मंगळवार, ३० मार्च, २०२१

गाव

 😄🌹गाव 🌹😄

****************************************

भाडं  भीमडीनं  करी

गाव आखाजिले जावो...

न्हई  आयकाले  येस

तुल्हे  मरीमाय  खावो....1

झपाटाम्हा ग्या बदली

गाव खेडाम्हा जमाना...

दाना दुकानम्हा मोजी

घर  आनेत  किराणा ....2

कोठे गर्बडी ग्या सांगा

फिरे चुनाना तो घाना...

दिसे  ठीग्गयनी  चड्डी

आनी धोतरम्हा शाना....3

गाव कोंथाबी रे जावा

न्हई   र्हायनं   गव्हारं...

न्हई  र्हायना  गावम्हा

तेली.. तांबूई..लव्हार....4

कसा  गावभर  फिरे 

रग्गायेल  गावसांडा...

नवा जमानानी कसा

जुना जमानाले कांडा....5

कोंबडीना पखाखाले

जसा बिनधास पील्ला...

तसा  वड  तो सम्हाये 

खाले पारव्हर धल्ला......6

चुल्हा आनी उलचूल

ग्यात म्हणे चारिधाम...

गॅस  नातू तो तेसन्हा

करे  मडकम्हा  काम.....7

मन्हा  गावना  भाईर

हुबा दाटीवाटी खया...

तठे   हंगामबी  ऎके 

टिंगरीना  गोड  गया......8

रोज राम पाह्यराम्हा 

ऱ्हाट  भजे  हरिनाम ...

सांगे  मुर्धुंगले  झांबा 

सुरु  करा  राम..राम......9

रोज  दिम्हईले शाळा 

कशी हाड्यासनी सुटे...

मन्हा  मनना  कनोरा

बासी आठौनीस्मा तुटे..10

धसी ग्यात गावगढ्या

टेका लाई दिसे वाडा...

न्हई डोयास्ले सापडे

न्हानपन्ना  गावगाडा....11

:::::::::::::::::::::::::::::::::::::

********************कवी... प्रकाश जी. पाटील

/////////पिंगळवाडेकर🙏

.................................

🌷बारा किलोमीटरनां फेरा🌷

 🌷बारा किलोमीटरनां फेरा🌷

           ----------------------

भाऊ-बहिनीस्वन!

 कालदिन मंगळवारनां दिन व्हता!नऊ मार्चनां दिन व्हता!....महाशिरवरात्रीलें खुशाल गुडीपाडानं उन पडी ऱ्हायन!डोकालें गमचां बांधी फिरानी पायी येल से!उननांभर ते आखो!... सूर्यदेवनां आंगम्हा भगत घूमी ऱ्हायनां!घाम काढि गंजीफराकम्हा टाकी ऱ्हायनां!डोकालें,आंगलें चटकाडी ऱ्हायनां!🌹


धुयाथिन अमयनेर रस्ते लागो ते आंगे पांगेन्हा...अर्धा-मर्धा गहू कापायी जायेलं दिखनातं!ऱ्हायेलं-सूयेल मशीनन्ही वाट दखी ऱ्हायनातं!मव्हरे ते बरेड- बुरेड नजरे पडेल दिखनं!...      हिव्वर,बाभुईनां झाडे बांधेबांधले नजरे दिखतसं!..मुगामुगा उन झेली हुबा दिख्तस!🌷


 दुपारन्हा  पाह्यरे धुये सोडी मव्हरे अमयनेर पाउत डांबर रस्ता चुल्हा.. तावा चटकाड्या  वाटस!... टरटर आवाज करणाऱ्या गाड्यास्ना टायरे भुंजातं ऱ्हातसं!...मी भी मन्हा याहीस्ना संगे  कालदिन फटफटीवर डबल सीट अमयनेरन्हा जोडे देवगाव    देवळीलें लगीनलें गयथूत! आंगवर दुफारनं उन झेली सोशल डिस्टनसिंगन्ह नेम्मंन पालन करी देड वाजता लगीन लाग्न!...जेवने खावने पहिलेंगचं उरकीलेलं व्हत!🌷


भाऊ बहिनीस्वन!

नवरदेव नवरीलें आशीर्वाद दिसनी!भावी आयुष्य चांगलं एक दुसारलें समायांनं!..मायबापलें नेम्मंन समायानं वचन लिसनी!..ज्या रस्ते गउथूत त्याचं रस्ते मांगे फिरनु व्हतुतं!देवळीथिन निंघनूत अमयनेरनं रेल्वे फाटक लाग्न!जेवनां आंगे उत्तर दिशान्हा रस्ते बोर्ड दिखना व्हता!..."पिंगळवाडे १२कि मी" ....🌷


बोर्ड वाचीसनी एकदम मन्हा मेंदूनी तार चमकनी!....आपुन दररोज दगडनां,चांदी-पित्तयनां! ऱ्हायी-सुयी सोनानां मढायेलं देवनी सक्काय-दुपार!  आखो दिनमावय्यावर मन लायी पूजा करत ऱ्हातसं!...मंग भाऊस्वन!..आपलं मन ज्या जित्ता देववर बठेल ऱ्हास!श्रध्दा बठेल ऱ्हास!त्यांनं दर्शन लिध ते   मुकल पुन्य आपला खातावर जमा व्हत ऱ्हास!मन्हा मनलें वाटी गये!...🌷


  भाऊस्वन!श्रध्दानां देव फुकट थोडी भेटस?कडक तप करनां पडस!हुना रस्ते दुफारनां पाह्यरे मव्हरे जानं पडस!.. बारा किलोमीटरनां वाकडा फेरा करावर देव भेटस!देव मूर्तीम्हा ऱ्हास तसा जित्ता मानोसम्हा भी ऱ्हास!आनी मी ज्या देवलें फेसबुक आनी व्हाट्सएप वर देखी-वाची ऱ्हायंतू!जठे मन्हा भाव बठेल व्हता!त्या भावनानां देव कितला दूर व्हता?...आंगे-पांगे १२कि मी वर! बरं लोके काशी जातस!मथुरा जातस!पंढरपूरलें जातस!मुकला दूर जातस!..भाड तोड खर्च करीस्नि भी देव दूर ऱ्हायी जास!...आपुन खाले हात मांगे फिरी येतस!देव्हारानां देव देव्हारा सोडी बाहेर येतत नयी!आपुन श्रध्दा पूर्वक धोत ऱ्हातसं!मन न्ह मनम्हा ऱ्हायी जास!देव दिखा गुंता हिरदनी काकूंयदि ऱ्हास...धल्ला व्हवा पाउत धोतस!..आपुन वरनां रस्ते चालना जातस!देव मनम्हा ऱ्हायी जास!...आपोरी इच्छा लिसनी!....सरगे चालना जातस!देव काय जोडे येत नई!मोक्षनां आंगे काय जातस नई!देवनं उज्जी कठीन ऱ्हास!वर जावा पाउत येडा पिसा व्हयी जातस पन देव मव्हरे पयेत ऱ्हास!🌷


मन्हा याहीस्ले!चौधरी साहेब यासले सांग"देव्हारानां देव १२कि मी से चालतंस का?"....  मन्हा आननसाठे याहीस्नि फटफटींलें किक्क मारी!....उनन्हा चटका लेत पिंगळवाडालें पोचनुत!मन्हा देव्हारानां देव!देव्हारा सोडी   भक्तलें भेटागुंता!दर्शन देवागुंता च्यार पाच पाउलें मव्हरे चालत उना!....त्या भावनांना देवनं नाव से!...."भाऊसाहेब प्रकाश पाटील पिंगळवाडेकर!"इचार सागरनं नाव से!समाज प्रबोधन करणारा हाऊ देव से!....🌷


