बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

मनं (षटाक्षरी)

मनं (षटाक्षरी)
मनं भारी मन्ह
वाकड चालनं 
पापनीना खाल 
आसू दपाडीन......

मनं भारी मन्ह 
लच्छ्यान्स वाजनं 
कशे म्हनी उठे 
यादम्हान गानं......

मनं भारी मन्ह 
ये वास घिसनं
फिक्क पडे पाय्ह 
फुलसनं रानं......

मनं भारी मन्ह
फिरे वनवनं
दाटे आंधाराम्हा
पाय्हे सूर्ये येनं......

मनं भारी मन्ह
रेसम आंगनं
हातनी बांगडी 
वाजे किनकिनं......

मनं भारी मन्ह 
म्हने पानी गानं
वन भरी आभाय
नाचन मोरनं.......

मनं भारी मन्ह 
ऐके किरतन 
जाये व दुख 
सर इसरीन.......

मनं भारी मन्ह 
सरता तो क्शन
जिठे तिठे दिशे
दत्त दरसन......

मनं भारी मन्ह 
जीवन सरन 
देव ठेवयी व
तशेच -हावानं......

वनश्री पाटील जालना 
परखड काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...