बुधवार, ३१ मार्च, २०२१

📚अहिरानी गझल(बागलानी लहेजा)📚

 🌹गझलवृत्त :-सौदामिनी🌹


📚अहिरानी गझल(बागलानी लहेजा)📚


💘शिकी घे सखी..💘


हिदयले उमजनं शिकी घे सखी

मिठीमा सरमनं शिकी घे सखी


गुलाबी व्हठस्नी फुलायी कळी

हसूले पसरनं शिकी घे सखी


खळी गालनी ती लपाडू नको

जराशी मुलकनं शिकी घे सखी


भिडायी दिरीष्टी मन्ही नजरले

सखाले परखनं शिकी घे सखी


समींदर तुन्हा मी मन्ही तू नदी

मन्हामा मिसळनं शिकी घे सखी


लढावू बनीस्नी चिकाटी धरी

अडचनी उपसनं शिकी घे सखी


तुन्हा देवमा भर खरी भावना

दगडले बदलनं शिकी घे सखी


✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼

नामपूर ता.बागलान जि.नाशिक.

मो.नं.९४२१५०१६९५.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...