मंगळवार, ३० मार्च, २०२१

😭फासीना दोर 😭

 😭फासीना दोर 😭

      नही देवबी देखे त्या

      कुणबीन्या आवकया...

      दोर औतना बिचारा

      त्येल्हे येस खरी दया..........1

      तोच खरा बापभाऊ 

      त्येन्हा पोटम्हा तो बये...

      त्येल्हे देवासाठे मुक्ती

      औत सोडी तोच पये..........2

      तोच नखले जिव्हाई

      त्येनं दुःख त्येल्हे कये...

      देखे सोबतीन्या हीना

      दोर  रडे  ढये😭ढये..........3

      म्हणे, ऊन  वारासंगे

      तुन्ही  हयाती  तू दये...

      आर्काटीना काटाले तू

      रोज  नागेपाये  सये...........4

      मेहनत  मोजी मोजी 

      दोर औतना झिंजाये...

      त्येन्हा कस्सटले देखी

      धागा तुन्हा रे पिंजाये.........5

      उनी सावकारी जप्ती

      संगे  लये  ती  बंदूक...

      तेम्हा शिकलोट व्हये

      तुन्हा  मनम्हा  संदूक.........6

      किदरना  आयुष्याले 

      रोज  तोच  पंचनामा...

      सांगे  तूच  कुणबीले 

      माफा दिदे राजीनामा........7

      दोर  खरा  मायपोट

      तेन्हा कायजम्हा कीव...

      मारी फासीले आराई

      आनी मोक्या करा जीव.....8

      जसा सुग्रीनना  खोपा 

      वऱ्हे  झाडव्हर  हाले...

      चाले सर्कारी लिखनी

      आसू झिरपत खाले..........9

*******************************

*******************************

कवी... प्रकाश जी पाटील....

.......... पिंगळवाडेकर........

---------------------------------------------------

🙏पोटना सवाल 🙏

🙏पोटना सवाल 🙏

================

================

पापी  पोटना  सवाल

गर्जे  कोंबडानी  बांग...

आज फेडसी रे कसा

भुकी आतडीना पांग......1

वाजे गल्लोगल्ली टाय

गया  खल्ले वासुदेव...

जठे  तठे  झापटाम्हा

पोटकर्ता 🙏उठाठेव......2

खुराडाना तो कोंबडा

कोरे उखल्लाम्हा दाना...

रडे  लेकरू  झुयीम्हा 

त्येन्ही भूक मांगे थाना....3

गाय  देखी  वासरूनी 

भूक  गोठाम्हा  हुंबरे...

अन  बिचकाये माडी 

तिन्हा  हालेत  झुंबरे.......4

म्हणे  मंदीरना  घण्टा

हरे, राम,  हरी,कान्हा...

आथं गोठाम्हा वासरू

देखे मायना तो पान्हा.....5

सुर्य  नींघताच  दिसे

बठ्ठा   रस्ताले   मजूर...

भागबल्ली चुल्हाजोगे

खाये  दूधम्हा  खजूर......6

गोल  सूर्याकडे  देखी

चाले  गरिबीना  पाय...

भाकरना   तपासम्हा

त्येंले व्हये संध्याकाय.....7

ऊन   आंगव्हर   मीरे

पेये  रंगतन्ह  पानी...

नहीं सावलीले कीव

तीन्ही न्यारी मनमानी.....8

सूर्य आथाना तो तथा

बुडे  धरतीम्हा  खोल...

सांगे  बिल्लासनं पोट 

माल्हे  भाकऱनं  मोल.....9

==================

==================

कवी **प्रकाश जी. पाटील....

/////////पिंगळवाडेकर..........

************************

================

================

पापी  पोटना  सवाल

गर्जे  कोंबडानी  बांग...

आज फेडसी रे कसा

भुकी आतडीना पांग......1

वाजे गल्लोगल्ली टाय

गया  खल्ले वासुदेव...

जठे  तठे  झापटाम्हा

पोटकर्ता 🙏उठाठेव......2

खुराडाना तो कोंबडा

कोरे उखल्लाम्हा दाना...

रडे  लेकरू  झुयीम्हा 

त्येन्ही भूक मांगे थाना....3

गाय  देखी  वासरूनी 

भूक  गोठाम्हा  हुंबरे...

अन  बिचकाये माडी 

तिन्हा  हालेत  झुंबरे.......4

म्हणे  मंदीरना  घण्टा

हरे, राम,  हरी,कान्हा...

आथं गोठाम्हा वासरू

देखे मायना तो पान्हा.....5

सुर्य  नींघताच  दिसे

बठ्ठा   रस्ताले   मजूर...

भागबल्ली चुल्हाजोगे

खाये  दूधम्हा  खजूर......6

गोल  सूर्याकडे  देखी

चाले  गरिबीना  पाय...

भाकरना   तपासम्हा

त्येंले व्हये संध्याकाय.....7

ऊन   आंगव्हर   मीरे

पेये  रंगतन्ह  पानी...

नहीं सावलीले कीव

तीन्ही न्यारी मनमानी.....8

सूर्य आथाना तो तथा

बुडे  धरतीम्हा  खोल...

सांगे  बिल्लासनं पोट 

माल्हे  भाकऱनं  मोल.....9

==================

==================

कवी **प्रकाश जी. पाटील....

/////////पिंगळवाडेकर..........

************************

😄🙏पोट 🙏😄

 😄🙏पोट 🙏😄

================================

देखा  चुईचाई  डोया

पोटसाठे  गाये घाम...

सिरिष्टीना  पाठव्हर

चाले जठे जठे काम......1

तुम्नी आठून्ग तठून्ग 

तुम्ही  तंगाडा  नजर...

चालू शे चौफेर देखा

पोट  पुंजाना  गजर......2

धर्तरीना  पाठेपोटे हालचाल नीत दिसे...

पोटकर्ता कोण कसं 

पत्तं न्यारं न्यारं पीसे......3

घास कमाईना कसा 

येस कोंथाबी रे मार्गे...

देखे  भाकरले  तावा 

तव्हयच दोन्ही पार्गे.......4 

मारे  शावसुद  शाव 

सात  मजली  बढाई...

चोर, भामटाबी  लढे

चार बल्कानी लढाई......5

लागे आतडीले फास

सोडी मुर्दारनी नीती... 

लाथ मारे काढे पानी

त्येंनी हेर सदा जित्ती.....6

जीत्ता जीवनाच मांघे 

हाऊ  पोटना  पसारा...

त्येल्हे  भरता  भरता

व्हस कीतला घसारा.....7

================

================

कवी.. प्रकाश जी. पाटील 

पिंगळवाडेकर /////////////

---------------------------------

🙏कालाय तस्मै नमः🙏

 🙏कालाय तस्मै नमः🙏

****************************************

घट्या  फिरे  घरोघर

टाके खोंगखोंग दाना...

दये  धन्हीनी  कमाई

धाडे  माहेरले  गाना......1

माजघर्ना  खांब धरी

रोज  आंगमोडे  रही...

तिन्हा नखराले देखी

व्हये पानी पानी दही.....2

चुल्हा आनी उलचूल

सदा जोडंघोडं राजी...

राम तपाडे  तो तावा 

सीता वघारे ती भाजी....3

कांदा  भुंजेल  समार

माय  घरोघर्नी  वाटे...

वर्ला  रगडे  शिव्हर

बोटे अख्खं घर चाटे......4

नहीं  बस्तस  जेवाले

लाई मांडीले रे मांडी...

सदा  घाईगर्दी  सांगी 

दीन्हं  घरपण  सांडी......5

ग्यात मोडना भावमा

तांबा पित्तयना भांडा...

