अहिरानी हायकू काव्य
चांद रातले
भारी तुन्हं उजायं
पडे धवयं ...
चांदीनं तुन्हं
देखीन ते रुपडं
लागस येडं ...
देऊ कितल्या
तुले न्यामी उपमां
सेत मनमां ...
सखी म्हनवो
का पिरेयसी तुले
कोढं मनले ...
नातं से जुनं
तुन्हं आनी वं मन्हं
से पिरेमन्हं ...
तुन्हा बिगर
हाऊ जीव तो मन्हा
व्हस तो सुना ...
मी कवि तुन्हां
तू से मन्ही कविता
जिनगी गुंता ...
विजय व्ही.निकम
धामणगावकर,
चाळीसगाव
आहिराणी बोली कवी ,
खान्देश
दि.२२/११/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा