गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

पोटातील भूक दिलीप पाटील कापडणेदुपारचे बारा वाजले होते.नुकताच शाळेतून घरी आलो होतो.आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गंआई म्हणाली थांब बाळा,मी आताच गरम गरम टाकून देते...!

पोटातील भूक
 दि.१०/४/२०२३
✍️ दिलीप पाटील कापडणे
दुपारचे बारा वाजले होते.
नुकताच शाळेतून घरी आलो होतो.
आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गं
आई म्हणाली थांब बाळा,
मी आताच गरम गरम टाकून देते...!

घरात बघते तर काय,
डब्यात पिठच नाही.
आई इकडे तिकडे हा डबा, 
तो डबा पाहू लागली.
आईकडे मी एकसारखा बघत होतो.
भूक माझ्या पोटात मावत नव्हती.
आई माझ्या करता‌ किलवाण्या
करत होती.
काय करावं काहीच सुचत नव्हतं.
आई दोन तीन घरी पिठा साठी फिरली ...?

कोणी दिलं नाही हो तशीच,
आई माझी माघारी आली.
आईचा तो नाराज चेहरा, 
बघुन पोटातील भूक पळाली.
आईच्या कमरेला मी बिलगलो,
आईला म्हटलं मला भूक नाही गं...?

मी नाही जेवणार आई,
मी आता नाही मागणार 
दोघं एकमेंकाकडे बघत होतो.
रडू‌‌ आवरले जात नव्हतं.
आई कुरवाळत होती.
मायेने डोक्यावरं‌ हात‌ फिरवात होती.
डोळ्यात अश्रू ‌मावत नव्हते.
खरंच भाकरी साठी तिची, तळमळ दिसली मला.
अशी ‌आई नाही जगात तिचे उपकार नाही फिटणार.
 कवी.दिलीप हिरामण पाटील
        कापडणे ता जि धुळे
        मो.नं.९६७३३८९८७३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...