सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

तुनामान जीव गुतना वं राणी

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

*अहिराणी कविता*

*तुनामान जीव गुतना वं राणी*

तुनामान जीव गुतना ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||धृ||

तुले भेटाले येऊ कसामी
तुनं गावसे चार कोसना ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||१||

तुनावर करस पिरेम मी
तुनी याद माले येसना ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||२||

मनी जिनगी वाट से तू
मी तुना वाटसरू सेना ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||३||

मनासंगे गोड गोड बोल तू
तुना गयासे गयरा गोडना ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||४||

सोडी नको तू जाऊ माले
करी हिरदयना मना तुकडा ...
वं राणी ...
तुनामान जीव गुतना ||५||

✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर
दि.२९/११/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

मनं (षटाक्षरी)

मनं (षटाक्षरी)
मनं भारी मन्ह
वाकड चालनं 
पापनीना खाल 
आसू दपाडीन......

मनं भारी मन्ह 
लच्छ्यान्स वाजनं 
कशे म्हनी उठे 
यादम्हान गानं......

मनं भारी मन्ह 
ये वास घिसनं
फिक्क पडे पाय्ह 
फुलसनं रानं......

मनं भारी मन्ह
फिरे वनवनं
दाटे आंधाराम्हा
पाय्हे सूर्ये येनं......

मनं भारी मन्ह
रेसम आंगनं
हातनी बांगडी 
वाजे किनकिनं......

मनं भारी मन्ह 
म्हने पानी गानं
वन भरी आभाय
नाचन मोरनं.......

मनं भारी मन्ह 
ऐके किरतन 
जाये व दुख 
सर इसरीन.......

मनं भारी मन्ह 
सरता तो क्शन
जिठे तिठे दिशे
दत्त दरसन......

मनं भारी मन्ह 
जीवन सरन 
देव ठेवयी व
तशेच -हावानं......

वनश्री पाटील जालना 
परखड काव्य संग्रह

बोली मन्ही अहिरानी

बोली मन्ही अहिरानी
आम्ही खान्देशी आम्हनी
माय बोली अहिरानी 
हिना हिरदाम्हा मया
         जसं तापीम्हानं पानी॥धृ॥
हिना बठ्ठा सेत भाऊ
आनी बठ्ठ्याच बहिनी
हिना पोटम्हा व मया
             दुनियानी समायनी॥१॥  
ऊन असो असो तानं
जसं पानी माथनीनं
आशी नही सापडाऊ
           दुनियाम्हा फिरिसनं॥२॥
हिले नको मानपान 
साधी तरी अभिमानी
लेकी सुनासना साठी
          हिना हिरदाम्हा गानी॥३॥
त्याच गाना दावस मी
लिखिसनी म्हनीसनी
यावं यावं आयकाले
        मन्ह्या माया बैनी स्वनी॥४॥
   -- निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हिरदाम्हा=हृदयात, तापी=नदीचं नाव, मया=ममता, बठ्ठा =सगळे,  बठ्ठ्याच=सगळ्याच, समायनी =सामावली, माथनीनं =माठातलं, सापडाऊ=सापडणार, हिले=हिला, दावस=दाखवते, मन्ह्या=माझ्या. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

अहिरानी हायकू काव्य

अहिरानी हायकू काव्य

चांद रातले
भारी तुन्हं उजायं
पडे धवयं ...

चांदीनं तुन्हं
देखीन ते रुपडं
लागस येडं ...

देऊ कितल्या
तुले न्यामी उपमां
सेत मनमां ...

सखी म्हनवो
का पिरेयसी तुले
कोढं मनले ...

नातं से जुनं
तुन्हं आनी वं मन्हं 
से पिरेमन्हं ...

तुन्हा बिगर
हाऊ जीव तो मन्हा
व्हस तो सुना ...

मी कवि तुन्हां
तू से मन्ही कविता
जिनगी गुंता ...


विजय व्ही.निकम
धामणगावकर,
चाळीसगाव
आहिराणी बोली कवी ,
खान्देश 
दि.२२/११/२०२०

                                        

जेष्ठ कवी नानासाहेब कैलास संतोष भामरे लासलगाव

मन्हं मन्हं करत करत
मन आपलं भरत नही
धन - दौलत - वावर - शिवार
अरे राख बी उरत नही

मानव जलम भेटना
संसार पुढे लोटत जावो
सुख - दुख आनंदम्हा
अमृत म्हनीन घोटत जावो
सात जलमनी बांधेल गाठ
बायको बी कुकू लावत नही
धन - दौलत - वावर - शिवार
अरे राख बी उरत नही

कुबेरना मायेक खजिना व्हता
संगे कोणी लयी गयं का
लक्ष्मी नारायणना जोडा व्हता
सती कोणी गयं का
मनपाईन सांगस दादासोनी
जलमले काही पुरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

दिन जवय बदलतंस 
जोगे कोणी बसत नही
काय जिभाऊ बरं शे का ? 
कुत्र सुध्दा इचारत नही
बैल बनी वावरमां राबना
आते हात कोणी धरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

येई त्याले घर
जाई त्याले रस्ता शे
जग भलतं वाईट दादा
हावू मार्ग सस्ता शे
पाप भरी वाही ऱ्हायनं
पुण्य काही भरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

हात पाय बशी गयात 
खावाना भाऊ झायात वांदा
एशी गाडीमा फिरत व्हता 
आते तुले चार खांदा
मुलूखभर फिरना तू 
आते मान बी फिरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

इष्टेट - बारदान खूप कमाडं
शेवट कपायले ठोकळाच ना
तिजोरी बँकनी भरत व्हता
आते हातमा भोपळाच ना
रावण सुध्दा पालथा पडना
डोकामा कसं शिरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही !..

चाला पोरी हो पये येचाले

कथा

चाला पोरी हो पये येचाले

सूचना
या कथा मजारला बठ्ठा पात्र काल्पनिक सेतस त्यासना वास्तविक जीवनसी कोणता बी परकारना काडीमात्रना समदं नई अशी ते तो योगायोग समजी लेवा कथा लिखाना उद्देश अहिराणी बोलीना प्रचार प्रसार आनी खेडा मजारला बई राजानी आजनी खरा खातीनी परिस्थिती मांडाना हाऊ एक निस्वार्थपणा,प्रामाणिक परेत्न से ...

कथा बद्दल जराख

माघला दोन वरीस पाईन देवना पानी चांगला पडी रायना पिकं, वावर,शिवार निय्यगार से जथा तथा कामधंदानी हायतोबा घाई गर्दी से.बईराजाना वावरम्हां कामे पसात पडेल सेतस कापूस वेचाले,गहू पेराले,खत लावाले,कांदा लावाले,बारा धराले,दाना(धान्य)काढाले मजूर भेटी नई रायन.बईराजा किदरी जायेल से तो रोज मजूरना दार पुढे खेटरा झिजाई रायना आनी मजूर तेले रोज आज येसू सकाय येसू सांगी रायनं,एकंदर हाई परिस्थिती आज परतेक खेडाम्हा देखाले आयकाले भेटी रायनी,आनी या परिस्थितीम्हा बईराजा आनी मजूर यासना मजारला संवाद जराखा इनोदी कथाना रूपम्हा आपला समोर सादर करस तो तुम्हले बठ्ठासले नक्कीज आवडी आशी आशा धरस.

कथाकार 
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगांव
अहिराणी बोली कवी, गितकार,कथाकार-खान्देश
दि.२१/११/२०२०


चला तर मंग ...
आते कथाकडे जाऊत ...

चार पाच दिन पाईन नामु ताथ्या मजूरना घर चक्कर वर चक्कर मारी रायना पन एक रोज्या बी भेटत नई तरी बी आज मोठाभु
आशाना मारे मेयवालाना घर येल ऱ्हास ...

आंगल म्हा उभा राही मोठा आवाज देस ...

नामु ताथ्या :-वैनजी आहो  वैनजी ...मोठाभु सेत का घर

(घर म्हाईन वैनजी आवाज देस)
वैनजी :-कोन से ..!

नामु ताथ्या :-मी नामु ताथ्या !

वैनजी :- ताथ्या तुमीन सेतस का ? माले वाटणं परकास आप्पा सेत ! बोला काय काम काढ व्हतं आज (बठठ माहीत से तरी बी)

नामु ताथ्या :-कोना वावरम्हां जाई राईनात सकाय पये वेचाले
आमनीकडे बी या दोन चार दिन बठ्ठ वावरम्हां दही भात व्हई जायेल से !

वैनजी :-परकास आप्पां तेसना वावरम्हा जाई रायनुत रोकडा पैसा दि जायेल सेतस त्या दोन दिन पयले आज ताकना डबा देवाले ई रायनात तेसनीज वाट देखी रायनू मी शाकले कढी ऱ्हांधानी व्हती म्हनीसन !

नामु ताथ्या :-मंग काही जमाव नई सकाय ?

वैनजी :- आज नी यायनं से तेसनं पये येचानं पन अडीचशे रुप्या थाईन कालदिनज भगा मास्तर पया दि जायेल सेतस !

नामु ताथ्या :-वैनजी अशी करा मी तुमले तीनशे रुप्या रोज देस पन मना वावरम्हां पये येचाले या भलता हाल सेतस आखो देवबा वरथाईन गर्दी न्यारा करी रायना ,माघामोलना कापूसन्या कवड्या व्हई जातीन !

वैनजी :-दम खावा मी तुम्हना भाऊ ले शोधस (आज लोक भाऊले काईज ईचारेल नई)
काहो ह्या ताथ्या काय म्हनी रायनात तीनशे रूप्या रोज दी रायनात काय करतस मंग 
(आते लालूचम्हा गोट ई जास
तेवढाम्हा मोठाभु म्हनस)

मोठाभु :-काव चार दिन पयले परकास आप्पाना पया लेलं सेतस कालदिनज भगा मास्तर पाईन पया लेलं सेतस आज आखो नामु ताथ्या पाईन ली रायनी मंग सकायले का मवनदादांना वावरम्हा जासी तुनबी काही खरं दिखत नई माले !

वैनजी :-गुच्चीप बठा तुमीन तुमले काय समंजस घर येती लकशमीले असे पाठ दावनी पडस का !
ताथ्या तुमीन घर जावा निवांत आमीन येसूत सकाय तुम्हना वावरम्हां !

नामु ताथ्या :- भलता उपकार व्हतीन वैनजी तुम्हना !

दुसरा दिन सकायले

नामु ताथ्या आंगतोंड धोई मोठाभुना घर चक्कर माराले उनात आनी म्हणतस...

नामु ताथ्या :-मोठाभु ओ मोठाभु सेत का घरम्हां 

(घरम्हाथिन आवाज देस पोरगा)

पोरगा :-ताथ्या मन्हं पप्पां त्या का पायठेज गावले ग्यात !

 नामु तात्या :- आरे पन त्या ते आज मन्हा वावरम्हां येवाव व्हतात ना ? 

पोरगा :- ताथ्या आम्हनी गावनी आजी मरी गई तठे ग्यात त्या आते काही आठ दहा दिन येवात नई त्या !

नामु ताथ्या :- जाऊ दे मंग आते काय नाईलाज से तुन्ही आजलीज मरी गई मी देखस आते दुसरं कोनी भेटीन ते !

(ताथ्या आते गयरा किदरी जायेल व्हता पन काय करी मजूर ना मवरे हात टेकी देल व्हतात.चालता चालता शानाभुना घर जोडे थाईन जाई रायनथा म्हणीसन ताथ्यानी भाहीर थुन शानाभुले आवाज दिधा ...)

नामु ताथ्या :- शानाभुरे ओ शानाभु से का घरम्हां !

(तेवढाम्हा देवका धल्ली काठी टेकत टेकत भायिर उनी आनी तपकीर सुंगत सुंगत बोलनी ...)

देवका माय :-ताथ्या से का ?
(ताथ्यानी व्हकारा भरा )

नामु ताथ्या :- हवं मी ज से देवका माय !

देवका माय :- काय काम व्हतं आम्हना शान्या कडे !

नामु ताथ्या :- माय व्हका ली ऊनथू पये येचाना त्या मोठाभु नी हा सांगेल व्हतं पन तेंन्ही सासू जात रायनी त्या दोन्ही जीव वाटे लावाले चालना ग्यात 
मंग आते आईन वखतले कोनले रोजे देखु म्हणीसन उनथु शानाभु कडे कोठे जायेल से तो !

देवका माय :- काय म्हणस ताथ्या मोठाभुनी सासू मरी गई असं ! तेले मरी खायजो ... शिक्क्याले ...लबाड कथाना ...
असं सांग तुले त्या पोऱ्यानी 
अरे ताथ्या तेनी सासू दोन महिना पयले कोरोना व्हई मरी गई ह्या भडवा वाटे लावाले बी ग्यात नई कितला लबाड बोलस तो पायटेज चेटना व्हता तो घर शान्याले होका लईसनी 

नामु ताथ्या :- वं तेनी बय मारू मी तिनशे रुप्या रोज थाईन रोख पया दिधात तेले कालदिन आज तो दुसराना वावरम्हां चालना ग्या !कोना वावरम्हां ग्या तो भडवा ...

देवका माय :- तो तेन्ही ती बडबडी बायको सुंदरी आनी आमन्हा शान्या मन्ही ववू रंजी या बठ्ठा भिकारी आबाना वावरम्हां पायटेज न्याहरी बांधी 
चालना ग्यात माले दहा रूपे किलोगंती पये येचाले ...

(आते नामु ताथ्यानं कटबन जिव्हर ई जायेल व्हतं)

नामु ताथ्या :- देख देवका माय पये कसबी फुटी जायेल से एक बी मजूर भेटत नई येसनी माले हा सांग आनी खुशाल त्या भिकारी आबाना वावरम्हां चालना ग्यात हाई काही बराबर नई से ...

देवका माय :- हवं गड्या मी तेज ते म्हनी रायनथू की हाई बडबडी सुंदरी पायटेज कढीनी शाक लिसन उनी आनी आम्हना बिनडोक भेजाना वांदरेसले फिताडी गई देख ना रे भु ताथ्या !

ताथ्यानी देवका माय ले येस आस सांगी घरकडे उना आनी रिकाम्या बोन्दऱ्या लिसन वावरकडे जावाले लागना तेवढा दिवाईले येल दोन्ही आंडरी मवरे उन्यात आनी ताथ्याले बोलन्यात ...

ताथ्या आमीन बी येतीस पये येचाले वावरम्हां ...
तुमन्हा हाल देखावतस नई आमन्हा घाई ...

ताथ्या :- पोरी हो दिवाईले येल से तुम्हींन बापना घर जवाईजमले माहिती पडनं ते त्या काय म्हनतीन माले ?

आंडेर ;- काही नई बोलावं ताथ्या आमीन बी शेतकरीज सेतसना ! आनी आम्हनी माय सरगे गई तवय पाईन तुमिनज माय आनी बाप म्हनी आम्हनं बठठ करी रायनात ना !

(आते मातर नामु ताथ्याना बान फुटी जायेल व्हता ढसा ढसा रडना ताथ्या आनी सोताले सावरत आसू बंडीले पुसत बोलना ...)

नामु ताथ्या :- चाला पोरी हो 
पये येचाले बठ्ठा पये येची टाकुत दोन चार दिनम्हा मग मी तुम्हले मन्हा नातरेस्ले सहेरम्हा जाई भारी कपडा लयसू ,फटुकडा लयसू आनी तुम्हले भारी भारी साडी लयसू
सांगा बर तुमले कोनती साडी आनु बरं

दोन्ही आंडरी एक साथ :- ताथ्या आम्हले ना ...
आम्हले ना ...आते ती नवाईन येल से ती साडी लय ज्यात !
कोरोना साडी

कथा समाप्त

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

रातदिन बयस पोटम्हा...

...रातदिन बयस पोटम्हा...
================================
गन  पुंजात लाल गोटा,  
नशिबना मी भोराभोटा... 
देव झाया माले खोटा, 
झुयी देखी हात थोटा....
जीव  आम्हना  छोटा,
लालची रिवाज मोठा, 
गया दोन्हीस्ना घोटा, 
बांडी  इज्जतनासाठे. 
मोडात  ह्या  बखोटा... 
सुना करी टाका दादा, 
मन्हा  मंदीरना  ओटा...
धज  आणि  कयसले, 
त्येनी खड्डाम्हा लोटा...
ताजम्हाल भांतू मीबी, 
पाया व्हूईग्या  वांझोटा...
रानी, न्हई दिसत माले 
आते पुढे वाट... 
खाटवरबी लागत न्हई 
धड आजून पाठ... 
पडी गउ धारम्हा सखी, 
माले दिसेना काठ... 
न्हई कुत्राले पचू दिन्हा 
रानी खिरना ताट.... 
शाहिर प्रकाश बोलें... 
मरेल रसिक डोले.... 
आसं आमृत व्हतं तुन्हा व्हटम्हा.... //3//
रानी रातदिन बयस तू पोटम्हा... 
================
*******शाहिर ********
प्रकाश जी पाटील........... 
..............पिंगळवाडेकर.
================

अहिराणी तुफान इनोदी कथा

अहिराणी तुफान इनोदी कथा

बाप आंडोरनी बढाई धुरपतानी जीराई

कथा बद्दल थोडंख :-

या कथा मझारला पात्र व्यक्ती या समदा काल्पनिक सेतस त्यासना वास्तविक जीवन शी काडी मात्रना समंद नई अशीन ते तो योगायोग समजाना

चला मंग आते कथाकडे जाऊत ...

पोरगा :- ओ ...बापू ...ओ ... बापू  ... बाप्पूरे !

बाप:-काय से रे खैरादी ! काय लाई दिध बापू बापू !

पोरगा :-बापू यंदा मन्हं लगीन करी द्या ना !

बाप :- अस्स का ! बांदर्या तोंडना कामधंदा काही करत नई तुले कोण पोरगी दी रे !

पोरगा :- देखा बापू तुमले अशी नई वाटतं का मन्ह लगीन होवो, तुम्हले नातू व्हवो ,त्या नातू मिशी तानो ...

बाप :- कारे वो सपन देखणारना पोटना मी मिशी तरी ठी का कधी ! तुन मायले तरी मिशी कोठे आवडस मन्हीं !

पोरगा :-काय उपादी शे भो मी मन्हा बायकोना इचार करी रायनू आणि तुमीन मायले काबर मझार लै रायनात !

बाप :- हाई देख मी तुनी गुंता पोरगी देखाले गावो गाव फिरी
उनू पण बांडे कुत्र बी ईचारत नै
पोरीवाला बठ्ठ देखतस !तुनफा काय से झुण झुन्या !

पोरगा :- बापू मन्हा आजलानी तुम्हले पोरगी दिधी तवय काय तुमनाफा काय झुण झुन्या व्हत्यात का ?

बाप :- कारे वो बाटोडना !
बारा परतन जमीन व्हती माफा, खंडीभर गाई म्हशी व्हत्यात,
आजूबाजूना चार खेडाम्हा नाव व्हतं मन्हं ! आनी शेंबड्या तू म्हणस माफा काय व्हतं !

पोरगा :- आते शे का हाई बठ्ठ तुम्हनाफा ! बठ्ठ ते दारूम्हा फुकी दिध ! पोकय बाता आणि ...

बाप :- आणि ... कायरे !
गोल तोंडया ...

पोरगा :- म्हना माले काही बी म्हणा पण हाई खरं से ते कस लागणं !आणि मन्हा लगीनन काय ?

बाप ;- इतला काय कावराई ग्या बायको कुरता ! भेटीनना जराखी कय ते काढ !

पोरगा :- कितली कय काढू आते बरोबरीना बठ्ठा पोरे पोरीसना पोरे रवाले लागी ग्यात ! आणि त्याज पोरे माले काका,मामा म्हणतस !

बाप :- दम धर बेटा एक ठिकाणे पंधा व्हडेल से देखुत आते टाया बठीन ते सोनां सारख पिव्वय व्हई जाई !
सकाय जावन से आपले पोरगी देखाले !

पोरगा :- अशी शे का मंग मी सकाय चांगला सजी धजी तयार र्हासू ...हुर्ये हुर्ये ...
(गानं म्हणस पोरगा)

माले देखाले जावानं से पोरगी  कोण गावनी वाजु मी ढोलगी।।

बाप :- तू ठायका बठ रे आणि हाई देख पाव्हना मवरे नीट बोलजो मी एक सांग तू बढाई चढाई दोन सांगजो बरं !

