ्हायनं!जग न्यामी भकली ऱ्हायनं!भाऊस्वन!...मी भी व्हाता पूरम्हा व्हायी ऱ्हायनू!बुडी- बाडी झेपी ऱ्हायनू!सोतांलें वाचाडी मी बदली ऱ्हायनू!🌹


भाऊ-बहिनीस्वन!

आखो भेटसुत नवा इशय संगे!नवा आशय संगे!तवलोंग राम राम मंडयी!राम राम!🌷

         🌹-----------------🌹

......नानाभाऊ माळी,

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे(ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८)

मो नं ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-२६फेब्रुवारी२०२१

माय

 🌹!माय!🌹

        -------------------

    ....नानाभाऊ माळी


खटायं येडी चांगलं वाग तू

मानोस जिकालें धाडेलं से

दूध सरावर थानांमायीन

 मी मायन्ह रंगत व्हडेल से!.....


 रंगतनां गोया माया हावू

जीव टाकी फिरी वनू!

कामलें जुंपसनी मायलें

गादीवर बठी नको कन्हु.....


धयेडपने करीलें सेवा

पुण्य जिकाना मोका से

आंगवर लमेंनं चामडीनी

माय हवानां झोका से....


थकेलं कुडी से ग्याननी

आमरुद गोडी जिकी लें

उन पावसायानी घोंगडी

मायन्हा मव्हरे वाकी लें!


उन पावसाया थंडीम्हा

कायेज तिन्ही काढी दिन्ह

माय जगन्ह दैवत भारी

 पुण्य सोतांन्ह व्हाडी दिंन्ह

      🌹----------🌹

------भाऊ-बहिनीस्वन!

 मन्ही पंच्यानवं वरीस्नि मायनां पायवर हायी कविता ठी ऱ्हायनू!🌷

-----नानाभाऊ माळी

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे.(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)

दिनांक-३१मार्च२०२१

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...