देखी तावानी तेलोरी 

रडे खापर्ना तो मांडा......6

नव्वी पिढीनी रे गाये

जुना जमानानं बिल्लं...

कुदे  घरोघर  आते

रांधनीम्हा नव्वं पिल्लं....7

****************************************

कवी... प्रकाश जी.पाटील

//पिंगळवाडेकर //////////

********************

झायं आपुरं आभाय

 [अहिरानी खान्देशी बोली भाषा]                                    

     झायं आपुरं आभाय

जोतिबानी वं अस्तुरी 

मन्ही सायतरा माय

माय शिकनी व साय

         ग म भ न र्हास काय ॥धृ॥

शिकी सवरीनी माय 

उनी शिकाडाले साय

माय आम्हना करता

         झायी सारसता माय ॥१॥

नही ठाऊक आम्हले 

न्यानेसरी र्हास काय

ग्यान शिकाडे आम्हले 

           एक सायतरा माय॥२॥

दीन अनाथ लेकरु

मन्ही साऊ नी समायं

माय झायी सेवाभावी

        दिनरात खस्ता खाय ॥३॥

आशी व्हयी गयी माय

मन्ही सायतरा माय 

हिना मुयेच आम्हले 

        आज आपुरं आभायं ॥४॥

    *--निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये. 

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

शब्दार्थ-- अस्तुरी =पत्नी, मन्ही =माझी, सायतरा =सावित्री,  साय=शाळा, र्हास=राहते, उनी=आली, सारसता=सरस्वती झायी=झाली, ग्यान=ज्ञान, न्यानेसरी =ज्ञानेश्वरी, समायं=सांभाळलं, व्हयी गयी=होऊन गेली, हिनामुये =हिच्या मुळे, आभाय=आभाळ, आपुरं=अपुरं अपूर्ण.

  ~~~~~~  ~~~~~~~~~~  ~~~~~~

🌷उंन धपालें लाग्न🌷

 🌷उंन धपालें लाग्न🌷

                  -----------

       ......नानाभाऊ माळी


भाऊ-बहिनीस्वन!

जपेलं यांय धर्तीवर पाय ठेवता बरोबर वात्रायेलं पोर्यांगत लामेंनथिन सोतांनां हातम्हा चटकेल काठी लीस्नि हानानं चालू चालू करी देस!सक्कायलें बरं वाटस भाउस्वन!कोंम कोंम उंन ऱ्हास!पन आपुन साटावर वरवर चढो तसा त्यांन्हा जोर आखो वाढतं जास!डोकालें!.. कानफट्यालें झोडतं ऱ्हास!घरमा हुपारा व्हस!...बाहेर चटकाडतं ऱ्हास!..🌷


उंन म्हणजे काय से मंग?..उंच उंच यांय वर चढत ऱ्हास!उकयेत ऱ्हास!उत्रानं मांगे चालनी जास!उत्तरायनं सुरू व्हयी जास!यांय मोठा..रात धाकली येत ऱ्हास!मुकली येयं यांय टकोराबन     बठ्ठास्ले तोंड दखाडी हासत ऱ्हास!हुना हुना परंसाद वाटतं ऱ्हास!डोयालें नजरे पडत नई इतला तपेलं ऱ्हास!आंगलें   चटकाकडी!...पायस्ले भुंजत ऱ्हास!...माले वाटस त्याले उंन म्हनो!मंग तठेंग मव्हरे उंडाया लागी ग्या आस म्हनो!🌷


भाऊ बहिनीस्वन!

मार्चनां पहिला हप्ता सुरु से!आजून च्यार-पाच दिनम्हा महाशिवरात्री यी!...हिवायालें बायागुंता 'व्हयी' आजून उनी नई!...मंग मव्हरे गुडीपाडा-आखाजी!....सांगानी गोट अशी से भाउस्वन....हिवाया बयानां मव्हरेचं उंन चटका दि ऱ्हायनं!पाय भुंजालें लागी ग्यात!हूबा गहू कोल्ला खटक व्हयी ऱ्हायनात!हरभरा आजून हातमा उना नई!...जिमीनलें शंकरपाळी पोपडा दिखालें लागी ग्या!भेगा पडी ऱ्हायन्यातं!इतलाम्हा कथाईगं उना हाऊ उंडाया?🌷


वावरनां बेचाया बांधवर झोपाया निमंनां झाडे हूबा सेतस!झाडे जिमिनव्हरथिन फांट्यापाउत आंगलें संकरपायास्निगत चऱ्या पडेल सालनी झावर पंघरेंलं सेतंस!.. बठ्ठा निमंनां झाडे दाट नियागार पांटास्मा पंधरा तीन हाटनी लेकरवायी आंडेरनांगत दिखी ऱ्हायंनांत!आथा तथा वावरनां बांधेस्वर आखो गनज झाडे नजरे पडी ऱ्हायंतातं! 🌷


हिव्वरं,बाभुई,चिंचास्ना झाडे वारावर हाली-हुली झोका खेयी ऱ्हायंनांत!मनमन उन चटकी ऱ्हायंतं!यांय डोकावर बठेल से!डोकं तपाडी ऱ्हायंनं!आंग तपाडी ऱ्हायंनं!दुपारनां पाह्यरें उननां चटकाम्हा,हाड्या-चिडया,व्हलगा,

केगाया निमनां झाडवर पखे पसरी आल्लग-आल्लग फांट्यास्वर सावलीलें यी बठेल सेतस!आपापलां सूर लायी गाणं म्हनी ऱ्हायनांतं!दुपारनां उनम्हा आथा तथा काटाया झाडेस्वर,बांधवरनां कोल्लाखटक गवतवर बारीक किरकोळा 'चिरररर'असा आवाजनी लामेंन लायी!सूर लायी गांना म्हनी ऱ्हायंनांत!🌹


दुफारन्हा पाह्यरे आउत सोडी बैलस्ले निमनी सावलीम्हा     गाडानी साठलीलें बांधेल सेतस!तठेचं कडबा मोडी-माडी बैल चारा खायीस्नि वागूल करी ऱ्हायंनांत!भात्यानी भाकर सोडी औतक्या ताटलीम्हा श्याक वती भाकरनां काला कुस्करी-कास्करी रगडी-मुसडी वरपी ऱ्हायनां!तोंडलें लावालें नागलीन्हा पापड,निय्या मिरचीस्ना खुडा,आंगेन्हा वावर म्हायिन उपाडी आनेलं धव्या कांदा! एकच बुक्कीम्हा फोडी आथा- तथा उधयेलं दिखनां!....आंगे इस्टीलनां गुंडाम्हा पानी आनेल से!...तपेल उनम्हागुंडाम्हानं पानी हुन व्हयी जायेलं से!गुंडान्हा गयालें धरी औतक्या भाउनी गल्लासम्हा पानी वतं!...खुडा खायीस्नि तोंड बयी ऱ्हायन्त!मातरं कोथमेरं-लोसन टाकेल खुडा तोंड निवायी टाकस!🌷


... दोन गल्लास पानी घटघट तोंडन्हा नय्यडाम्हा उतरनं तव्हय कोठे भाउनी डेंडारर्णी दिन्ही!सुक्कपटक उनम्हा  गोटायी-गिटिंग निमंन्ही सावलीम्हा आयसतं-मायसतं खायीस्नि गाडानी साटलीवरचं आंग टाकी दिन्ह!डोया पांगी ग्यात!लोयलाय चालूचं व्हती!...डोयालें-डोया लागी ऱ्हायंतातं!उनन्ह्या झया झाडनी सावलीम्हा घुशी गालवर नाची ऱ्हायंत्यात!साखर डुलका येवाना घाव नी...तिथलाम्हा  गोमाशी मारानां घावम्हा बैलनी शेपटी खन्नकंनं भाउनां तोंडवर बठनी! शेपटीनां जोरम्हा सनका बठनां!जोरम्हा आल्लायी      गाडान्हा साठलावर उठी बठनां


  बैलस्ना मव्हरे टाकेलं कडबानां पाटा पडेलं व्हता!बैल दोन्ही कुखा तट व्हयेल दिखनांत!     त्यास्ले हेरनां थायनांम्हा पानी दखाडी!... कलता यांयलें आखो औत जुपी वावरम्हा हेट्या वऱ्हा  फिरत ऱ्हायन!यांय खल्ली वरलांगे कंडलेलं दिखनां!बैल हापी हापी निस्ता लाय गायी ऱ्हायंतातं!यांय बुडावर गाड घरलें जात ऱ्हायन!🌷


भुंजायेलं उंन उंडायांनी याद करत ऱ्हास!जीव जित्रबस्ले सावलीम्हा तंगाडतं ऱ्हास!हार साललें उंडाया यी ऱ्हायना!....मांगला वरीसथिन उज्जी चटकाडी ऱ्हायना!मानोस मानोसथिन दूर जायी ऱ्हायना!मानोस उंडाया व्हयी ऱ्हायना!उंडायांगत वागी ऱ्हायना!पऱ्हा जायी ऱ्हायनां!मानोस निसर्ग बदली ऱ्हायना!....निसर्ग खे दखाडी ऱ्हायना!....🌹


भाऊ-बहिनीस्वन!

आपुन निसर्गानां आंगे जाउत!झाड पानीन्हा मांगे ऱ्हाउत!...मव्हरे आखो भेटसुत!....नवा इशय संगे!...आशय संगे!....तवलोंग राम राम मंडई!...राम राम!🌹

         🌷-----------------🌷

......नानाभाऊ माळी

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे(ह मु हडपसर,पुणे-४११०२८)

मो.नं.७५८८२२९५४६

         ९९२३०७६५०९

दिनांक-०६मार्च २०२१

पार

 😄🙏पार 🙏😄

****************************************

झाड वडनं सम्हाये

गाव  भायेरना पार...

तोले आंगव्हर तोबी

रोज सावलीना भार.......1

ह्याच  पारव्हर  मिटे

गाव शिवना निवाडा...

ह्याच  पारव्हर  गर्जे

गुलब्याना तो पवाडा......2

कध्ये  भजन  कीर्तन

व्हये गोठाड्यानी गोट...

गप गफोडाम्हा रोज

व्हये  गाव  लोटपोट......3

नाक नथम्हा सजाडी

बाया  गुंढायेत  सूत...

तठे  अम्मावस  येता 

भेटे  भामटास्ले  भूत.....4

लेता  बाटलीना घोट

मुंगा व्हये तठे  हत्ती...

देखे नही न्हानामोठा 

किस झाडकी तू पत्ती....5

कोन्ही नजेरम्हा दिसे

पापी लालूचनी भूक...

बाई बावडीनी छाती

तठे  करे  धाकधूक.......6

करे  उजागरा  रोज

कुत्रा गावना राखोया...

पाय पोटम्हा तो घाले

लाये कोपराम्हा डोया....7

आठे  दुफारना  भरे

डाव टक्कारास्ना रंगे...

खेय खेता व्हये कज्या

झोप  उंढायानी  भंगे.....8

हिवायामा धल्लापल्ला 

तठे  उनले  खायेत...

बिडी  शिलगाई  चाले

बारा गावेस्नी पायेत......9

वड  हुभा शे  आजून

आनी धसीग्या तो पार...

गयी  गावनीबी  रया

व्हती जीबी थोडीफार..10

================================

कवी.. प्रकाश जी पाटील..

******पिंगळवाडेकर ////

-------------------=-----------

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...