बुधवार, ३१ मार्च, २०२१

*पय पय पयना तू

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


*अष्टाक्षरी कविता*


*पय पय पयना तू*


पय पय पयना तू

रानभर काम गुंता

राब राब राबना तू

इतभर पोट गुंता 


तय तय तयना तू

आंगवर लीध उनं

किर किर रातना तू

खेतवर नाकं दिनं


कय कय मनले ती

डोकावर वझं देनं

दिनगने वाढे याज

हातवर कसं जीनं


जितरब संगे ठेल

खांदवर ती दुसर

रट्टा घट्टा पडी पडी

पडा दुखना इसर


ग्यात उनात कितला

कयवार त्या बईना

मनी येकज मायना

बठ्ठा नारद कईना


वर वर म्हनतस 

तोंडवर पोशिंदा रे

पाठमोर्हा व्हइसन

उपराना तो धंदा रे


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगाव,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.१८/३/२०२१


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

पिरिमना चक्करम्हा

 🤔🤔👆👆🤔🤔


*पिरिमना चक्करम्हा*


पिरेमना चक्करम्हा

तू वाया नको जाऊ

तिन्हा मागे फिरीसन

तू साल नको बुडाऊ ।।धृ।।


राबी खेते मायबाप

पोटले देतस चिमटा

तुन्हा गुंता करतस

दिनरात येक भाऊ  ।।१।।


लिखी शिकी शाया

व्हयजो खरा ग्यानी

भेटी तुले नवकरी

येळ वाया नको घालू ।।२।।


वाट तुले दखाडेत

त्या मायबाप गुरू

कलपात तेसना तू

कधी नको इसरू ।।३।।


नदारीना सौसार तो

कया तेसनीज खरा

दुस्कायना फेरा पडे

नको तू बांगा व्हऊ ।।४।।


पिरिमना चक्करम्हा

तू नको वाया जाऊ

तिन्हा मागे फिरीसन

तू साल नको बुडाऊ ।।धृ।।


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगाव,चाळीसगाव

दि.२१/३/२०२१


🤔🤔👆👆🤔🤔

कोन करस किवना

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️


*अष्टाक्षरी*


*कोन करस किवना*


ताप ताप तापे सुर्या

जसं वके तोंडे ऊन ...

ल्हाई ल्हाई करे आंग

चढे माथा वरे दिन ...


फफुटानी धरी वाट

चाले लव लव पाय ...

झाड नही वाट वरे

लागे उंडायानी झय ...


वावरम्हा दिखे डोये

कायमना तो पसारा ...

मन्हा बईना जिवना

घस घस तो घसारा ...


राब राब राबे बई

कसटना तो फुलारा ...

हाते काही नही र्हाये

कायपात ना डोलारा ...


मान हेटे करी व्हढे

खांदे दुसरना भार ...

जिनगिनं गाडं व्हढे

लाये कंबरना जोर ...


नको लेजो मवरला

हाऊ जलम रे बईना ...

खस्ता खाईसन मंग

कोन करस किवना ...


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगाव,चाळीसगाव 

मो.नं.८८८८९४५३३५

दि.३०/३/२०२१


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

गझल मन्ही बोलस..

 💫⚜

*◆गझल मन्ही बोलस..◆*__


💫☘ *गझलवृत्त-सौदामिनी*


________________________


नदारी दुन्याले दखाडू नको

कमाई लुटीनी कमाडू नको


रिकामा गया जो जगाले उना

लबाडी करी धन दपाडू नको


हयाती घडीनी भरोसा नही

फुकट देहले तू सजाडू नको


सहारा बनीस्नी उभारी दिन्ही

भिडू त्या कधीबी फसाडू नको


खरी संपती जप परीवारनी

जलम देवतास्ले कटाडू नको


पसारी पथारी सदानीकदा

सुखी मैतरस्ले सताडू नको


टिलकचंदबी भो उताना पडस

हुशाऱ्या करी जग चगाडू नको


✍🏼©️ *कवी-देवदत्त बोरसे*✍🏼

नामपूर ता.बागलान जि.नाशिक.

*9421501695*

_____________________▪⚜

🌹जलमदेती अहिराणी माय🌹

 🌹जलमदेती अहिराणी माय🌹

            ***********

       ......नानाभाऊ माळी


🌷अमृतमाय जिभवर

सदा कदा झिरपत ऱ्हास

खान्देशनां भाउ आपुन

अहिरानीमां निरोप जास..!🌹


🌷जिभवरनां कव्या बोलं

कुढीम्हा बठेल कायेज व्हास

नको वाटालें सरम आम्हलें

माय जलमदेती ऱ्हास......!🌹


🌷जग-दुन्याम्हा कोठे भी जावा

तोंडे मातर अहिराणी ऱ्हावो

मांगे-मव्हरे एक दिन बठ्ठ

अहिरानीनं इद्यापीठ व्हवो..!🌹


🌷दारनां मव्हरे मावशी बोला

सायम्हा परायी इंग्रजी बोला

जलम देतीगुंता आते भाउ

अहिरानींनां स्वर्ग खोला....!🌹

        🌺*******🌺

    ...नानाभाऊ माळी

मु पो ता शिंदखेडा जि धुळे

ह मु हडपसर, पुणे-४११०२८

दिनांक-२५डिसेंबर२०२०


🌹🌷बठ्ठा अहिरानींना लाल!हिरा-माणिक!भाउभन!धनगोत!ध्यानमा ठेवा २६,२७,२८लें जगन्हा अहिरानींना मोती तुम्हलें दानम्हा भेटनार सेतस!या ग्यान मोती लेवागुंता बठ्ठा विश्वनां भाउ-बहिनी तयार ऱ्हावा!🌺🌷🌹🙏😌

🌹माय अहिरानी 🌹

 🌹माय अहिरानी 🌹

मन्ही अहिरानी बोली 

तिन्हा कसा गाऊ गुन... !

मराठीना कपायले 

सोभे आभिरनि खूण... !1

अहिरानी अहिरानी 

धार तापीनी नित्तय..... !

सोनं खान्देशनं हाई 

बाकी चौफेर पित्तय.... !2

गोड अहिरानी बोली 

जसं त्ये उसनं कांड.....!

आनी रांगडीबी तसी 

ठोके कुऱ्हाडले दांड....!3

जसं शबरीनं बोर 

थोडं गोड थोडं खट्ट.... !

मन्ही अहिरानी भाषा 

काया समारनं बट्ट.......!4

ग्यानेसरी छातीठोकी 

पाजे अमृतना घोट ........!

मन्ही अहिरानी तिले  

दाये सहदनं बोट........ !5

मऱ्हाठीना दरबारे 

गर्जी उनी अहिरानी..... !

बेरी काढेल मी तूप 

मगं..मगं.. गावरानी..... !6

मन्हा मायना व्हटस्नी 

भाषा जीवथून प्यारी.... !

तीन्ह सम्मेलन वाटे 

माले पंढोरीनी वारी......!7

🙏🙏🙏🙏🙏🙏

...........कवी............ 

प्रकाश जी. पाटील 

पिंगळवाडेकर.

🌷🌹खान्देश🌹🌷

 🌷🌹खान्देश🌹🌷

           *********

      ....नानाभाऊ माळी

 

कोनी कन्न म्हनंस तुले

कन्नडनां घाट छावलें

कोनी कान्ह म्हनस तुले

कृष्णानं रंग रुपले.....🌺!


तून्हा भाऊभन नी गोट

घरमा कानबाईनां रोट

आंगे विंध्य सातपुडा

टाचं मारी पये घोडा..🌺!


 तथा बऱ्हाणपूरलें पयेनां

तून्हा झेंडा गाडी वूना

खुरव्हरी उना करी खुणा

धडक राहुल बारीलें वूनां.🌺!


दगड माटीन्ह्या सेंत खानी

कये सोनानं रे पानी

भुरंट खुरटम्हा तू दपेलं

पडीत खाट्यानी कहानी!...🌺!


किल्ला हुभा ताट भामेरं

मव्हरे लळीगं से थायनेरं

 व्हाये दूध तूपनां महापूर

खान्देश गायी म्हैसीस्ना घर.🌺!


केयी कपाशीन्ह्या खानी

किर्र जंगल मांगस पानी

आभीर गोतनां तू राजा

अहिर भाषानी कहानी...🌺!


राज करे शूर गवई राजा

खड्डाम्हा बठेल खान्देश

मोजा पायव्हरी कान्हदेश

तापी गिरणांना मन्हा देश..🌺!

        🌹*********🌹

      ....नानाभाऊ माळी

(मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे)

ह मु हडपसर, पुणे-४११०२८

  दिनांक-२८डिसेंबर२०२०

विश्व अहिराणी साहित्य संमेलन लें मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌹👏

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...