शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

रातदिन बयस पोटम्हा...

...रातदिन बयस पोटम्हा...
================================
गन  पुंजात लाल गोटा,  
नशिबना मी भोराभोटा... 
देव झाया माले खोटा, 
झुयी देखी हात थोटा....
जीव  आम्हना  छोटा,
लालची रिवाज मोठा, 
गया दोन्हीस्ना घोटा, 
बांडी  इज्जतनासाठे. 
मोडात  ह्या  बखोटा... 
सुना करी टाका दादा, 
मन्हा  मंदीरना  ओटा...
धज  आणि  कयसले, 
त्येनी खड्डाम्हा लोटा...
ताजम्हाल भांतू मीबी, 
पाया व्हूईग्या  वांझोटा...
रानी, न्हई दिसत माले 
आते पुढे वाट... 
खाटवरबी लागत न्हई 
धड आजून पाठ... 
पडी गउ धारम्हा सखी, 
माले दिसेना काठ... 
न्हई कुत्राले पचू दिन्हा 
रानी खिरना ताट.... 
शाहिर प्रकाश बोलें... 
मरेल रसिक डोले.... 
आसं आमृत व्हतं तुन्हा व्हटम्हा.... //3//
रानी रातदिन बयस तू पोटम्हा... 
================
*******शाहिर ********
प्रकाश जी पाटील........... 
..............पिंगळवाडेकर.
================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...