*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*
*भाग - ४६*
दादास्ना आदर्श सामने ठीसन माणिकरावबी जनमभर ब्रम्हचारी ह्राहिन्हात नी व्यायाम क्षेत्रामा मोलन कार्य करीसन उदंड किर्ती मिळायी. हाडवैद म्हनीसन माणिकराव येस्नी दादास्ना वारसा चालायीसन गयरा लोकस्ले दुखम्हायीन मुक्ती दिन्ही. त्याकायले लोकस्ना आसा गैरसमज व्हता की, आखाडामा जायीसन व्यायाम नी कुस्ती करणारा लोक दादागिरी करतस. हाऊ गैरसमज घालीसन शिखेलसवरेलस्ना इचारमा आखाडाना बारामा आप्ला पणा पयदा कया. तव्हयपासुन आखाडा एक सांस्कृतिक केंद्र बनी गये.
शायस्मायीन नी व्यायामशायस्मायीन फडास्वर शिस्त पायाना नियम लिखात. बोध लेवान्या म्हणी आणि नकाशा लावात. गणेशउत्सव नी छत्रपती शिवाजीमहाराजस्ना उत्सव सुरु कयात. हर गुरुवारले शायस्ना गिता वाचन, मन ना श्र्लोक, मारुती स्तोत्र नी व्यायामना बारामजारला सामुहिकरित्या म्हणाये. तेन्हा मजारल एक गाण मव्हरे देल शे.
राष्ट्रास रक्षणाला /व्यायाम मंत्र घ्यावा //
जरी शक्ती नाही देही /तरी काय कार्य होई? //
कर्तव्य कार्य करण्या /व्यायाम मंत्र घ्यावा//
शक्ती जरी शरीरी /मन होत कार्यकारी //
शक्तीस वृध्दी देण्या /व्यायाम मंत्र घ्यावा //
शांती मनास लाभे/देहास सौख्य लाभे//
कार्यास सक्त होण्या /व्यायाम मंत्र घ्यावा //
फॅशनमुये नहीते गुलामी वृत्तीमा परकियस्न्या खेयस्नाकडे आकर्षित नही व्हता आपीन नामी व्यायामपरकार टिकाळाकरता तरणा जुवानस्ले तेस्नी शिकवण दिन्ही. कवायतना नी सैनिकी संचलनना हुकुम हिंदी भाषामा करी ल्या आस माणिकरावस्ले महाराजस्नी सांग. तसच गयरा परिश्रम करीसन इंग्रजीमा ज्या हुकुम व्हतात तेस्ले हिंदीमा सारखा शबद तेस्नी तयार कयात. हिंदी हुकमस्मा कितला जोरकसपणा ह्रास आस महाराजस्ले नी इंग्रज लष्करी अधिकारीस्ले आप्ला पहाडी आवाजमा सैनिकस्न संचलन करीसन माणिकरावस्नी दाखाडी दिन्ह. स्वातंत्र मियावर त्याच हिंदी हुकुम हिंदुस्थानना लष्कर मजार रुढ झायात.
महाराज आमेरीकाले ग्यात तव्हय, न्यूयॉर्कमा महाराजस्ले आमेरीकाना लष्करकडथाईन सन्मान म्हनीसन मानवंदना दिन्ही. त्यायेले तेस्ना संगे त्या इभागना गव्हर्नर व्हतात. त्यायेन्ह्या यादना बारामा महाराज लिखतस,'पाश्चिमात्य राष्ट्राना त्या गयरमोठ मयदानवर गोरा फलटण कडथाईन मानवंदना लिन्ही असता मी गयरा भारायी गवु. त्या लष्करी अधिकारीस्ना हुकुम आयकुउन्हात तव्हय माल्हे माणिकरावस्ना पहाडी आवीजनी याद उन्ही. गोरी फलटण दकीसन मन्हा डोयास्ना सामने हिंदुस्थानना भावी जवानस्न्या फलटणी दिसाले लागण्यात. आणि आसबी वाटन की, आप्ल राष्ट्र बलवान व्हवा करता तरणा जुवानस्नी बलोपासना कराले जोयजे.
आप्ला राज्यामा माणिकराव हाऊ एक शुर वीररत्न शे येन्हा बारामा महाराजस्ले मनमनमा आभिमान वाटे. त्या सोता मजार मजारमा जुम्मादादा व्यायामशायले भेट करेत. आडनड नी चवकसी करीसन मदत करेत. तसच व्यायाम ना काही परकार तेस्नी माणिकराव येस्ना कडथाइन शिकी लिन्हात. जंबियानी कुस्ती नी फिरंग हायी कठीण इद्या त्या तठेच. शिकणात. माणिकराव ह्या महाराजस्ना जिवलग मयतर व्हतात. तेस्ना मार्फत स्वातंत्र क्रातिकारकास्ना संगे महाराजस्ना संबंध व्हतात.
एक दिन रामपायटामा माणिकराव टांगावर राजमहाल ना रस्ताकडे लालबागना नजीक जायी ह्रायंन्तात तव्हय सामनेथाइन महाराज फिरीसन पाये चालत येतांना दिसनात. टांगाना खाले उतरीसन तेस्नी महाराजस्ले मुजरा कया तव्हय महाराज बोलणात, "माणिकराव काही खास काम नही व्हवाव ते चला संगे, आपीन बोलत जाऊत, पॅलेस मजार जाव्हा वर तेस्न बोलण चालु व्हत तव्हय एक आमेरिकन माणुस भेटाले उन्हा. बोलान ओघमजार तो आमेरीकन माणुस्नी इचार, आप्ला राज्यकारभारले मियणार यश न कोणत कारण शे? माणिकरावस्ना कडे बोट करीसन बोलणात, " आसा निष्ठा वान आणि कर्तबगार लोक मन्हा काम मा मदत करतस. आसा कर्तबगार माणस मन्हा राज्यामा शेत, हायीच आम्हणी खरी ताकद शे. तेस्ना हातमा आम्न यश शे. आम्हना कार्यकुशल आधिकारी माणिकरावस्ना क्रिडांगणवरच तयार व्हयेल शेत. आम्हना माणिकराव म्हणजे तयपती तलवार शे.
महाराज उतरता वयमा पाये पाये फिराना व्यायाम करेत. दिवमा दोन तास पाये पाये फिराले जाव्हा शिवाय तेस्न मन लागे नही. महाबळेश्वर, उटी, नहीते परदेशना रम्यस्थयवर कोठे बी ह्रायन्हात नहीते बोटवर ह्राहेत, तरी बी आप्ला चालाना व्यायाम नित्यनेमनी चालु ठेत. पाये पाये फिराणा व्यायामले त्या धर्म म्हणेत. नादारी नंतर सत्ता नी संपत्ती गयरा धाकल वयमा मियन तरी आखीरलगुन निर्व्यसनी राहिन्हात हायी खास गोट शे.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६