🙏😄अन्नदाता 😄🙏
================================
कोल्ली नदीम्हा हाकले
त्येन्हीं हयातीनी नाव...
ऊगे माटीम्हा जो मरे
त्यान्ह कुणबी शे नाव...1
जात त्येन्ही ती कुणबी
धंदा त्येन्हा कुणबाऊ
चोर -ढोर -चिडी -मुंगी
येस्ना तोच बापभाऊ....2
कुणबीनी त्या थाठीमा
बारा बलुतास्ना वाटा...
भले, देव नको देवो
त्येल्हे बाडगीम्हा आटा...3
बारा परतन्ना खेडू
झाया पतना भिकारी...
चोर घेरे शावसंगे 😭
त्येल्हे फाडेत शिकारी....4
भाते झाडखाले सोडे
देस धरनीले घास 🙏
त्येना हिरिदम्हा सदा
नेती करे रहिवास........5
सरकार... सावकार
लुच्चा कुचकामी शेत...
हुजऱ्यास्ना भर्से लागी
राजा उलगाये खेत......6
दिसे कालानं कीर्तन
न्यारा म्हधम्हा तमासा...
जीव किदरना त्येन्हा
लेस कवटायी फासा....7
खिसाभरू ह्या दुन्यामा
लुच्चा ठोकस रे बाता...
हाने ढुंगणले लाता 😭
आणि म्हणे अन्नदाता...8
****************************************
कवी... प्रकाश जी पाटील
पिंगळवाडेकर /////////////
********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा