बुधवार, १४ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*

*भाग - ४६*

                  दादास्ना आदर्श सामने ठीसन माणिकरावबी जनमभर ब्रम्हचारी ह्राहिन्हात नी व्यायाम क्षेत्रामा मोलन कार्य करीसन उदंड किर्ती मिळायी. हाडवैद म्हनीसन माणिकराव येस्नी दादास्ना वारसा चालायीसन गयरा लोकस्ले दुखम्हायीन मुक्ती दिन्ही. त्याकायले लोकस्ना आसा गैरसमज व्हता की, आखाडामा जायीसन व्यायाम नी कुस्ती करणारा लोक दादागिरी करतस. हाऊ गैरसमज घालीसन शिखेलसवरेलस्ना इचारमा आखाडाना बारामा आप्ला पणा पयदा कया. तव्हयपासुन आखाडा एक सांस्कृतिक केंद्र बनी गये.

                   शायस्मायीन नी व्यायामशायस्मायीन फडास्वर शिस्त पायाना नियम लिखात. बोध लेवान्या म्हणी आणि नकाशा लावात. गणेशउत्सव नी छत्रपती शिवाजीमहाराजस्ना उत्सव सुरु कयात. हर गुरुवारले शायस्ना गिता वाचन, मन ना श्र्लोक, मारुती स्तोत्र नी व्यायामना बारामजारला सामुहिकरित्या म्हणाये. तेन्हा मजारल एक गाण मव्हरे देल शे.

राष्ट्रास रक्षणाला /व्यायाम मंत्र घ्यावा //

जरी शक्ती नाही देही /तरी काय कार्य होई? //

कर्तव्य कार्य करण्या /व्यायाम मंत्र घ्यावा//

शक्ती जरी शरीरी /मन होत कार्यकारी //

शक्तीस वृध्दी देण्या /व्यायाम मंत्र घ्यावा //

शांती मनास लाभे/देहास सौख्य लाभे//

कार्यास सक्त होण्या /व्यायाम मंत्र घ्यावा //

        फॅशनमुये नहीते गुलामी वृत्तीमा परकियस्न्या खेयस्नाकडे  आकर्षित नही व्हता आपीन नामी व्यायामपरकार टिकाळाकरता तरणा जुवानस्ले तेस्नी शिकवण दिन्ही. कवायतना नी सैनिकी संचलनना हुकुम हिंदी भाषामा करी ल्या आस माणिकरावस्ले महाराजस्नी सांग. तसच गयरा परिश्रम करीसन इंग्रजीमा ज्या हुकुम व्हतात तेस्ले हिंदीमा सारखा शबद तेस्नी तयार कयात. हिंदी हुकमस्मा कितला जोरकसपणा ह्रास आस महाराजस्ले नी इंग्रज लष्करी अधिकारीस्ले आप्ला पहाडी आवाजमा सैनिकस्न संचलन करीसन माणिकरावस्नी दाखाडी दिन्ह. स्वातंत्र मियावर त्याच हिंदी हुकुम हिंदुस्थानना लष्कर मजार रुढ झायात.

               महाराज आमेरीकाले ग्यात तव्हय, न्यूयॉर्कमा महाराजस्ले आमेरीकाना लष्करकडथाईन सन्मान म्हनीसन मानवंदना दिन्ही. त्यायेले तेस्ना संगे त्या इभागना गव्हर्नर व्हतात. त्यायेन्ह्या यादना बारामा महाराज लिखतस,'पाश्चिमात्य राष्ट्राना त्या गयरमोठ मयदानवर गोरा फलटण कडथाईन मानवंदना लिन्ही असता मी गयरा भारायी गवु. त्या लष्करी अधिकारीस्ना हुकुम आयकुउन्हात तव्हय माल्हे माणिकरावस्ना पहाडी आवीजनी याद उन्ही. गोरी फलटण दकीसन मन्हा डोयास्ना सामने हिंदुस्थानना भावी जवानस्न्या फलटणी दिसाले लागण्यात. आणि आसबी वाटन की, आप्ल राष्ट्र बलवान व्हवा करता तरणा जुवानस्नी बलोपासना कराले जोयजे. 

               आप्ला राज्यामा माणिकराव हाऊ एक शुर वीररत्न शे येन्हा बारामा महाराजस्ले  मनमनमा आभिमान वाटे. त्या सोता मजार मजारमा जुम्मादादा व्यायामशायले भेट करेत. आडनड नी चवकसी करीसन मदत करेत. तसच व्यायाम ना काही परकार तेस्नी माणिकराव येस्ना कडथाइन शिकी लिन्हात. जंबियानी कुस्ती नी फिरंग हायी कठीण इद्या त्या तठेच. शिकणात. माणिकराव ह्या महाराजस्ना जिवलग मयतर व्हतात. तेस्ना मार्फत स्वातंत्र क्रातिकारकास्ना संगे महाराजस्ना संबंध व्हतात. 

            एक दिन रामपायटामा माणिकराव टांगावर राजमहाल ना रस्ताकडे लालबागना नजीक जायी ह्रायंन्तात तव्हय सामनेथाइन महाराज फिरीसन पाये चालत येतांना दिसनात. टांगाना खाले उतरीसन तेस्नी महाराजस्ले मुजरा कया तव्हय महाराज बोलणात, "माणिकराव काही खास काम नही व्हवाव ते चला संगे, आपीन बोलत जाऊत, पॅलेस मजार जाव्हा वर तेस्न बोलण चालु व्हत तव्हय एक आमेरिकन माणुस भेटाले उन्हा. बोलान ओघमजार तो आमेरीकन माणुस्नी इचार, आप्ला राज्यकारभारले मियणार यश न कोणत कारण शे? माणिकरावस्ना कडे बोट करीसन बोलणात, " आसा निष्ठा वान आणि कर्तबगार लोक मन्हा काम मा मदत करतस. आसा कर्तबगार माणस मन्हा राज्यामा शेत, हायीच आम्हणी खरी ताकद शे. तेस्ना हातमा आम्न यश शे. आम्हना कार्यकुशल आधिकारी माणिकरावस्ना क्रिडांगणवरच तयार व्हयेल शेत. आम्हना माणिकराव म्हणजे तयपती तलवार शे. 

          महाराज उतरता वयमा पाये पाये फिराना व्यायाम करेत. दिवमा दोन तास पाये पाये फिराले जाव्हा शिवाय तेस्न मन लागे नही. महाबळेश्वर, उटी, नहीते परदेशना रम्यस्थयवर कोठे बी ह्रायन्हात नहीते बोटवर ह्राहेत, तरी बी आप्ला चालाना व्यायाम नित्यनेमनी चालु ठेत. पाये पाये फिराणा व्यायामले त्या धर्म म्हणेत. नादारी नंतर सत्ता नी संपत्ती गयरा धाकल वयमा मियन तरी आखीरलगुन निर्व्यसनी राहिन्हात हायी खास गोट शे. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार* *भाग ४५*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*

*भाग ४५*

              जुम्मादादा ह्या व्यायामक्षेत्रमजारला महान आदरणीय गृहस्थ बडोदान भुषण व्हतात. दादा बम्ह्रचारी व्हतात. बडोदा मजार तेस्नी गयय्रा व्यायाम शाळा काढ्यात बडोदामजारला पहिलवान मंडयीले शिस्त नी आदर्श परंपरा तेस्नी पयदा करी. दादास्नी पहिलवानस्ले प्रतिष्ठा नी मानपान प्राप्त करी दिन्हा. त्यायेले लोकस्ना आसा गैरसमज व्हता की, आकाडामा जायीसन व्यायाम नी कुस्ती करणारा लोक उडाणटप्पू ह्रातस हाऊ गैरसमज दुर करीसन शिखेलसवरेलस्ना विचारस्मा क्रांती करीसन तालमीन रुपांतर व्यायामशायना स्वरुपमा कराण कठीण काम रावसाहेब दिघे नी माणिकरावस्ना साहाय्यानी. महाराजस्नी कये. तेस्नी मदतमुये व्यायामले सांघिक स्वरुप दिसन तेन्हा शायना आभ्यासक्रम मजार समावेश करी लिन्हा. शायस्ले जोडीसन आखाडा तयार करीसन पोरस्नाकरता कुस्ती नी कसरतना शिक्षक म्हनीसन जुनाजमानाना नामचीन पहिलवानस्नी नेमणूक कयी. नी तेस्नावर देखरेख करा करता बळवंतराव निंबाळकर येस्नी निरीक्षक म्हनीसन नेमणूक कयी माध्यमिक शायास्मायीन कुस्ती, मल्लखांब, लांब उडी, उच्ची उडी, कवायत आखो बाकीना खेय शिकाडेत. काॅलेज मजार देशी विदेशी ख़ेयस्ना सामना नित्यनेम चालु ह्राहेत. तसच शायास्मायीन बालवीर सिक्सननी सोय करीसन घोडावर बसण, आग मल्हावण, पाणीमा झेपन, संकटमापडेल लोकस्ले मदत करण आखो बाकीना हिकमतना खेय शिकाडीसन तेस्नामा अष्टपैलूपणा आणेत. भानुप्रसाद दवे ह्या बालवीर सिक्सन ना कमिशनर म्हनीसन काम दखेत आबासाहेब मुजुमदार येस्नी भलता नामी असा व्यायामकोश तयार कया. व्यायाम ज्ञानकोशना दहा खंड शेत, नी तेन्हामा देशी विदेशी खेय नी खेळाडू येस्ना चितरंगस्नासंगे फायदानी माहिती देल शे. तेन्हामुये व्यायामक्षेत्रमजारली मोठी कमतरता भरी निंघनी फॅशनमुये नहिते गुलामीवृत्तीमुये परकास्ना खेयस्नाकडे आकर्षित नही व्हता, आप्ला चांगला व्यायामस्ना प्रकार टिकाडानी शिकवण तरणा जुनानस्वले माणिकरावस्नी दिन्ही. १९ २४ साल ले पॅरीसमा ऑलिंपिकनाकरता ज्या खेळाडू जायेल व्हतात, तेस्नामा बडोदाना खेळाडूस्नी आपल्या काठी नी लेक्षिमन्या सांघिक कौशल्यामुये नी कसरतीस्नी सर्वांस्नी ध्यान आप्लाकडे लायी देल व्हती. त्या खेळाडुस्ले जगदुन्याना वृत्तपत्रास्मा गयरी प्रसिद्धी मियनी व्हती. व्यायामक्षेत्रमजारली महान कामगिरीना बारामा माणिकरावस्ले महाराजस्नी राजरत्न हाऊ बहु मानपान ना किताब बहाल कया व्हता.

              जुम्मादादास्न बालपण गयर मोठ रहस्यमय व्हत. तेस्ना जनम जामनगर मजार एक मुसलमान परिवारमा व्हयेल व्हता. जुम्मा पाच वरिस्ना व्हता तव्हय "सुबरात" सण ना दिन तेस्ना जेठा भाऊ फिरोज येस्नासंगे फिराले गयता. सुद नही राहयन्ही, नी त्या दूर भरकटी ग्यात. पेंढारी लोकस्नी तेस्ना आंगवरना डाग (दागिना) दखीसन दोन्हीस्ले भूल दिसन झुयीमा टाकीसन हुटवर बसाडीसन जंगलमा लयीग्यात. तेस्ना आंगवरना डाग काढी लिन्हात तेस्नी जुम्माले त्या दाट जंगलमा सोडी दिन्ह नी फिरोजले तेस्ना संगे लयी ग्यात. जुम्मा रडीरडी आदमला व्हयी ग्या नी झाड खाले जपी ग्या. योगायोगमा बडोदाना बहादुरखाॅं जमादार जोडुदारस्नासंगे चित्ता पकडाले जंगल मजार भवडी ह्रायन्तांत. तेस्ले ते पोरग सापडन. बहादुरखाॅं आनंदराव महाराजस्नी मातोश्री राजमाता येस्ना कडे त्या पोय्रा ले लयी उन्हात, नी बठ्ठा हाकीगत सांगी. राजमातानी त्या पोय्रा ले आप्लाकडे ठीलिन्ह,तेस्नी त्या पेय्रानी बठ्ठी येवस्था बकुळाबाई पिसाळ येस्ना कडे सोपी दिन्ही. तेन्हा काही ठावठिकाणा नही, तालतपास नही, तो जंगलमजार सापडामुये तेन्ह नाव जंगलीराम आस ठेव. तेन्ही कुस्ती, मल्लखांब, झेपन नी घोडावर बसण येन्हा मजार प्रावीण्य मिळाव. तेल्हे लिखता वाचता येव्हाले लागा गये. काही आरत्या, तुकाराम महाराजस्ना आभंग, नी मन ना श्र्लोक तेन्हा तोंडेपाठ झाया. तो मारुती नी उपासना करे नी मारुतीना परमभक्त झायामुये आजन्म ब्रम्हचारी राव्हानी तेन्ही शपथ लिन्ही. व्यायामना परसार करता तेन्ही सोताले झोकी दिन्ह. तेन्हा जेठा भाऊ तेन्हा तालतपास करत बडोदाले उना. आखाडामजारच तेस्नी व्हयख व्हयनी मायले भेटाकरता तो जामनगरले गया. तेन्ही भेटी व्हवामुये मायले गयरा आनंद झाया, नी हार्षवायुना झटका मजार अल्लाले प्यारी व्हयी गयी. त्या नामी हाडवयीद व्हतात. त्या आखाडामाज ह्राहेत पहिलवानस्ले डावपेच शिकाडेत. तेन्हासंगे स्वच्छता, नम्रता, शिस्त नी सेवाभावी निती तेस्नी पयदा करी. माणिकराव ह्या तेस्ना आदर्श चेला व्हतात.

           १८५७ ना स्वातंत्र्ययुद्धाना येले जुम्मादादा ६२ वरिस्ना व्हतात. त्या स्वातंत्र्ययुद्धाना नेतास्ना संगे तेस्ना संबंध व्हतात. त्या नेता वेषांतर करीसन फकिरस्ना नहिते अवलियास्ना रुपलिसन बडोदाले यीसन ह्राहेत. तेस्ना मुक्काम जुम्मादादास्नी व्यायामशायमा ह्राहे. तेस्नी जेवण नी व्यवस्था माणिकराव करेत. ह्या अवलियास्न्या भेटीसमुये पैसा कमी पडे नही. उतारवयमजार आप्ला भार दुसरावर नको म्हनीसन त्या तोफखाना नी रखवाली करेत. महाराजस्नी. तेस्ले मानधन लेवानी सुचना कयी, पण दादा बोलणात, "काम कयाशिवाय पयसा लेनार नही," महाराजस्ना नाईलाज झाया मोठ्ठल्ला मोठ्ठल्ला नामचीन पहिलवानस्लेबी धरडपने कष्टाना दिन येतस, म्हनीसन तेस्ना करता काही योजना करीसन व्यायाम परसारन काम तेस्ना उतारवयमा देव्हो आशी महाराजस्नी कल्पना व्हती. तेन्हा बारामा चर्चा करा करता म्हनीसन जुम्मादादास्ले महाराजस्नी तेस्ना पॅलेसला बलाव्ह. दादा येव्हावर तेस्नासंगे महाराजस्नी महत्वानी बोलणी झायी. गप्पा चालू व्हत्यात, नी हुजय्रानी चांदीना ग्लासमा मसालान दुध पेवाकरता आणीसन दिन दादा जाव्हाले निंघताच महाराजस्नी तेस्ना हातमा च्यारशे रुप्यानी भरेल मलमलनी पिसडी तेस्ना हातमा दिन्ही. दादा मुजरा करीसन निंघनात, वापस जातांना हुजरा भेटनात, दादास्नी पिसडीमा हात घाला, नी जितला नाणा हातमा उनात तितला तेस्ले दिनात. आस वाटत वाटत आखिरशेवट बाहेरना फाटकलगुन उन्हात, नी ती उरेल पिसडी शिपाईस्ना हातमा दिसन फकिरबाबा सारखा बाहेर निंघी ग्यात. राजरत्न माणिकराव दादास्नी कडक शिस्तीमा तयार व्हयेल व्हतात. माणिकरावस्नी प्रमुख आखाडाले'जुम्मादादा व्यायाम मंदीर' आस नाव दिन्ह. आशी गाढ निस्मिम श्रद्धा दादास्ना बारामा माणिकरावस्ले व्हती. माणिकरावस्ले सहज एकसावा एकजण नी इचार, "दादा मुसलमान शेत, तरी बी तुम्हणी तेस्नावर इतली श्रद्धा काबर.?," कव्हय माणिकराव बोलणात, "गुरु शिष्यन नात जातपातनापेक्षा उच्च शे. दादा गयरा उच्च कोटीना पुजनीय व्यक्ती शेत.

*क्रमशः*

      (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम _आरोग्य _अश्वारोहण_शिकार* *भाग - ४४*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम _आरोग्य _अश्वारोहण_शिकार*

*भाग - ४४*

                 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधन' हायी तत्त्व महाराजस्नी सोता आचरण मजार आणेल व्हत. सत्ता, संपत्ती, नी जवानी ह्या तीन्हीबी गोष्टी तेस्नी संयम मा नी समर्थपणाथाईन सांभाळ्यात. येन्ह कारण म्हणजे तेस्नावर व्हयेल चांगला संस्कार हायीच शे. नहीते तेन्हामजारला एकबी गोटना उन्माद सत्यानास कराले कारणीभूत व्हवु शकस सत्ता नी संपत्ती तेस्ले फक्त तेस्ना भागतुन मियेल व्हती निरक शरीर ना वारसा तेस्ले माय बापस्नाकडथाईन मियेल व्हता. पण बलदंड शरीर तेस्नी खेय नी नित्यनेम करेल व्यायाममुये मियेल व्हत.

            राज्याभिषेक व्हवावर तेस्ना बौध्दिक नी शारीरिक सिक्सननी सुरुवात व्हयेल व्हती. मि. इलियट ह्या तेस्ले महान शिक्षक लाभनात, नी त्याज महाराजस्ना यशस्वी जीवन ना खरा शिल्पकार शेत. महाराणी जमनाबाईसाहेबना सारख्या करारी माता लाभेलमुये महाराजस्ना जीवनले नियमितपणा नी शिस्त लागणी. धाकलपनपासुन तेस्ना दिनक्रम आखेल ह्राहे. रामपायटामा साडेपाचले त्या उठेत, आंगधुयीसन दंड, बैठका, कुस्ती, नहीतेमंग मल्लखांब आसा व्यायाम करीसन घोडावर बशीसन रपेट मारेत. वापस येव्हावर. न्यारी करीसन एकतास वाचन करेत न्यारीमा दुध भाकर, बिस्किट नी फय येस्ना समावेश ह्राहे.

               सोताना शरीरनी त्या गयरी कायजी लेत. पयलापासुन हुजय्रासकडथताइन त्या मालिश करी लेत. बदामन तेल मालीश करता वापरेत. तेन्हामुये शरीरनी कांती जास्ती तेज व्हस, चामडी नरम ह्रास आशी तेस्नी भावना व्हती. लष्करीखान बलुच येस्ले युरोपमा लयीग्यात नी ह्या इषयन शिक्षण दिसन तरबेज करी आण नी तेस्ना कडथाईन त्या मालीश करी लेत.

                कुस्तीनी तेस्ले धाकलपणफाईन आवड व्हती. कवळाणाले व्हतात तव्हय चिंधा, सक्य्रा, धनजी, नी खंडू ह्या मयतरस्ना संगे नदीमजार वाळुमा कुस्ती खेयेत. आंगेपांगेना खेडास्मा जत्रा ह्रायन्ही म्हणजे त्या तेस्ना मयतरस्नासंगे तठे जायेत नी खाऊनी पुडी, नहीते मंग नारयवर कुस्त्या जिकेत. बडोदाले येव्हावर तेस्ले नामचीन पहिलवान कुस्तीना सराव करता लाभनात. तेस्नी महाराजास्नी कुस्ती, मल्लखांब, आखो बाकीना खेयस्नी नामी तयारी करी लिन्ही. दसरा सण ना निमित्तखाल सरकारी कुस्तीनी दंगल व्हये. त्यायेले कोल्हापूर, सातारा, मालेगाव नी नाशिकना पहिलवान बडोदाले कुस्त्या खेवानीकरता येत. पंजाब मी उत्तर प्रदेशनाबी नामचीन पहिलवान येत. महाराज बक्षिस दिसन तेस्ले उत्तेजित करेत.

                   'पहिलवान लोक नी तेस्न्या कुस्तीना नियम' ह्या नावन पुस्तक महाराजस्नी छापी काढेल व्हत. पयले चुरसमुये रगेल नी खुनशी पहिलवान आप्ला प्रतिस्पर्धाना पहिलवान ना शरीरले कायमनी दुखापत व्हयीन आसा न्यारा न्यारा डावपेच खेयेत. तेन्हामुये बदलानी भावना तयारहुयीसन दंगली व्हयेत. तसा परकारना पेच ह्या नियमस्नामुये कमी करी टाकात ह्या कमी करेल पेच म्हणजे गळखोडा बांधाना, पाय जागावर चढावाणा, दोन पायस्नी सवारी बांधानी, हात पाठवर चढावाणा, कसोटा माराणा, मोतीचूर कराण आणि नमाजबंद. करण ह्या व्हतात. तसच नाकवर पुठ्ठी मारण, चावाण, बालस्न्या झितय्रा धरण, गालफड फाडाण, पाय मुरगाडान, बरगडीस्वर ढोपरवरी. मारण ह्या अश्या नेस्त्या करान्या नहीत आसा नियम करीसन कुस्तीना प्रकारमजारला क्रूरपणा नी रानटीपना काढी टाका. खंडेराव महाराजस्ना कायमा बडोदाले हत्तीस्नी साठमारी, बेलस्न्या नी हेलास्न्या टक्करी ह्या गोष्टी लोकप्रिय व्हत्यात. तसच जांबियानी कुस्ती, बिन्नोट, वज्रमुष्टी, ह्याबी, खेय गयरा लोकप्रिय व्हतात नजरबागना शेजारना अग्गडामा ह्या खेय सदा व्हयेत तेन्हापयकी बराज क्रुर खेय महाराजस्नी धीरेधीरे बंद कयात. व्हाईसरॉय लाॅर्ड, हार्डीज येस्नी एकसावा बडोदाले भेट दिन्ही. तेस्नी मुक्काम करा, नी वज्रमुष्टीनी झुंज दखानी आमना व्यक्त कयी. नायलाज म्हनीसन महाराजस्नी आप्ला कारभारीले. हाऊ खेय सादर कराणी सुचना कयी.

              खेय दखाले अग्गड प्रेक्षकस्नी बोंबाबोंब भरेल व्हत. महाराज नी व्हाईसरॉय शामियानामजार उच्च आसनवर यी बसनात. जट्टेजमाल आखाडा ना पहिलवान हरका जेठी नी गुलुमिया आखाडाना पहिलवान गजराय येस्नी टक्कर दखाकरता लोक तेलमा पडेल व्हतात. त्या दोन्ही मुष्ठियोद्धा हलगीना ठेकावर अग्गडमजार प्रवेश करीसन महाराजस्ले मुजरा करा करता उनात. उच्चापुरा, धिप्पाड, देखणा जुवान न ते पियदार शरीर! तेस्नी केशरी रंग ना जांग्या घालेल व्हता. हातमा वज्रमूठ घालीसन मुठी वयेल व्हत्यात.. त्या विरोचित आवेशमा यीसन येरमेरले ललकारी ह्रायन्हांत. योध्दास्नी महाराजस्ले मुजरा कया. तव्हय लगेच तेस्नी उच्चा हात करीसन पंचस्ले वज्रमुष्टीयुध्द चालु कराना इसारा कया.

               सलामी व्हताच त्या येरमेरले आव्हान करीसन वज्रमुष्टीयुध्दनी सुरवात झायी आक्रमण, प्रतिकार आसा डावपेच चालु झायात. एकदोन मिनिटमजारच गजरायानी हरका जेठीले रंगतबंभाय करी टाक. त्या येरमेरवर कचाकच वार कराले लागी ग्यात. वज्रमुष्टीना नखस्नामुये दणका बसताज रंगत न्या चिरकांड्या उडाले लागी ग्यात. मिय्या डोयास्ना गोरा साहेब हाऊ खेय स्वास धरीसन दखी ह्रायंन्ता. दोन्ही योध्दास्न आंग सोलायी गये. दोन्हीबी रंगतना वल्लाचिंब व्हयी ग्यात. हरका जेठीनी महाराजस्ना कडे वयीसन दख. तेस्नी झुंज थांबाडा करता इसारा करताच. तो महाराजस्ना मव्हरे यीसन मुजरा करीसन विजयना उन्माद करत उड्या मारत गया. हायी झुंज व्हवावर महाराजस्नी हाऊ क्रुर खेय कायमना बंद करी टाका.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शनिवार, १० एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास* *भाग - ४३*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास*

*भाग - ४३*

              सभ्यपणा आणि हिंमत आंगे आणाना प्रयत्न करा. निडरपने सत्कर्म करत ह्राव्हा. ह्याच गुणस्ना मदतम्हायीन समाधानकारक राज्य चालाव्हा करता तुम्ही समर्थ व्हश्यात. मी तुम्ले आठे आणि ऑक्सफर्डमा शक्यव्हयीन तितल सिक्सन प्राप्त करी देल शे. उच्च प्रतीन सिक्सन नी पोक्त इचार या गुणस्मुये नामी राजकर्ता का व्हता येणार नही? तुम्ही सदा परवान ना इचार तेस्न्या अपेक्षा हायी बठ्ठ आप्ला मनमजार साठी ठेवावे जोयजे. हिंदुस्थानना किर्तीवान व्यक्तीस्मा तुम्हणी गिनती व्हवाले जोयजे. तुम्ही युवराज्ञीना बुद्दीना नी तडफना नामी उपयोग करी लेव्हाले जोयजे. आस जर झाय ते तुम्हणा कितला तरी महत्त्वाना कार्यामा ती तुम्हणी सहकारी होवु शकीन. युवराज,एक खास गोट ध्यानमा ठेवाले पाहिजे की, आपीन दुसरान्या आडचनीस्नाकडे ध्यान देवाले जोयजे. तसच बठ्ठास्नासंगे पिरमथाईन वागाले जोयजे. राजकुमार, तुम्ही आपली परवान नी सिक्सन देवानी दिशा जसजशी वाढावश्यात तसतशी तुम्हणा ठिकाण नी जिम्मेदारी कमी व्हत जायीन. इतलज नही ते तुमन्हा सुधारणानाबारामा परवान ना इरोध व्हवाना संभव जास्ती ह्राहणार नही.

          "संसारना बारामा कर्तव्य समाजाडीसन सांगतांना माल्हे तुम्हले इतलज सांगान जरुर वाटस की, तुम्ही संसार सुखमा सर्वस्वी मगम ह्राव्हान नही. मित्रस्ना नी नातेवाईकस्मा हासळतखिदळत तुम्हणी ये खर्च करीसन चालाव नही, तुम्हणा प्रपंच बठ्ठा काम आवरीसन बाकीनी ये परवान (प्रजा) ना सुखदुःख करता खर्च कराले जोयजे. राजकुमार, ह्या बठ्ठ्या गोष्टीस्न तुम्ही चिंतन करश्यात नी आम्मल करानी कोशिश करश्यात आसा इश्वास करस. असो माफ करा मयतरस्वन, मन्ह भासन जास्ती लांबी गये. आपीन जेवण करता उत्सुक शेत, आप्ले बठ्ठास्ले शुभेच्छा दिसन आप्ली रजा लेस.

             मव्हरे बराच वरीस्मा राजपुत्र युवराज प्रतापसिंह येस्ले महाराजस्नी राजकोटना प्रिन्स काॅलेजम्हायीन काढीसन पुणाले फग्र्युसन काॅलेजमा नाव लिख. तेन्हा नंतर तेस्ले उपदेश करीसन महाराजस्नी पत्र लिख. त्या पत्रामा महाराज म्हणतस, "युवराज, आप्ले प्रिन्स काॅलेजम्हायीन काढीसन सामान्य इद्यार्थीस्ना काॅलेजमा नाव टाक येन्ह कदाचित तुम्ले वाईट वाटन हुयीन. पण तेन्हा मांगे मन्हा गयरा न्यारा आणि चांगला हेतु शे. येन्हा पयले मी तुम्हणा वडील कै. युवराज फत्तेसिंहराव आणि तेस्ना भाऊ येस्ले इंग्लंड, आमेरिकान्या नामचीन इद्यापीठस्मा धाडेल व्हत कारण माल्हे सोताले जव्हय पाहिजे तव्हय सिक्सन मियन नही,तस तेस्ना बारामा घडाले नको हायी मन्ही आमना व्हती. पण त्या कव्व्या वयम्हाज परिवारफायीन गयरा दुर राव्हामुये, नही ते संगतगुण मुये अपेक्षा सारखा नामी परिणाम व्हयना नही. तीच गोट आप्ला बारामा होवु नये आस माल्हे मनफायीन वाटस. माल्हे आस बी वाटस की, पुणानी काॅलेजमजार तुम्ले सिक्सन ते नामी मियीनच, तेन्हा संगे तुम्ले सामान्य परिवारना पोरस्ना संगे मियीमिसळीसन  ह्राहता यीन. नी त्यामुये तेस्न्या आडचनी, सुखदुःख येस्नी व्हयख व्हयीन. तेन्हा मव्हरे तुम्ले राज्यकारभार चालावाले नामी उपयोग व्हयीन. दुसर आस की, त्या काॅलेजले लो. टिळक, आगरकर, व ना गोखले येस्नी थोर परंपरा लाभेल शे. तेन्हासंगे महाराष्ट्रीय संस्कृतीन हायी केंद्र शे, म्हनीसन तुम्हणा टवर पुणेरी संस्कार व्हवाले जोयजेत आस माल्हे वाटस. मन्हा सद्हेतु आपीन समजी लिश्यात नी आम्हनी आमनापरमाने बठ्ठागुणस्नी प्रगती करी दाखाडश्यात आशी आस धरस."

               *महाराजस्नी कडक शिस्त नी हिसाबीपणामुये राजपरिवारमजारला बराज व्यक्ती नाराज ह्राहेत*. *तेन्ह एक उदाहरण - राजपरिवारमजारला हर व्यक्तीले वरला खर्चाकरता ठरावीक रक्कम इतमामापरमाणे खानगीम्हायीन मिये. धाकला राजपुत्र धैर्यशीलराव ह्या महाजस्ना जास्ती लाडकोडना व्हतात. तेस्ले ठरायेल रक्कम कमी पडे, म्हनीसन महाराजस्ले भेटीसन तेस्नी आप्ली नड सांगी. महाराजस्नी तेस्ले समाजाडीसन सांग, "खर्चामा आपीन कंजुसी कराले जोयजे. हायी सवय धाकलपणफायीन लायी लेव्हाले जोयजे. हायी सवय मी धाकलपने लायी लेल व्हती* 'तेन्हावर धैर्यशीलराव बोलणात," *महाराज, मी राजपत्र शे*. *माल्हे तसाच रुबाबमा वागण पडस*. *तुम्हणी गोट न्यारी व्हती. तुम्ही धाकलपने राजपुत्र नही विहतात.' आस बोलण आयकीसन महाराज व्यथित हुयीसन बोलणात," राजकुमार, परवानना पैसा आप्ली मौजमस्ती करता खर्च करण चुकीन शे, हायी तुम्ले समजाले पाहिजे. महाराज शांत व्हयन्हात, नी सोतालेच बोलणात," मन्ह आंतरमन कोणी समजी लेत नही, हायी मन्ही खरी खत शे* "

          *वरला आनुभव येलवर महाराजस्नी खबरदारी म्हनीसन राजाना पैसा नी राज्याना म्हणजे परवान (प्रजा) ना पैसा असा स्पष्ट उल्लेख व्हणारा कायदा कया. तेन्हामा तेस्ना हेतु आसा व्हता की, त्या कायदामुये आपलानंतर राज्यावर येणारा राजाले सोतानी मौजमज्या करता राज्याना  (परवान) पैसा खर्च करता येणार नही. ह्या तरदुतमुये भारतले स्वतंत्र मियावर संस्थान विलीकरन करावर बडोदा सरकारनी गयरी मोठी संपत्ती नी गंगाजयी भारत सरकारले मियनी. बाकीना संस्थान मजार आसा कायदा नही राव्हामुये राजाना नी राज्याना पैसा राजाना मालकीना आसामुये विलीकरन व्हवावर भारत सरकारले लेता उनी नही. दुर्दैव आस की वैफल्यग्रस्त राजालोकस्नी बठ्ठा पैसा सोतानी मौजमस्ती मजार उडावात. म्हणीसन इतिहासकार म्हणतस की, सयाजीरावस्ना सारखा देशभक्त द्रष्टा राजा फक्त श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाडच!* 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

            सुरेश पाटील ९००४९३२६२६

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास* *भाग -४१*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास*

*भाग -४१*

                परिवारनी दृष्टीखाल महाराजस्ना काय शांततामा जायी ह्रायंन्ता. पोरबी मोठ्ठला हुयी ह्रायंन्तात. तेस्ना आभ्यासपाणीले सुरवात व्हयेल व्हती. पोरस्वर महाराणीस्नी देखरेख ह्राहे. त्या सोता तेस्ना कपडा, आभ्यास, जेवण, खेळ आखो काही गोष्टीसवर बारीकसारीक ध्यान ठेत. महाराज सोता आठवडामा दोन सावा राजपुत्रस्नी शायमा जायेत, नी तेस्ना आभ्यास तपासेत तेस्ना व्यायाम, खेळ नी आखो बाकीन्या गोष्टीस्ना करता सुधारणा सुचाडेत. मि. फ्रेंच, सरदेसाई, नी साळुंखे ह्या तीनजण राजपुत्रस्ना सर्वगुण विकासना बारामा जिम्मेदार व्हतात. कव्हय मव्हय महाराज पोरस्ना संगे आट्यापाट्या नी क्रिकेट खेयेत .

