🌷उंन धपालें लाग्न🌷
-----------
......नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
जपेलं यांय धर्तीवर पाय ठेवता बरोबर वात्रायेलं पोर्यांगत लामेंनथिन सोतांनां हातम्हा चटकेल काठी लीस्नि हानानं चालू चालू करी देस!सक्कायलें बरं वाटस भाउस्वन!कोंम कोंम उंन ऱ्हास!पन आपुन साटावर वरवर चढो तसा त्यांन्हा जोर आखो वाढतं जास!डोकालें!.. कानफट्यालें झोडतं ऱ्हास!घरमा हुपारा व्हस!...बाहेर चटकाडतं ऱ्हास!..🌷
उंन म्हणजे काय से मंग?..उंच उंच यांय वर चढत ऱ्हास!उकयेत ऱ्हास!उत्रानं मांगे चालनी जास!उत्तरायनं सुरू व्हयी जास!यांय मोठा..रात धाकली येत ऱ्हास!मुकली येयं यांय टकोराबन बठ्ठास्ले तोंड दखाडी हासत ऱ्हास!हुना हुना परंसाद वाटतं ऱ्हास!डोयालें नजरे पडत नई इतला तपेलं ऱ्हास!आंगलें चटकाकडी!...पायस्ले भुंजत ऱ्हास!...माले वाटस त्याले उंन म्हनो!मंग तठेंग मव्हरे उंडाया लागी ग्या आस म्हनो!🌷
भाऊ बहिनीस्वन!
मार्चनां पहिला हप्ता सुरु से!आजून च्यार-पाच दिनम्हा महाशिवरात्री यी!...हिवायालें बायागुंता 'व्हयी' आजून उनी नई!...मंग मव्हरे गुडीपाडा-आखाजी!....सांगानी गोट अशी से भाउस्वन....हिवाया बयानां मव्हरेचं उंन चटका दि ऱ्हायनं!पाय भुंजालें लागी ग्यात!हूबा गहू कोल्ला खटक व्हयी ऱ्हायनात!हरभरा आजून हातमा उना नई!...जिमीनलें शंकरपाळी पोपडा दिखालें लागी ग्या!भेगा पडी ऱ्हायन्यातं!इतलाम्हा कथाईगं उना हाऊ उंडाया?🌷
वावरनां बेचाया बांधवर झोपाया निमंनां झाडे हूबा सेतस!झाडे जिमिनव्हरथिन फांट्यापाउत आंगलें संकरपायास्निगत चऱ्या पडेल सालनी झावर पंघरेंलं सेतंस!.. बठ्ठा निमंनां झाडे दाट नियागार पांटास्मा पंधरा तीन हाटनी लेकरवायी आंडेरनांगत दिखी ऱ्हायंनांत!आथा तथा वावरनां बांधेस्वर आखो गनज झाडे नजरे पडी ऱ्हायंतातं! 🌷
हिव्वरं,बाभुई,चिंचास्ना झाडे वारावर हाली-हुली झोका खेयी ऱ्हायंनांत!मनमन उन चटकी ऱ्हायंतं!यांय डोकावर बठेल से!डोकं तपाडी ऱ्हायंनं!आंग तपाडी ऱ्हायंनं!दुपारनां पाह्यरें उननां चटकाम्हा,हाड्या-चिडया,व्हलगा,
केगाया निमनां झाडवर पखे पसरी आल्लग-आल्लग फांट्यास्वर सावलीलें यी बठेल सेतस!आपापलां सूर लायी गाणं म्हनी ऱ्हायनांतं!दुपारनां उनम्हा आथा तथा काटाया झाडेस्वर,बांधवरनां कोल्लाखटक गवतवर बारीक किरकोळा 'चिरररर'असा आवाजनी लामेंन लायी!सूर लायी गांना म्हनी ऱ्हायंनांत!🌹
दुफारन्हा पाह्यरे आउत सोडी बैलस्ले निमनी सावलीम्हा गाडानी साठलीलें बांधेल सेतस!तठेचं कडबा मोडी-माडी बैल चारा खायीस्नि वागूल करी ऱ्हायंनांत!भात्यानी भाकर सोडी औतक्या ताटलीम्हा श्याक वती भाकरनां काला कुस्करी-कास्करी रगडी-मुसडी वरपी ऱ्हायनां!तोंडलें लावालें नागलीन्हा पापड,निय्या मिरचीस्ना खुडा,आंगेन्हा वावर म्हायिन उपाडी आनेलं धव्या कांदा! एकच बुक्कीम्हा फोडी आथा- तथा उधयेलं दिखनां!....आंगे इस्टीलनां गुंडाम्हा पानी आनेल से!...तपेल उनम्हागुंडाम्हानं पानी हुन व्हयी जायेलं से!गुंडान्हा गयालें धरी औतक्या भाउनी गल्लासम्हा पानी वतं!...खुडा खायीस्नि तोंड बयी ऱ्हायन्त!मातरं कोथमेरं-लोसन टाकेल खुडा तोंड निवायी टाकस!🌷
... दोन गल्लास पानी घटघट तोंडन्हा नय्यडाम्हा उतरनं तव्हय कोठे भाउनी डेंडारर्णी दिन्ही!सुक्कपटक उनम्हा गोटायी-गिटिंग निमंन्ही सावलीम्हा आयसतं-मायसतं खायीस्नि गाडानी साटलीवरचं आंग टाकी दिन्ह!डोया पांगी ग्यात!लोयलाय चालूचं व्हती!...डोयालें-डोया लागी ऱ्हायंतातं!उनन्ह्या झया झाडनी सावलीम्हा घुशी गालवर नाची ऱ्हायंत्यात!साखर डुलका येवाना घाव नी...तिथलाम्हा गोमाशी मारानां घावम्हा बैलनी शेपटी खन्नकंनं भाउनां तोंडवर बठनी! शेपटीनां जोरम्हा सनका बठनां!जोरम्हा आल्लायी गाडान्हा साठलावर उठी बठनां
बैलस्ना मव्हरे टाकेलं कडबानां पाटा पडेलं व्हता!बैल दोन्ही कुखा तट व्हयेल दिखनांत! त्यास्ले हेरनां थायनांम्हा पानी दखाडी!... कलता यांयलें आखो औत जुपी वावरम्हा हेट्या वऱ्हा फिरत ऱ्हायन!यांय खल्ली वरलांगे कंडलेलं दिखनां!बैल हापी हापी निस्ता लाय गायी ऱ्हायंतातं!यांय बुडावर गाड घरलें जात ऱ्हायन!🌷
भुंजायेलं उंन उंडायांनी याद करत ऱ्हास!जीव जित्रबस्ले सावलीम्हा तंगाडतं ऱ्हास!हार साललें उंडाया यी ऱ्हायना!....मांगला वरीसथिन उज्जी चटकाडी ऱ्हायना!मानोस मानोसथिन दूर जायी ऱ्हायना!मानोस उंडाया व्हयी ऱ्हायना!उंडायांगत वागी ऱ्हायना!पऱ्हा जायी ऱ्हायनां!मानोस निसर्ग बदली ऱ्हायना!....निसर्ग खे दखाडी ऱ्हायना!....🌹
भाऊ-बहिनीस्वन!
आपुन निसर्गानां आंगे जाउत!झाड पानीन्हा मांगे ऱ्हाउत!...मव्हरे आखो भेटसुत!....नवा इशय संगे!...आशय संगे!....तवलोंग राम राम मंडई!...राम राम!🌹
🌷-----------------🌷
......नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे(ह मु हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५०९
दिनांक-०६मार्च २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा