बुधवार, ३१ मार्च, २०२१

📚अहिरानी गझल(बागलानी लहेजा)📚

 🌹गझलवृत्त :-सौदामिनी🌹


📚अहिरानी गझल(बागलानी लहेजा)📚


💘शिकी घे सखी..💘


हिदयले उमजनं शिकी घे सखी

मिठीमा सरमनं शिकी घे सखी


गुलाबी व्हठस्नी फुलायी कळी

हसूले पसरनं शिकी घे सखी


खळी गालनी ती लपाडू नको

जराशी मुलकनं शिकी घे सखी


भिडायी दिरीष्टी मन्ही नजरले

सखाले परखनं शिकी घे सखी


समींदर तुन्हा मी मन्ही तू नदी

मन्हामा मिसळनं शिकी घे सखी


लढावू बनीस्नी चिकाटी धरी

अडचनी उपसनं शिकी घे सखी


तुन्हा देवमा भर खरी भावना

दगडले बदलनं शिकी घे सखी


✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼

नामपूर ता.बागलान जि.नाशिक.

मो.नं.९४२१५०१६९५.

माय मन्ही अहिराणी

 माय मन्ही अहिराणी

 {अखंड काव्य}


मन्हा  मनम्हान पैरे

पैरे मानूसना ध्याने, 

ध्याने अहिराणी गोड 

गोड देवबाना काने..


काने पडस सदोदीन 

सदोदीन ती दिवायी,

दिवायीले जशे लाह्या 

लाह्या ताटोया ववाये..


ववायाले गाना म्हने 

म्हने चैतना पाडाले,

पाडा दुडुदुडु दौडे 

दौडे बोबड बोलाले. 


बोले तान्ह अहिराणी 

अहिराणी भारी गोडी,

गोडी गुयचट बोले

माय माले म्हने माडी.


माडी म्हनताज लागे

लागे मोहरले आंबा, 

आंबा केसरनी चिर 

चिर वाटे वं ग्यानबा


वनश्री पाटील जालना 

काशी कन्या लिव्हस 

काव्य संग्रह

येड्या बाभुई

 🌹येड्या बाभुई🌹

      ********

.....नानाभाऊ माळी


भाउ-बहिनीस्वन!

मानोसनां जलम कोठे आनी कसा व्हयनां?हाउ आल्लग संशोधनां इशय से!मन्हा जलम एकोनिसशे बासष्ठ सालनां से!मन्हा माय-बाप,धल्ला-धल्ली म्हनेतं'तू दुस्कायनां सालनां से! मिलो-जुवारी,सुगडी...परदेशी गहू खावाना जमानानां से!तोंड झोडया दुस्कायनां सालनां से!'भाउस्वन!.. माले आंनबक वाटे!जीव काढ्या दुस्काय कसा व्हयी मंग?🌸


दुस्काय!!!कोल्ला व्हवो का वल्ला...प्रानी जीवनन्ह खल्ली बुड पुसी-पासी चाटी खायी लेस!

आपला देशम्हा 'दुस्काय' हाउ सबद!....तोंडे-व्हटे कायमनां     बठ्ठास्नां आंतकरनंम्हा उज्जी खोल जायी बठेल से!मानसे, जनावरे,पशु-पक्षी,हाड्या-चिडया

या बठ्ठा कोल्ला दुस्कायनी आग म्हा भुंजायी जातस!वल्ला दुस्कायम्हा व्हायी जातस!


कोल्ला दुस्कायम्हा पेवाले पानी ऱ्हात नई!खावालें भाकरनां तुकडा ऱ्हात नई !मानसेस्न पोटनं खड्ड ….खल्ली खोल चिप्पट व्हयी मरत ऱ्हातंस!ढोरे हाडकेस्ना पिंजरा व्हयी जिमीनवर आंग टाकी देतस!पखे गयी हाड्या-चिडया मरतस!जीव व्हड्या...यम धाड्या दुस्काय गिधाडास्न पोट भरत ऱ्हास!🌸


भाउ-बहिणीस्वन!

 दुस्कायम्हा पोटनी आग थंडी व्हवागुंता!शांत व्हवागुंता... मानोस जे भेटी ते नल्लाम्हा टाकी जित्ता ऱ्हास!त्याम्हा मंग तव्हय अमेरिकाथिन येलं लाल मिलो,सडेल गहू,मक्कीन्ही भुकटी दयी-दुयी नल्लानंखाले टाकी मानोस जित्ता ऱ्हायना व्हयी! भाउस्वन!...दुस्कायम्हा आग शांत व्हतं ऱ्हास!पोट भरत ऱ्हास!मानोस मरता-मरता जित्ता ऱ्हास! दुस्कायम्हा तरत ऱ्हास!दुस्काय मांगे सरकत ऱ्हास!🌷


मिलोम्हा आनी गहूस्मा झाडे-झुडे सन्या दुसऱ्या बिय्या-बाय्या भी उन्या व्हतीनं!त्या निवाडी-नावाडी गावं गल्ली फेकी आखो दयी-दुयी कडकढोंन रोट्या नई ते मंग भाकरी पोटनी आग शांत करत व्हयनी व्हयी!...मंग धान्यानां संगे येल बिय्या कथाईन उन्या व्हतीन मंग?...भाउस्वन!.. त्या...कांग्रेस गवत आनी येड्या बाभुईन्या बिय्या सेतीस!🌷


उखल्ला-गावंनां आंगे फेकेल बिय्यामुये.... मव्हरे वावरेस्मा आणि गाव शिवारम्हा जंगले हूबा ऱ्हायी ग्यात!बठ्ठ बिनकामनं जंगल!!पिकं खाऊ जंगल!मातेलं गवत,आनी काटाये येड्या बाभुई न्ह जंगल हूब ऱ्हातं गये!गावं- जंगलेंस्न ...खेतीनं वाटोय व्हत ऱ्हायनं!झाड आनी मानोसनी दोस्ती ऱ्हायनी ते जग सुंदर बनत ऱ्हास!पन मानोस उलगेल आनी झाड भी उचकेल व्हयी ते जगनं काटाये व्हयी जास!🌷


मानोस आनी झाड काटाये जोइजे!..पन बोरनां झाडनांगत!..काटा टोचतस पन बोरे गोड लागतस!तसीच मानोस नं से काटाये बोलनं!..कडु बोलनं मानोसन्हा भलागुंता व्हयी ते चांगलं वाटस!पन गनज झाडे...मानसे निस्ता हेकंयन्हा,बाभुईनां काटांगत ऱ्हातसं!..टोची-टोची आयुष्य गायनी करी टाकतस!

 त्याम्हानाचं एक येड्या बाभूई से... येड्या बाभुईनां झाडे आजगरनांगत गावंलें येटोये मारी ऱ्हायनातं!🌷


बाभुईन्हा..... आल्लग-आल्लग नावे सेतस!कु-बाभुई,गोड्या बाभुई,येड्या बाभुई,सुबाभूळ

एडा वाकडा वाढी-उढी!गावलें जखडी-जूखडी!बुंधडान्हा फांट्यास्वर हेट्या-वऱ्हा व्हाता वारगा संगे... आनकुचीदार काटा दुसरास्ले भेमकाडी नाचत ऱ्हासं!जन-जनावरें ढुकी भी देखतस नई!झाडलें सावली से पन सोतां गुंता से!दुसरालें सावली देवानी नई पन टोची रंगत काढानं!... आशी बिनलाजे हुभ  येड्या बाभुईनं झाड!कु-बाभुई ऱ्हास!बठ्ठा गावंस्ना चौमेरं हागनखड्या,खया,गावनी पडेल जिमिनवर तो बयजबरी घुशेल ऱ्हास!मातेलं ऱ्हास!🌷


जुना मोठल्ला गोड्या बाभुईनां.. धव्व्या काटाये झाडे तोडायी ऱ्हायनात!बकऱ्या-ढोरे त्यान्हा पाला आनी शेंगा बगर-बगर खायी गरायी जायेत!आते येड्या बाभुईनी गावनां बाहेरनी बिनकाम नी हिरवाई टिकाडी ठेयेल से!जिमीनन्हा रस निस्ताचं  व्हडी-व्हडी सोतां वाढि ऱ्हायना!दुसरा झाडेस्ले बाहेर काढी ऱ्हायनां!मानोस्ना छाताडावर उज्जी चढी ऱ्हायनां!लॅटिन भाषा म्हा 'प्रासापीस'नाव लिसनी चाली ऱ्हायना!आशा बेक्कार

काटास्नि हिरवय काय कामनी से मंग?त्यान्हा काटा कव्हय धोतर व्हढतस!धवी चड्डी व्हढतस!पाय म्हाकाटा मुडतस!आंगलें बुथडा खोडतसं!त्यासना मांगे झाडा बठाले जावो ते... तठे फांट्यास्ना काटा आपला,मांडी कुल्लास्ले रंगतेंभोम करी टाकतस!हात पायलें झुलतसं!कव्हय धोतर-धवी कुडची,कोपरी व्हडतस!बाभुईनां काटा पायनी टायनीम्हा घुसतसं!रंगतेंभोम करी टाकतसं!जीव लंल्हाई जास!धल्ला-धल्लीन्ही याद यी जास!डोयांमवरे आजला-आजली दिखाले लागी जातंस!...इतला बेक्कारगान्ना बाभुईनां काटा ऱ्हातंस!येड्या बाभुईनां झाडे उज्जी वाच्चय ऱ्हातंस🌷


येडा बाभुईनं झाड अमेरिकाथिन उनं व्हयी!...गहू,मिलो जुवारीनां संगे उनं व्हयी!...येखलं-दुखलं बिय्यास्ना रूपम्हा उनं व्हयी!आते पुरा भारत देशलें!गावं खेडास्ले आजगरनांगत गुंढयी ऱ्हायनां!काटायी हिरवय उंडी ऱ्हायना!बकऱ्या-ढोरेस्ना तोंडे झुली ऱ्हायना!सोतां मातरं फुली ऱ्हायनां!गावंन्या गटारी,   हागनंखडीस्मा घुसी ऱ्हायना!आनी... आनी मानोस्ले         आनकुचीदार काटा टोची ऱ्हायनां!🌷🌷

     🌷................🌷

......नानाभाऊ माळी,

मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे

ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८

मो.नं.७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-०५फेब्रुवारी२०२१

जीवपेक्षा जास्त जपेल

 जीवपेक्षा जास्त जपेल

घास तोंडे व्हता उना

नको येऊ रे पाणी तु

जीव गळालोक उना


जवय वाट मी तुन्ही देखू

तवय पळे तु दुरदुर

आज पिके नासाडात 

तुले काय उना जोर?


कर्जाना डोकावर मोठा

आभायभर पहाड

पोरनं करान लगीन 

तु माले आज नाड


लेनदेन मन्ह, सोन-चांदी

सार से वावर

आते नको तु पडु

स्वतःले आवर


मनी जिरायती शेती

पिकाडस तिनामा सोन

माय से काळीमाती

हिरवगार माळरान


पिके येथीन चांगला

येनी लागनी होती आस

जगु देरे माले

नको देऊ गळफास


कवी- दिपक भाऊसाहेब चव्हाण

9975663626

आग

 😭😭आग 😭😭

================================

जेव्हा पोटात भुकेची आग

थैमान घालते....

तेव्हा,

आग विझवाया...

फायर ब्रिगेडगत धावून येतात...

दोन्ही डोळ्यातून आसवं.

