गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

अक्षय साहित्याची अखंड वारी,वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी

अक्षय साहित्याची अखंड वारी,
वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी :
"""""""""""""""""""""""""""""""""""""""" 
थंडीचे दिवस संपले की, ऋतुराज वसंताचे आगमन होते. फाल्गुनातील होळी रंगांची उधळन करुन जाते. तोच वसंत ऋतुची चाहूल लागते. शिशिराच्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी नव्या उमेदीनं पुन्हा एकदा जादुगार वसंताचा रंगबहार शेला अंगावर पांघरायला तयार होते. तद्वत साहित्य क्षेत्रालाही एक वेध लागतं. मायबोलीच्या अमृत तरुवर *"चैत्रेय"* विशेषांकाच्या रुपाने नवी पालवी फुटते. अक्षयाची, अक्षराची नवी पालवी. *संपादक आदरणीय प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक* यांनी नुकताच *"चैत्रेय"* प्रकाशित केला. या अंकातील दिग्गज लेखक, कवींसोबत आपलीही हजेरी लागणं, हा अक्षय आनंदाचा क्षण आहे. 

                    फाल्गून पोर्णिमा अर्थात होळी-पोर्णिमेला 'वसंतोत्सव' प्रारंभ होतो. होळीत सर्व दुर्गूणांना जाळून सद्गुणांची पूजा बांधली जाते. तशीच साहित्यातील विविध प्रवाह आणि प्रकारांची पूजा संपादक प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक यांनी "चैत्रेय" मधून बांधली आहे. ते सतत २२ वर्षे हा उपक्रम चालवत आहेत. साहित्य साधनेचं हे असिधारा व्रतच आहे. त्यांच्या या साधनेला वंदन आणि अंकाचे मनःपूर्वक स्वागत.! सरांच्या ऋणातच राहतो !! 

© प्रा.बी.एन.चौधरी
     (९४२३४९२५९३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...