बुधवार, ३१ मार्च, २०२१

माय

 🌹!माय!🌹

        -------------------

    ....नानाभाऊ माळी


खटायं येडी चांगलं वाग तू

मानोस जिकालें धाडेलं से

दूध सरावर थानांमायीन

 मी मायन्ह रंगत व्हडेल से!.....


 रंगतनां गोया माया हावू

जीव टाकी फिरी वनू!

कामलें जुंपसनी मायलें

गादीवर बठी नको कन्हु.....


धयेडपने करीलें सेवा

पुण्य जिकाना मोका से

आंगवर लमेंनं चामडीनी

माय हवानां झोका से....


थकेलं कुडी से ग्याननी

आमरुद गोडी जिकी लें

उन पावसायानी घोंगडी

मायन्हा मव्हरे वाकी लें!


उन पावसाया थंडीम्हा

कायेज तिन्ही काढी दिन्ह

माय जगन्ह दैवत भारी

 पुण्य सोतांन्ह व्हाडी दिंन्ह

      🌹----------🌹

------भाऊ-बहिनीस्वन!

 मन्ही पंच्यानवं वरीस्नि मायनां पायवर हायी कविता ठी ऱ्हायनू!🌷

-----नानाभाऊ माळी

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे.(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)

दिनांक-३१मार्च२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...