रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

जेष्ठ कवी नानासाहेब कैलास संतोष भामरे लासलगाव

मन्हं मन्हं करत करत
मन आपलं भरत नही
धन - दौलत - वावर - शिवार
अरे राख बी उरत नही

मानव जलम भेटना
संसार पुढे लोटत जावो
सुख - दुख आनंदम्हा
अमृत म्हनीन घोटत जावो
सात जलमनी बांधेल गाठ
बायको बी कुकू लावत नही
धन - दौलत - वावर - शिवार
अरे राख बी उरत नही

कुबेरना मायेक खजिना व्हता
संगे कोणी लयी गयं का
लक्ष्मी नारायणना जोडा व्हता
सती कोणी गयं का
मनपाईन सांगस दादासोनी
जलमले काही पुरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

दिन जवय बदलतंस 
जोगे कोणी बसत नही
काय जिभाऊ बरं शे का ? 
कुत्र सुध्दा इचारत नही
बैल बनी वावरमां राबना
आते हात कोणी धरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

येई त्याले घर
जाई त्याले रस्ता शे
जग भलतं वाईट दादा
हावू मार्ग सस्ता शे
पाप भरी वाही ऱ्हायनं
पुण्य काही भरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

हात पाय बशी गयात 
खावाना भाऊ झायात वांदा
एशी गाडीमा फिरत व्हता 
आते तुले चार खांदा
मुलूखभर फिरना तू 
आते मान बी फिरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही

इष्टेट - बारदान खूप कमाडं
शेवट कपायले ठोकळाच ना
तिजोरी बँकनी भरत व्हता
आते हातमा भोपळाच ना
रावण सुध्दा पालथा पडना
डोकामा कसं शिरत नही
धन - दौलत - वावर - शिवार 
अरे राख बी उरत नही !..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...