😭फासीना दोर 😭
नही देवबी देखे त्या
कुणबीन्या आवकया...
दोर औतना बिचारा
त्येल्हे येस खरी दया..........1
तोच खरा बापभाऊ
त्येन्हा पोटम्हा तो बये...
त्येल्हे देवासाठे मुक्ती
औत सोडी तोच पये..........2
तोच नखले जिव्हाई
त्येनं दुःख त्येल्हे कये...
देखे सोबतीन्या हीना
दोर रडे ढये😭ढये..........3
म्हणे, ऊन वारासंगे
तुन्ही हयाती तू दये...
आर्काटीना काटाले तू
रोज नागेपाये सये...........4
मेहनत मोजी मोजी
दोर औतना झिंजाये...
त्येन्हा कस्सटले देखी
धागा तुन्हा रे पिंजाये.........5
उनी सावकारी जप्ती
संगे लये ती बंदूक...
तेम्हा शिकलोट व्हये
तुन्हा मनम्हा संदूक.........6
किदरना आयुष्याले
रोज तोच पंचनामा...
सांगे तूच कुणबीले
माफा दिदे राजीनामा........7
दोर खरा मायपोट
तेन्हा कायजम्हा कीव...
मारी फासीले आराई
आनी मोक्या करा जीव.....8
जसा सुग्रीनना खोपा
वऱ्हे झाडव्हर हाले...
चाले सर्कारी लिखनी
आसू झिरपत खाले..........9
*******************************
*******************************
कवी... प्रकाश जी पाटील....
.......... पिंगळवाडेकर........
---------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा