सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

आम्हना कान्हबाईना देस

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

*जय खान्देश !*
*आम्हना कान्हबाईना देस*

पहिलं वंदन मन्हं माय
सप्तरशृंगी मायले ...
दुसरं वंदन मन्हं माय
कान्हबाई मायले ...
तिसरं वंदन मन्हं
खान्देशना रसिक मायबापले ...

आम्हना कान्हबाईंना देस
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना बहिणाबाईना देस
जय खान्देश ...जय खान्देश !!

दयन दयता घटयावर
वई गातस बहिणाबाई
कयन्यानी भाकरना घास
मुखे भरतीस हातेघाई ...(१)
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना बहिणाबाईना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !

जिवारी बाजरी डोलस
बईराजाना भारी थाट
खान्देशना शिवारं फुलस
तापीमाय पाजे अमृतना घोट ।।
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना तापीमायना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !!

शामनी माय सांगी ग्यात भारी
असा आम्हना थोर साने गुरुजी
संस्कारनं भारी पेरी ग्यात बीज
पौथिर से भूमी से खान्देशनी ।।
आम्हना कान्हबाईंना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !
आम्हना साने गुरुजीस्ना देस ...
जय खान्देश ...जय खान्देश !!

करांतीकारेस्नी पूनेल से माटी
भूमी से शिरीष कुमार यासनी
स्वातंत्र्यांना इतिहास सोनाना
जय हिंदना घोष पडस कानी ।।
आमन्हा कान्हबाईंना देश ...
जय खान्देश ... जय खान्देध !
आमन्हा शिरीष कुमारना देश...
जय खान्देश ...जय खान्देश !!

✍️✍️✍️
गितकार :-
विजय व्ही.निकम,
धामणगावकर,
चाळीसगांव
दि.१५/११/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...