मग मात्र...

ह्या उदरतृप्त जगाला पेटवून द्यावंसं वाटतं...

पण, करणार काय...ह्या भ्रष्ट जगात...

कारण...

मातलेल्या भ्रष्टाचाराला पाहून... हतबल डोळे,

गुपचूप पिऊन घेतात....

आपल्या ताब्यातलं ते,

खारं खारं पाणी.....

खारं खारं पाणी...

****************************कवी ********

प्रकाश जी पाटील....

........ पिंगळवाडेकर......

********************

हिनं मन्हं नातं📋🖋

 [अहिरानी(खान्देशी) बोली भाषा ]                                  *✒📋आसं हिनं मन्हं नातं📋🖋

कविताना व गावम्हा

हायी सदा झयकस

आठे तठे कविता बी 

          मन्ही आरस मिरस॥धृ॥

हिना मुयेच दुनिया 

देखा माले वयखसं

मन्हा जीवनम्हा हायी

             चमचम चमकस॥१॥

दिवा जसा दिवायीना

नवं साल उजयस

तशी हायी उजयस

              जठे तठे नवाजस॥२॥

हिना बिगर जीवन

नही माले उमजसं

आसं हिनं मन्हं नातं 

           नही मोल त्यानं व्हस॥३॥

सई बहिन जशी का

आशी मनले भिडस

नातं जीवन भरनं

           मन्हा संगे निभाडस ॥४॥

*बालांगण* म्हा रमस

*बहरम्हा*, बहरस

 *शब्दझुला* ना बी देखा

           झोकावर झोका ल्हेस॥५॥

     *--निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

     दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

शब्दार्थ- गावम्हा =गावात, हायी=ही, झयकसं=झळकते,

आठे तठे=इथे तिथे, मन्ही =माझी, आरस मिरस=मिरवते,

हिना मुयेच=हिच्या मुळेच, देखा=पहा, माले=मला, वयखसं=ओळखते, दिवायीना =दिवाळीचा,  साल=वर्ष

उजयसं=उजळते, नवाजसं=नावाजते, उमजस=उमजते, त्यानं=त्याचं, व्हस=होते,होतं, सईबहिन=मैत्रीण, भिडस=पोहचते, जीवन भरनं=जीवन भराचं, निभाडस=निभवते.

       ✒📋🖋   ✒📋🖋   ✒📋🖋

📃✍कशी लिखू कविताले📃✍

 📃✍कशी लिखू कविताले📃✍

नही पेनम्हाबी शाई

नही कागद लिखाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           मनम्हानी कविताले॥धृ॥

मनम्हानी कविताले 

जग दुन्यानी कथाले 

जग दुन्यानी कथाम्हा

              इसरस मी सोताले॥१॥

तालवर ताल हिना

देखा लागना चढाले 

कसा करु व जतन

              मनम्हाना मनोराले॥२॥

गन गन भवरीना 

खेय येस व खेयाले

मन्हा मननं आंगन 

              हिले आपुरं रवाले॥३॥

जीव झाया दमेदम

नही टाईम थांबाले 

कशी लिखू कोठे लिखू 

           जाऊ कोनले सांगाले॥४॥

     *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी  नेहरु नगर, देवपूर, धुळे.

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

लिखाले=लिहायला, लिखू=लिहू, मनम्हानी =मनातली, 

दुन्यानी =दुनियेच्या, कथाले=कथेला, इसरस=विसरते,

सोताले=स्वतःला, हिना=हिचा, देखा=पहा, लागना=लागला,

चढाले = चढायला, गन गन भवरीना=गोल गोल रानी, खेयं=खेळ, खेयाले=खेळायला, रवाले=खेळायला,मन्हा =माझ्या, हिले=हिला, झाया=झाला, थांबाले=थांबायला, कोनले=कुणाला, सांगाले=सांगायला. 

✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍📃✍

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...