राजपुत्रस्नी सिक्सननी जिम्मेदारी मि. फ्रेंच येस्ना कडे व्हती. येययेले सिक्सनना बारामा महाराज तेस्ले सुचना करेत. इद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वातावरण ह्या नामीना सिक्सन ना च्यार घटक शेत, आस महाराज सोता मानेत. मि फ्रेंच येस्ले लिखेल पत्रामा त्या म्हणतस, "पोरस्न आरोग्यना बारामा तुम्ही चांगली कायजी करा. राजपुत्रस्नी सिक्सनले महत्व नही देणारी काही लोकस्नी इचारसरणी माल्हे आवडत नही. मन्हा आंडरोस्ले सर्वसामान्य सिक्सना शिवाय कोणतबी उपयोग मजार येणार व्यवसायन बी सिक्सन मियाले जोयजे. आशी मन्ही खास आमना शे. आस मी मुद्दाम लिखाण कारण आस शे की, सध्या जे सिक्सन मियस ते पाहिजे तस उपयोगन नही. बदलता काय मजार कोणतीबी परिस्थितीले तोंड देवाले ते समर्थ जोयजे. हल्ली संक्रमणना काय मजार मोठस्ना पोरबी बाकीना वर्गाना पोरस्नासारखा शिखेलसवरेल व्हवाले जोयजेत. पोरस्न माणसिक सिक्सनले मी जास्त महत्व देस. येन्ही जिम्मेदारी तुम्हाणावर असामुये मन्हा इचार तुम्हले मोक्या मनथाईन कळायी राहिनु. आप्ला संगे मांगे सध्या स्वार्थी नी कपटी लोकस्ना भरणा असामुये राजपुत्रस्ना मनवर कसा प्रकारनी छाप पडस, ह्या बारामा आपीन सावध राव्हाले जोयजे. पोरस्ले वाईट संगत ते लागेल नही? येन्ही खबरदारी पालकस्ना संगे शिक्षकस्नी बी लेव्हाले जोयजे. कारण पालकस्ना पेक्षा शिक्षक पोरस्ना नजीक ह्रास. आश्या गोष्टी तेस्न्या जल्दी ध्यानमा येतीस. "

               युवराज फत्तेसिंहराव येस्ले महाराजस्नी सिक्सन करता इंग्लंडले धाड. तठे ऑक्सफर्ड इद्यापीठमा तेस्ले दाखल कय. तठे आभ्यास नी खेय येस्नामा चांगली प्रगती कयी. पण ठरेल आभ्यासक्रम पुरानकरताच त्या बडोदाले वापस उन्हात. तव्हय महाराजस्ले गयर वाईट वाटन. दुसरा राजपुत्र जयसिंहराव येस्ले पयले हॅरो मजारली हायस्कूल मजार नाव टाक. तेन्हा नंतर तेस्ले आमेरीका मजार हाॅवर्ड इद्यापीठ मजार धाड. तेस्नी आमेरीका सारखा लोकसत्ताक देश मजार राहिसन शिकाले पाहिजे आशी महाराजस्नी आमना व्हती. पण तेस्नी तब्बेत नाजूक व्हती म्हनीसन तेस्नाकडथाईन पाहिजे तसा आभ्यास झाया नही. पण तरीबी त्या इद्यापीठ मजार बी ए नी परीक्षा पास व्हयन्हात. महाराजस्ना तिसरा राजपुत्र शिवाजीराव येस्नी तब्येत मस्त व्हती. माणिकराव येस्ना आखाडा मजार त्या नित्तेनेम जायेत. तेस्ले इंग्लंड मजार एक खाजगी शाय मजार टाकेल व्हत. पण त्याबी काही दिवमजार सिक्सन सोडीसन बडोदाले वापस उनात. मंग नंतर त्या मुंबई इद्यापीठनी मॅट्रिक परिक्षा पास व्हयनात. मंग नंतर त्या पुणानी डेक्कन काॅलेज मजार शिकत असतांना तेस्नी क्रिकेट खेय मजार नाव कमाव ऑक्सफर्ड मजारबी त्या शिकेत तव्हय

क्रिकेट, टेनिस खेय मजार तेस्नी नाव गाजाड व्हत. बठ्ठा राजपुत्रस्ले खेयस्नी आवड व्हती.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास* *भाग - ४०*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*

*भाग - ४०*

                युरोप मजारल्या बाकीन्या वाईट गोष्टीस्नाबारामा अँडेल्सबर्गहुन नायब दिवाण आठल्ये येस्ले लिखेल पत्रामा महाराज लिखतस, "तुम्हणा समाज मिश्र स्वरूपना शे. त्यामुये तठे गयय्रा संशयास्पद वागणुकीन्या गणिका दिशी येतीस. बराज लोक तेस्ना सहवास मजार मौजमस्ती करत ह्रातस. त्या लोकस्ना हाऊ करमणूकनाज प्रकार शे, नी म्हनीसन तठला समाजकडे, लोकस्नी नैतिक वागणूगकडे सावधगिरीमाज दखन पडीन. "

                   युरोपन्या चालीरीती नी आपल्याकडन्या चालीरीतीना बारामा महाराज म्हणतस," पाश्चात्त्य सिक्सनमुये आपल्या जुन्या नी लोकप्रिय संस्कृतीमजारल्या बठ्ठा मौज नी आनंद सरत जायी ह्रायन्हा हायी गयरी मोठी खेद नी गोट शे. आपल्या राष्ट्रीन्या चालीरिती आपीन जपी ठेवाले जोयजेत. तसा प्रयत्न बी कराले जोयजे. तेस्ना मांगे एक इतिहास ह्रास. येन्हा आर्थ नक्कीच ह्या बानटपणान्या बारामा नहीत. हायी एकदम खुल्ल शे.

                  न्याय्रा न्याय्रा विद्यास्ना नी कलास्ना आभ्यास कराले परदेस मजार जाण जरुरीन शे. आस तेस्नी कलकत्ता मजार एक व्याख्यान मजार सांग व्हत. तसच आमदाबादले औद्योगिक प्रदर्शनन उद्घाटनना येले त्या बोलनात, "जर डबुकडान पानासारख आप्ले सडान नशीन तर आप्ली व्यापारीना उन्नीतान आडे येणारा परदेशगमनना जो निषेध शे, तो आपीन झिटकारी देवाले पाहिजे. भाटिया लोकस्ना सारखा जन्मतःच व्यापारी बुध्दीना लोक ह्या येडसर समज मुये परदेस मजार जातस नही. हायी गयरी खेद करानी गोट शे.

              परवासना बारामा महाराज लिखतस, "कवळाणानी गरीब संस्कृतीमा वाढेल बाया तर युरोपियन रितीरिवाज आणि एकंदर वातावरण दखीसन भांबारायी गयत्यात तेस्ले गयरा संकोच वाटे. युरोपियन बाया बी तेस्न्या नववारी पातय, कुकु, सोनाना डाग दागिना येस्ना कडे नवलकरी दखेत. युरोपन्या हर सफरमुये बडोदा राज्यामजारल्या आम्हना लोकस्न्या गैरसमजुती कमीकमी व्हयी ग्यात, नी आज ते परिस्थिती बठ्ठी बदली जायेल शे, "महाराजस्ना युरोप आमेरीका प्रवासमुये बडोदा राज्याना बराज दृष्टीनी फायदा झाया. पण तेस्ना सारखा सारखा युरोप जावामुये नी तठे गयरा दिन मुक्काम ठोकामुये बडोदा राज्यानी प्रगतीनी गती कमी व्हयनी व्हयीज. कारण प्रशासनमजारली सर्वास्मा मोठी व्यक्ती गैरहाजीर राहिनी की,तेन्हा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम व्हतसज तेन्ही जाणीव महाराजस्ले बी व्हतीच. तसा त्या सदानकदा खेद व्यक्त करेत. तेस्नी काही मौजमजा माराकरता परदेस वाय्रा नही कयात. येन्हा बारामा एकसावा त्या आप्ला नजीकना मयतरले बोलणात, "परदेस मजार एखादा सामान्य माणुस सारख माल्हे फिरता येस, आम्हन संस्थान दिल्लीना रस्तावर शे. त्यामुये कोन्ही खास स्वारी ह्रायन्ही का, गव्हर्नर, व्हाॅईसराॅय, नहिते राजराजवाडास्ना मुक्काम बडोदा मजार सदानकदा ह्रास नी तेस्ना तैयनातमुये संस्थान गयरा खर्च येस. मी परदेसले ह्रायन्हु म्हणजे हाऊ खर्च तेन्हतेन्हा टयस."सफरना बारामा हायी झायी आर्थिक नी व्यवहारीक बाजु, पण तेन्हाबारामा आप्ल खर आंतररंग तेस्नी कोल्हापूरना छत्रपती शाहू महाराजस्ले लिखेल पत्रामा उघड कर. तेस्नी लिख," आपीन जर युरोपना सफरले जर ग्यात ते युरोपखंडमजारला चित्तवेधक स्थळे नी संस्था दखानी संधी गमावू नका. आस्या संस्थास्न निरीक्षण कराशिवाय पाश्चात्य देशस्मा ज्या न्याय्रा न्याय्रा संस्कृती शेत, तेस्न तुलनात्मक ग्यान संपादन करता येणार नही,"

                  महाराजस्ना युरोपले जाव्हाना हेतू हाऊ तब्बेत सुधाराना व्हता. तेल्हे ज्ञानार्जन करानी जोड मियनी. पण ह्या प्रवास मजार परवानना कल्याणकरता आप्ला राज्यामा काय काय गोष्टी करता येतीन ह्या दृष्टीमा तिकडनी परिस्थितीना आभ्यास करान तेस्ना मव्हरली सफरना हेतु व्हता. प्राथमिक, नी सक्तीन फुकटन सिक्सन स्थानिक स्वराज्य संस्था, मोफत वाचनालय, आधुनिक सिक्सन ना परसार, देशी वाडयमना विकास, नगररचना, आश्या गयय्रा गोष्टी तेस्नी परदेसमा आभ्यासीसन आप्ला राज्यामा आण्यात. फायदा न्या गोष्टीस्न वर्णन, नी तेन्हावरथाईन सुचणारा इचार लिखी ठेवानी तेस्नी पध्दत व्हती. तसच परवास मजार तेस्ले ज्या इद्वान नी राजकारणी लोकस्ना संगे गाठभेट व्हयेत, तेस्ना संगे आवडता इषवर संभाषण करीसन माहिती मियायेत त्या माहिती ना बी त्या टाचन तयार करी ठेत. गयरा इंग्रज लोकस्ना संगे तेस्नी मैत्री व्हती. महाराणी व्हिक्टोरिया ते तेस्ले मानसपुत्र माने. १९०५ मजार करेल सफरी मातर भारत स्वातंत्र्याना चयवयीन सूत्रसंचालन करण, क्रातीकारस्न केंद्रस्थान पयदा करण, ह्या हेतुनी महाराजस्नी कय्रा व्हत्यात.

        केल्याने देशाटन, धर्मग्रंथ अवलोकने

पंडीत मैत्री, सभेत संचार

तया मनुजा, चातुर्य येतसे फार.

हायी सुभाषित महाराजस्ना करता खर लागु पडस...

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास* *भाग - ३९*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*

*भाग - ३९*

              लंडन मजार काही दिन राहिसन महाराणी नी संपतराव येस्लेसंगे लिसन महाराज आमेरीका जावाले निंघनात.तठली शैक्षणिक, औद्योगिक नी आखो बारीकसारीक परिस्थितीनी माहिती लिसन तिन्हा उपयोग आप्ला राज्याले कसा करतायीन आस दखुत अशी महाराजस्नी गयरी मनफायीन इच्छा व्हती. तेन्हाकरता त्या पेशाना जिम्मेदार आधिकारींस्नी वयख असण जरुरी व्हत. म्हणीसन लंडन मजारला आमेरीकाना वकील मि. व्हाईटलाॅ रीड येस्नी आमेरीकाना सेक्रेटरी ऑफ स्टेट येस्ले पत्र लिखीसन परिचय करी दिन्हा की, महाराज गायकवाड, नी तेस्नी महाराणी ह्या दोन्हीजन आमेरीका यीह्रायन्हात. महाराज ह्या गयरा चतुर राजा शेत, तेस्ले ब्रिटीशन राजकारण, नी तठल्या. संस्थास्नी चांगली माहिती शे. आमेरिकाले तेस्ना येव्हाना हेतु म्हणजे तठल्या शिक्षणसंस्थास्न निरिक्षण करीसन तठे आप्ला राज्याना इद्यार्थीस्ले धाडानी सोय कशी करता यीन हायी दखन शे. महाराणी ह्या बी शिकेल सवरेल शेत. आप्ली आभ्यासीवृतीना इचार करीसन महाराजस्नी आमेरितानी परिस्थितीन बारीकसारीक आवलोकन कय. हाॅवर्ड इद्यापीठले. भेट दिन्ही. तठे धर्मशास्त्रावर. एक व्याख्यान ठोक. प्रेसिडेंट रुझवेल्ट येस्नी महाराजस्ले मोठी मानपान नी मेजवानी दिन्ही राजकीय, सामाजिक नी शिक्षण क्षेत्रामजारला नामचीन लोक, नी संस्था येस्नी सत्कार समारंभ घडायी आणात.

                तिकडना शिक्षणक्षेत्रास्ना तज्ञ लोकस्ले बडोदा मजारल्या शिक्षणसंस्थाले भेट कराले धाड, तेस्नी देखरेख करीसन नामी सुचना मांगाड्यात. आणि आप्ला राज्यामजार औद्योगिक साधनसंपत्तीनी देखरेख करीसन तेन्हामा कोणता नया उद्योगधंदा चालु करता यीन या संबंधाना सल्ला देवाकरता एक तज्ञ माणुस्ले बडोदाले धाड,नी तेल्हे सांग की, 'बडोदे राज्य हायी मुख्यतः कृषिप्रधान शे म्हणीसन तठे कोणताबी उद्योगधंदा चालु करना व्हयीन ते तेस्ले गरज पडणाय्रा साधनास्नकरता तठली शेतीवरज आवलंंबी राहन पडाव शे, म्हनीसन बडोदाले येणारा तज्ञस्नी तठली शेतीना परिस्थितीना पुरा आभ्यास करेल जोयजे. आमेरीकातुन वापस येवावर आपल्या गयय्रा संस्थास्ना कामकाजस्मा सुधारणा करीसन महाराजस्नी काही नया उपक्रम चालू कयात.

                १९१०सालनी चीन, जपान सफरले महाराज निंघनात. रस्तावर कोलंबो, सिंगापुर मजारली परिस्थितीन आवलोकन करीसन कॅटनले रेशीम नी हस्तिदंती वस्तु येस्नी यापरी पेठ दखी. चीन मजार तेस्ना बराज जागावर सत्कार झाया. जपानले जाव्हा वर जपान सरकारनी महाराजस्ना दिमतले एक खास आगीनगाडी देल व्हती. इंडो - जपानीज संस्थास्ना तर्फे महाराजस्ले मानपान पत्र दिन्ह. तेन्हा मजार म्हणेल व्हत, "आप्ला राज्यामा सुज्ञ, नी प्रेमळ कारकिरदमा व्हयेल नैतिक नी भौतिक प्रगतीन आम्ही कवतीक करीसन आवलोकन करी ह्रायन्हुत तठे सार्वजनिक आरोग्य नी बांधकाम मजार व्हनारी प्रगती आणि प्राथमिक नी दुय्यम सिक्सन येस्ना जो उत्कर्ष हुयी ह्रायन्हा तेन्हामुये आप्ल बडोदा राज्य बाकीनास्ना करता आदर्श व्हयेल शे. आप्ला उदार, सहानुबुतीना नी कुशल राज्यव्यवस्थामुये. आपीन आम्हना आदरले नी पिरीमले पात्र शेत. "त्या सत्कारन उत्तर देतांना महाराज बोलणात," पाश्चात्य राष्ट्रस्नी ज्या नया सुधारणास्ना आवलंब करेल शे, तेस्ना स्वीकार आपीन कया नही ते आपीन मांगे पडसुत. तरीबी बठ्ठाज पाश्चात्य गोष्टीस्न अंधानुकरण करण, खरच येडापणान व्हयीन. तस न करता चांगल्या गोष्टीस्ना स्वीकार करण  हाऊ उन्नतीना रस्ता शे," आणि मंग नंतर जपानना धल्ला बादशाहनी महाराजस्नी भेट लिन्ही.

             पंचम जाॅर्ज येस्ना राज्यारोहण समारंभ करता महाराज वापस लंडनले ग्यात. ह्या समारंभाना निमितखाल व्हयेल कार्यक्रममजार तेस्नी हिंदी संस्थानिकस्न पुढारपण कये. थोडाज दिन मजार सर कृष्ण गोविंद गुप्ता ह्या बंगाली गृहस्थस्ले पहिलासावा भारतनामंत्रीना कौन्सिलन सभासद ना मान मियना. महाराजस्ना अध्यक्षखाल तेन्हा सत्कार कया. आप्ला भाषणना आखरी महाराज बोलणात, "माल्हे आशी आस शे की, सध्या जागे व्हयेल सदविवेक बुध्दीनी साहाय्यानी बठ्ठास्ना बाबत पिरीम नी सहकार्य पयदा हुयीसन मानवजातीना प्रश्न सोडावाले आप्ले मदत व्हयीन. जदलगुन बठ्ठ्या मानवजातीस्ना इषयी एकीनी भावना आप्ला मजार येणार नही, तदलगुन आप्ला दुराग्रहना नायनाट व्हनार नही. येन्हा करता जर आप्ला मजारला फरक ना करता येरमेरशी न झगडता आपीन समजु शकू, नी सहानुभूतीमा एकमत करीसन सहकार्य करू शकू, तव्हयच हाऊ प्रश्न सुटीन., "आशी पद्धतमुये महाराजस्ना इचार फक्त आप्ली परवान कल्याणपुरता मर्यादामा न राहता, त्या अखिल मानवजातीस्ना कल्याणना इचार कराले लागणात. नी जमीन तेवढा प्रयत्न बी कयात.

              परवासना फायदा सांगेत तव्हय धार्मिक नी सामाजिक गैरसमज कश्या दुर व्हतीस ह्या संबंधमा एक भाषणमजार. महाराज बोलणात, "ज्या हाॅटेलस्मा आम्ही उतरुत तठे आम्ले स्वतंत्र येवस्था करनी पडे, तेन्हामुये खर्च जास्त वाढे. मन्हा आधिकारीस्ना आज्ञानपण ना फायदा त्या लबाड हाटेल वाला लगेच लेत. बराज येल्हे हाटेल मालक आम्हनी येवस्था कराले नाखूष ह्राहेत . कारण आम्हना सयपाक ना वास ना युरोपीन लोकस्ले गयरा तरास व्हये. एक भोंदू हाटेल मालकनी गालीचावर डाग पडणात म्हनीसन नुकसान भरपाई करी व्हती.मव्हरे आम्ले माहित पडन की त्या हाटेल वालानी आम्हना नंतर आसाच दोन लोकस्ना कडथाईन नुकसान भरपाई करी व्हती. मव्हरे मव्हरे जसा आनुभव उन्हात तसा आम्ही शाणा बनी गउत. मव्हरल्या परतेक सफर मजार आम्हन्या गैरसमजुती दुर व्हत गयात. आज नी परिस्थिती आख्खी बदली जायेल शे. आज मराठा नी बामण, दक्षिणी नी गुजराथी, हिंदु नी मुसलमान ह्या बठ्ठा लोक सलोखा करीसन ह्राही ह्रायन्हात. युरोप मजार हल्ली कितली मोठी क्रांती व्हयी ह्रायन्ही तेन्हा कडे आपीन बी ध्यान द्या, नी मंग देशभक्त ह्या नातानी आप्ला समाजन्या चालीरितस्न नी तेस्ना आचारइचारस्न परिक्षण करा. पण जे तुम्हले निरुपयोगी नी हानिकारक वाटीन तेन्हा आप्ला देश करता नी समाजकरता जरूर त्याग करा, "....

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...