पोरगा :- आशी से का बापू मग मी चार सांगसू ...

बाप :- ओ चगेल कथाना !जेवढं सांग तेव्हढंज सांगजो नई देशी या नाम्याना नामा करी पाव्हना मवरेज !

पोरगा :- हावं तुम्ही सांग तसीज करसु !

बाप :- ठीक से मंग सकायले तयार रायजो ! आते पड आडा 
लवकर !

पोरगा :- बरबरं ! गुट नाईट बापू !!!

दुसरा दिन

(पोरगिना गावले पोरगी देखाले दोन्ही बाप आंडोर)

(पोरना बाप खिडकी माईन ढुकी देखस आणि म्हणस...)

पोरना बाप :- वं धुरपती देख वं पावना ते ई ग्यात गुडडीले देखाले आवर पटपट घरम्हांन मी पावनास्न स्वागत करस ...

पोरनी माय :- हावं करा तुम्हींन स्वागत तवलोग मी घरम्हांन देखस !

पोरना बाप :- रामराम हो रामराम ! या ... या ... बठा 
आमीन तुमनीज वाट देखी रायनथुत बर झाय लवकर ई लागनात !

पोरगाना बाप (बापू) :-
रामरामजी रामराम !

(बैठक बठेल र्हास तेवढा म्हा पोरना बापले म्हणस )

पोरना बाप :- काय मंग कसा झाया परवास काही तरास गिरास ते नई झाया !

पोरगाना बाप :- काई तरास बिरास झाया नई घरनी गाडी से 
मग काय देखणं  !

(पोरगा मनंम्हा नी मनंम्हा म्हनस काय बेक्कार से भो बापू आते डुक्कर गाडी म्हाईन उतरना एकमेकले ठोकाई)

पोरना बाप :- ओ बापरे तुम्हनाफा गाडी से वाह मंग मन्हा गुडडीनं ते नशीब खुली जाई गाडी म्हा बठी येत जाई आम्हले भेटाले !

पोरगाना बाप :- हावं मग हाई बठी इष्टन पोरगा गुंता से बारा परतन ना केयीना बाग, पाच परतन मोसंबी, आठ परतन संत्री,वीस परतन ऊस ,पाच परतन गांजा लायेल से उसना टिपरास्मा ,पन्नास परतन जमीन से वावरम्हा फारम हाऊस से गावम्हां एक कोटीन्हा बंगला से ...

(मजारज पोरगा बापना कानम्हा सांगस)

पोरगा :- अहो बापू ...गन झाय आते आवरीले नई ते गांजाई...
(पोरना बाप दोन्ही बाप आंडोर
कडे देखत र्हास तेवढा म्हा पोरगा म्हणस)
काही नई काही नई मी बापले सांगी रायनथु बँकामझारला ठेल पैसासनं ! 

पोरगाना बाप :- हावं त्या दहा कोटी रुप्याना त्यात मी मन्हा पोऱ्याना खातावर टाकेल सेत

पोरना बाप :- (घाम पुसत पुसत उठ बशा घालत) ओ बापरे याही तुम्हींन ते नवकोट नारायण सेतस !

पोरगाना बाप :- हवं मग सेज मी नवकोट नारायन

पोरगा :-गुच्चीप म्हणस ,बस करे रे बापू कोट फाटेल से तुन्हा ! चालना नवकोट नारायनं बनाले बय,भलत्या जोर जोर खाईन फेकी रायना आज!
काही नई ... काही नई ...
मी सांगी रायनथु आते लवकर पोर दखाडा आमले परदेश दौरावर जावाण से हाई काम झाय का !

पोरना बाप :- काव धुरपता आन आपला गुडडी ले लय बरं लवकर !

( धुरपता घरम्हाईन देवढीम्हा गुड्डीले आनस आणि तेवढाम्हा पोरगा देव जाणे तोंड लपाडी लेस मग धुरपता पाव्हनासकडे देखस आणि म्हणस ...

धुरपता :-माय वं जवाईबापुसले नहीं लयनात का ? मन्ही गुड्डीले देखाले

पोरगाना बाप :-मंग लयेल से ना हाऊ कोण तुम्हना व्हणारा लाडका जवाई ! वरता मान कर  रे भो देख तुन मन्ही याहीन बाई तुले ईचारी रायनी ! आणि नीट देखीले मन्ही ववु आनी ...तुन्ही बायको !

(पोरगा नी बागे बागे पुरी मान वर करस आणि मग धुरपता नी देख मग नका ईचारु आयका मंग आते ...)

धुरपता :-ओ मन्ही माय वं 
तू शे कारे बंड्या !!! 

पोरना बाप :- धुरपता वा चांगली बात से मंग तुंही नी जावईबापुनी पयलेज वयख से
भलतं भारी से मंग...

धुरपता :- मंग चांगली वैखस मी येलें हाऊ मालेज देखाले उंथा आजुक बी कुवारा फिरी रायना ! पोरी देखत !
पंधरा वरीस बाप फरार व्हता म्हने गाव म्हाईन आते चेटना
माय वं मी वयख नई कशा सोंग बदलाई लोकेसले ठगतस ,तुमले मरी मायना वाखा येवो पापी धोत्रासले !

पोरना बाप :-असं से का मंग !
माले आते कयनं हाई तुन्हं जूनं लफडं से का !

(धुरपताले राग येस मग ती नवरा वर सुटस )

धुरपता :- तुम्ही गुच्चीप बठा वं
एक सबद बोलू नका आते मझार ...पयले येसले देखी लेवू द्या मग तुमले देखस !

(पोरगानं पानी पानी व्हई  जायेल र्हास तो बापले घडी घडी ईशारा करस निघ आठीन,निघ आठीन आणि दोन्ही पयाले लागतस,
तेवढा म्हा धुरपता म्हणस...)

कथा पई रायनात थांबा आठे काय रे नवकोट नारायण नाम्या
काय म्हणस पन्नास परतन जमीन केयी ऊस संत्री मोसंबी गांजा एक कोटींना बंगला फारम हाऊस गाड्या बँकम्हा दहा कोटी 
कारे भामटा कथाना इतलं फेकतस ,काय फुशारक्या मारी रायना व्हतात कवेस्ना एवढी मोठी इस्टन ना मालक !
मन्ही गुड्डीले कुवारी ठेवसु पण देवाव नई निघा आठून लवकर 
नई वावरम्हां गांजा लायेल से आस सांगी जेलन्या रोट्या तोडाले लावसु ....

(दोन्ही बाप आंडरो तोंड काय करी तठींन पई जातस आणि कथा सरी जास)

समाप्त

कथा
विजय व्ही.निकम
धामणगावकर,
चाळीसगांव
दि.१९/११/२०२०

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

आम्हना कान्हबाईना देस

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

*जय खान्देश !*
*आम्हना कान्हबाईना देस*

पहिलं वंदन मन्हं माय
सप्तरशृंगी मायले ...
दुसरं वंदन मन्हं माय
कान्हबाई मायले ...
तिसरं वंदन मन्हं
खान्देशना रसिक मायबापले ...

आम्हना कान्हबाईंना देस
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना बहिणाबाईना देस
जय खान्देश ...जय खान्देश !!

दयन दयता घटयावर
वई गातस बहिणाबाई
कयन्यानी भाकरना घास
मुखे भरतीस हातेघाई ...(१)
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना बहिणाबाईना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !

जिवारी बाजरी डोलस
बईराजाना भारी थाट
खान्देशना शिवारं फुलस
तापीमाय पाजे अमृतना घोट ।।
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना तापीमायना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !!

शामनी माय सांगी ग्यात भारी
असा आम्हना थोर साने गुरुजी
संस्कारनं भारी पेरी ग्यात बीज
पौथिर से भूमी से खान्देशनी ।।
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना साने गुरुजीस्ना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !!

करांतीकारेस्नी पूनेल से माटी
भूमी से शिरीष कुमार यासनी
स्वातंत्र्यांना इतिहास सोनाना
जय हिंदना घोष पडस कानी ।।
आमन्हा कान्हबाईंना देश ...
जय खान्देश ... जय खान्देध !
आमन्हा शिरीष कुमारना देश...
जय खान्देश ...जय खान्देश !!

✍️✍️✍️
गितकार :-
विजय व्ही.निकम,
धामणगावकर,
चाळीसगांव
दि.१५/११/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...