😄🙏पार 🙏😄
****************************************
झाड वडनं सम्हाये
गाव भायेरना पार...
तोले आंगव्हर तोबी
रोज सावलीना भार.......1
ह्याच पारव्हर मिटे
गाव शिवना निवाडा...
ह्याच पारव्हर गर्जे
गुलब्याना तो पवाडा......2
कध्ये भजन कीर्तन
व्हये गोठाड्यानी गोट...
गप गफोडाम्हा रोज
व्हये गाव लोटपोट......3
नाक नथम्हा सजाडी
बाया गुंढायेत सूत...
तठे अम्मावस येता
भेटे भामटास्ले भूत.....4
लेता बाटलीना घोट
मुंगा व्हये तठे हत्ती...
देखे नही न्हानामोठा
किस झाडकी तू पत्ती....5
कोन्ही नजेरम्हा दिसे
पापी लालूचनी भूक...
बाई बावडीनी छाती
तठे करे धाकधूक.......6
करे उजागरा रोज
कुत्रा गावना राखोया...
पाय पोटम्हा तो घाले
लाये कोपराम्हा डोया....7
आठे दुफारना भरे
डाव टक्कारास्ना रंगे...
खेय खेता व्हये कज्या
झोप उंढायानी भंगे.....8
हिवायामा धल्लापल्ला
तठे उनले खायेत...
बिडी शिलगाई चाले
बारा गावेस्नी पायेत......9
वड हुभा शे आजून
आनी धसीग्या तो पार...
गयी गावनीबी रया
व्हती जीबी थोडीफार..10
================================
कवी.. प्रकाश जी पाटील..
******पिंगळवाडेकर ////
-------------------=-----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा