😄🙏पोट 🙏😄
================================
देखा चुईचाई डोया
पोटसाठे गाये घाम...
सिरिष्टीना पाठव्हर
चाले जठे जठे काम......1
तुम्नी आठून्ग तठून्ग
तुम्ही तंगाडा नजर...
चालू शे चौफेर देखा
पोट पुंजाना गजर......2
धर्तरीना पाठेपोटे हालचाल नीत दिसे...
पोटकर्ता कोण कसं
पत्तं न्यारं न्यारं पीसे......3
घास कमाईना कसा
येस कोंथाबी रे मार्गे...
देखे भाकरले तावा
तव्हयच दोन्ही पार्गे.......4
मारे शावसुद शाव
सात मजली बढाई...
चोर, भामटाबी लढे
चार बल्कानी लढाई......5
लागे आतडीले फास
सोडी मुर्दारनी नीती...
लाथ मारे काढे पानी
त्येंनी हेर सदा जित्ती.....6
जीत्ता जीवनाच मांघे
हाऊ पोटना पसारा...
त्येल्हे भरता भरता
व्हस कीतला घसारा.....7
================
================
कवी.. प्रकाश जी. पाटील
पिंगळवाडेकर /////////////
---------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा