बुधवार, ३१ मार्च, २०२१

माय मन्ही अहिराणी

 माय मन्ही अहिराणी

 {अखंड काव्य}


मन्हा  मनम्हान पैरे

पैरे मानूसना ध्याने, 

ध्याने अहिराणी गोड 

गोड देवबाना काने..


काने पडस सदोदीन 

सदोदीन ती दिवायी,

दिवायीले जशे लाह्या 

लाह्या ताटोया ववाये..


ववायाले गाना म्हने 

म्हने चैतना पाडाले,

पाडा दुडुदुडु दौडे 

दौडे बोबड बोलाले. 


बोले तान्ह अहिराणी 

अहिराणी भारी गोडी,

गोडी गुयचट बोले

माय माले म्हने माडी.


माडी म्हनताज लागे

लागे मोहरले आंबा, 

आंबा केसरनी चिर 

चिर वाटे वं ग्यानबा


वनश्री पाटील जालना 

काशी कन्या लिव्हस 

काव्य संग्रह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...