आल्या गर्भी अलगद
कुंज लता त्या आत्मजा
मुठ बांधूनी जन्मल्या
त्याच वल्लरी आत्मजा
कम नशिबी जन्मल्या
कितीतरी त्या कन्यका
पुन्य असूनही नाही
कधी पूजल्या कन्यका
किती बाजारी विकल्या
वित्तासाठी त्या तनया
उगा चढल्या बोहली
जळे हुंड्यात तनया
मृत ती माया, ममता
कीव कोणती ना सुता
शोषतात त्या अनेक
घरीदारी दीन सुता
जन्म जनकाच्या घरी
रचे स्वयंवर पुत्री
भोग भोगण्यास गेली
रानी वनी फिरे पुत्री
इथे कापल्या रक्ताच्या
हातांनीच त्या तनुजा
निखा-यात जाळलेल्या
कडेलोट हो तनुजा
गर्भ भरून जन्मावी
आई शिवाची दुहिता
करे स्वराज्य स्थापन
गती स्वप्नांची दुहिता
लेखणीस तोंड देई
माझी सावित्री मुलगी
गवसणी होय तीच
गगनाची ती पोरगी
येवू द्या जन्मास बेटी
गोड गोजरीच लेक
शिव जन्मास घालीन
सुकुमार असे नेक
काशीकन्या पाटील
शब्दांचे ऋण काव्यसंग्रह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा