गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

अहिराणी अभंग रामना पहारे अभंग वनमाला पाटील जालना काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

रामना पहारे {अभंग}


रामना पहारे । दाटी व वसनी ।
पांधी बुंजायनी । वावरनी॥१॥

सुरू जया दिन । सारजा मायना ।
सडा गोतमाना । आंगलम्हा॥२॥

वना वासुदेव । दे सुपड भर ।
मायना बिल्लोर । हात भरी॥३॥

खोपाम्हान उठे । चिडी नी कोकीय।
दये भवजाय । लोकवान ॥४॥
 
जोत्याम्हान गाय । पाजे का-हडले ।
राजा सरजाले । टाक खोंडे॥५॥

पिसन वसले । हिवज पानेस्ले।
न्हावाड झाडेस्ले । चारीमेर॥६॥

तापीनी ती थडे। डोंगरनी आंगे।
पैरे भांगेभांगे । तो आबीर॥७॥

टाक तुयशीले । रांझनमा पानी ।
काने काकडानी । घंटा वाजे॥८॥

सुवासीन उठी । भारी आचपय।
चुल्हाना धुक्कय । डोयाम्हान ॥९॥

माहेरनी याद । हिरदम्हा गाना ।
भाऊ तो पाव्हना । हाड्या सांगे॥१०॥

राम पहारन । चाले कीरतन ।
भारी आवसान । भूईवर ॥११॥

कितल कौतीक । नारायन तुन्ह।
घर भरे मन्ह । उजायान॥१२॥

इठू रोज सक्ती । कथाइन देस।
गया कालदिस । नवा वुना॥१३॥

वनू इनवन्या । करे हात जोडी। 
भक्तीनी बी गोडी । लाइस बा ॥१४॥

 वनमाला पाटील जालना 
काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे

"ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे."


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 

(नाशिक येथील भाषण, "जनता" ०८/१२/१९५१)

पोटातील भूक दिलीप पाटील कापडणेदुपारचे बारा वाजले होते.नुकताच शाळेतून घरी आलो होतो.आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गंआई म्हणाली थांब बाळा,मी आताच गरम गरम टाकून देते...!

पोटातील भूक
 दि.१०/४/२०२३
✍️ दिलीप पाटील कापडणे
दुपारचे बारा वाजले होते.
नुकताच शाळेतून घरी आलो होतो.
आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गं
आई म्हणाली थांब बाळा,
मी आताच गरम गरम टाकून देते...!

घरात बघते तर काय,
डब्यात पिठच नाही.
आई इकडे तिकडे हा डबा, 
तो डबा पाहू लागली.
आईकडे मी एकसारखा बघत होतो.
भूक माझ्या पोटात मावत नव्हती.
आई माझ्या करता‌ किलवाण्या
करत होती.
काय करावं काहीच सुचत नव्हतं.
आई दोन तीन घरी पिठा साठी फिरली ...?

कोणी दिलं नाही हो तशीच,
आई माझी माघारी आली.
आईचा तो नाराज चेहरा, 
बघुन पोटातील भूक पळाली.
आईच्या कमरेला मी बिलगलो,
आईला म्हटलं मला भूक नाही गं...?

मी नाही जेवणार आई,
मी आता नाही मागणार 
दोघं एकमेंकाकडे बघत होतो.
रडू‌‌ आवरले जात नव्हतं.
आई कुरवाळत होती.
मायेने डोक्यावरं‌ हात‌ फिरवात होती.
डोळ्यात अश्रू ‌मावत नव्हते.
खरंच भाकरी साठी तिची, तळमळ दिसली मला.
अशी ‌आई नाही जगात तिचे उपकार नाही फिटणार.
 कवी.दिलीप हिरामण पाटील
        कापडणे ता जि धुळे
        मो.नं.९६७३३८९८७३

अहिराणी कविता तनया आल्या गर्भी अलगदकुंज लता त्या आत्मजामुठ बांधूनी जन्मल्या त्याच वल्लरी आत्मजा

तनया 

आल्या गर्भी अलगद
कुंज लता त्या आत्मजा
मुठ बांधूनी जन्मल्या 
त्याच वल्लरी आत्मजा

कम नशिबी जन्मल्या 
कितीतरी त्या कन्यका
पुन्य असूनही नाही 
कधी पूजल्या कन्यका

किती बाजारी विकल्या 
वित्तासाठी त्या तनया 
उगा चढल्या बोहली 
जळे हुंड्यात तनया

मृत ती माया, ममता
कीव कोणती ना सुता
शोषतात त्या अनेक 
घरीदारी दीन सुता 

जन्म जनकाच्या घरी
रचे स्वयंवर पुत्री
भोग भोगण्यास गेली 
रानी वनी फिरे पुत्री

इथे कापल्या रक्ताच्या 
हातांनीच त्या तनुजा
निखा-यात जाळलेल्या
कडेलोट हो तनुजा 

गर्भ भरून जन्मावी 
आई शिवाची दुहिता 
करे स्वराज्य स्थापन
गती स्वप्नांची दुहिता 

लेखणीस तोंड देई
माझी सावित्री मुलगी
गवसणी होय तीच
गगनाची ती पोरगी 

येवू द्या जन्मास बेटी
गोड गोजरीच लेक
शिव जन्मास घालीन
सुकुमार असे नेक

काशीकन्या पाटील
शब्दांचे ऋण काव्यसंग्रह

अक्षय साहित्याची अखंड वारी,वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी

अक्षय साहित्याची अखंड वारी,
वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी :
"""""""""""""""""""""""""""""""""""""""" 
थंडीचे दिवस संपले की, ऋतुराज वसंताचे आगमन होते. फाल्गुनातील होळी रंगांची उधळन करुन जाते. तोच वसंत ऋतुची चाहूल लागते. शिशिराच्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी नव्या उमेदीनं पुन्हा एकदा जादुगार वसंताचा रंगबहार शेला अंगावर पांघरायला तयार होते. तद्वत साहित्य क्षेत्रालाही एक वेध लागतं. मायबोलीच्या अमृत तरुवर *"चैत्रेय"* विशेषांकाच्या रुपाने नवी पालवी फुटते. अक्षयाची, अक्षराची नवी पालवी. *संपादक आदरणीय प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक* यांनी नुकताच *"चैत्रेय"* प्रकाशित केला. या अंकातील दिग्गज लेखक, कवींसोबत आपलीही हजेरी लागणं, हा अक्षय आनंदाचा क्षण आहे. 

                    फाल्गून पोर्णिमा अर्थात होळी-पोर्णिमेला 'वसंतोत्सव' प्रारंभ होतो. होळीत सर्व दुर्गूणांना जाळून सद्गुणांची पूजा बांधली जाते. तशीच साहित्यातील विविध प्रवाह आणि प्रकारांची पूजा संपादक प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक यांनी "चैत्रेय" मधून बांधली आहे. ते सतत २२ वर्षे हा उपक्रम चालवत आहेत. साहित्य साधनेचं हे असिधारा व्रतच आहे. त्यांच्या या साधनेला वंदन आणि अंकाचे मनःपूर्वक स्वागत.! सरांच्या ऋणातच राहतो !! 

© प्रा.बी.एन.चौधरी
     (९४२३४९२५९३)

अहिराणी कविता माय येना जलदीसांगू काय तुले माडी कस सांगू समजाडी रिती पडनी व मायमनी दिहम्हान कुडी

माय येना जलदी

सांगू काय तुले माडी 
कस सांगू समजाडी 
रिती पडनी व माय
मनी दिहम्हान कुडी

घाल दोनज बलका 
रव जराखज संगे
पदरेना रूमालथी 
तोंड पुशी दे ना मंगे 

घिस मांडीवर जरा
थोपडीस तू निजाड
माडी तुन्हा बगलम्हा 
जरा माले बी वागाड 

माले खिजाव कताव 
पन येक साव बोल
घिस शिराई बुडूखे 
करू मारान व मोल

तुन्हा बोट धरी माले
दुन्या समदी दाखाड
नव निव्हायन करी
माडी माले न खावाड

माय माय कोकावस 
मन्ह जराख आयेक 
कशी गया दुर सोडी
कोमजायानीज लेक

माय ये व परतीस
माले येखल गमेना 
कधी दपी गयी तुले
डोया निहायी पाहेना

कसा देवबा रूसना
मन्ही माय दे वापस
काही नही ती सवाय
माले कर रे सोबत

सांगू पख रे पाखडी
मन्ही माडीले सांगावा
आसे करू रे देवबा
ल्हेवो ना कोना इसावा

काशीकन्या पाटील 
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

डॉ.बाबासाहेब तुमच्यालेखनीने केली कमालसंविधान लिहून तुम्हीउडवून दिली हो धमाल

डॉ.बाबासाहेब अंबेडकर
 दि.१३/४/२०२३

डॉ.बाबासाहेब तुमच्या
लेखनीने केली कमाल
संविधान लिहून तुम्ही
उडवून दिली हो धमाल..!

कायदा कानूनचे महत्व
पटवून दिले गरीब जनतेला
कोणी वंचित राहू नका 
हे ज्ञान सांगितले समाजाला..!

भारतीय राज्यघटना चे
तुम्हीच खरे शिल्पकार
लिहून ठेवले पुस्तकात
आमचे हे सारे अधिकार..!

आता कोणी नाही लाचार
आजवर होते अंधारात
खुले केली मंदिर गावतळे
आणले सर्वांना प्रकाशात..!


कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...