गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

अहिराणी कविता माय येना जलदीसांगू काय तुले माडी कस सांगू समजाडी रिती पडनी व मायमनी दिहम्हान कुडी

माय येना जलदी

सांगू काय तुले माडी 
कस सांगू समजाडी 
रिती पडनी व माय
मनी दिहम्हान कुडी

घाल दोनज बलका 
रव जराखज संगे
पदरेना रूमालथी 
तोंड पुशी दे ना मंगे 

घिस मांडीवर जरा
थोपडीस तू निजाड
माडी तुन्हा बगलम्हा 
जरा माले बी वागाड 

माले खिजाव कताव 
पन येक साव बोल
घिस शिराई बुडूखे 
करू मारान व मोल

तुन्हा बोट धरी माले
दुन्या समदी दाखाड
नव निव्हायन करी
माडी माले न खावाड

माय माय कोकावस 
मन्ह जराख आयेक 
कशी गया दुर सोडी
कोमजायानीज लेक

माय ये व परतीस
माले येखल गमेना 
कधी दपी गयी तुले
डोया निहायी पाहेना

कसा देवबा रूसना
मन्ही माय दे वापस
काही नही ती सवाय
माले कर रे सोबत

सांगू पख रे पाखडी
मन्ही माडीले सांगावा
आसे करू रे देवबा
ल्हेवो ना कोना इसावा

काशीकन्या पाटील 
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...