लोके गोठा लिख्तस!बनावतसं!....पन ज्यासना बद्दल लिख तेवढं कमी से!....विचारवंत, साहित्यिक, कवी, तत्त्वचिंतक,तर्कशास्त्र, पायलें चटका बठी कायेजथिन बाहेर येणारं सत्य मांडणारा कारलालें गोड करी लेनारा पन चटका बठेलं फफोटानि जित्ती कय बठ्ठास्ना मव्हरे मांडणारा कवी आनी भला माणुस म्हणजे भाऊसाहेब प्रकाशजी पाटील साहेब!🌷


भाऊसाहेब यासन्या कविता डोया नां तलाव बनाडतीस!...तलाव फुगी मव्हरे दुःखानां लवणं   व्हावालें लागस!....कुणबीनं जित्त दुःख कविताम्हा वती टाकतसं!...कविता लांगी बनी विचारन्हा बारा भरत ऱ्हास!डोयालें झुई झुई पाणीनां लवन बनावतस!त्यासनी लेखनी म्हा  इतली ताकद से!त्या सेतस प्रकाश पाटील सर!...शेतकरी कवी सेतस!शेतकरीनं वल्ल दुःख त्याचं मांडू शकतस!....दिनभर घर वावर त्यासना पायखाले येत ऱ्हास!...कोल्ल फुस्कट,भुसकट त्यासनाफांनं सापडाउ नई!...वल्ल जरत ताज सत्य त्यासना कविताम्हा घुसमयत ऱ्हास!....शेतकरी कवी सेतस!...शेतकरीनं दुःख त्याचं मांडू शकतस!...आम्हनांगत सावलीम्हा बठी उनन्हा चटका नई लिख्तस!आम्ही बेपारी कवी सेतस!....पन भाऊसाहेब अस्सल लिख्तस!... त्या लेखक सेतस, उत्तम नट सेतस,कवी सेतस!कलाकार सेतस!बठ्ठासथिन त्या भला मानोस सेतस!तटकतोड बोलतस!....🌷


भाऊस्वन!मन्हा भावनांना समुनंदर तय देखाले ग्या!....तठे मंदिर व्हत!...मानोसनं मंदिर व्हत!मंदिरम्हा श्रद्धानां फुले उमली ऱ्हायंतात!हासी ऱ्हायंतात!... फुलें देवनां आंगवर पडी ऱ्हायतात!...देव प्रसन्न व्हयी भक्तले ग्यान वाटी ऱ्हायंता!भक्तलें थंडगार पानीनां तांब्या भरी अमृद वाटी ऱ्हायंता!देव घर येल भक्तलें च्याहा पाजी ऱ्हायंता!टरबूज कापी खावाडी ऱ्हायंता! आम्ही ओंजळभरी मनन्ही थयली भरी ऱ्हायंतूत!देवलें भेटा गुंता इतला पानीम्हा पडी गयथु की शाल, नारय लयी जावो इतलभी इसरी गयथु!आम्ही प्रकाश पर्व जोडे बठेल व्हतुत!ज्ञान प्रकाश म्हा बुद्धी धोयी ऱ्हायंथु!...पांढुरंगनी द्येल टरबूज खायी ऱ्हायंतुत!आम्ही प्रकाश पाटील सरजीस्ले मनम्हान मन म्हा देव्हाराम्हा बासाडी ऱ्हायंतूतं!बारा किलोमीटरनां वाकडा चक्कर मारी हिरदम्हा अमृद भरी लयी चालनु व्हतूतं!अमृतकुंभ हिरदम्हा ठी मव्हरे निंघनू व्हतुत!महान कवींनं!जित्ता जगता देव नं दर्शन ली निंघनू व्हतुत..🌷

 

भाऊ बहिनीस्वन!...

आखो भेटसुत नवा इशय संगे!...तवलोग राम राम मंडई!राम राम!...🌷

        🌷--------------🌷

नानाभाऊ माळी,

मु पो ता शिंदखेडा, जि धुळे

(ह मु , हडपसर,पुणे-४११०२८)

मो नं ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-१०मार्च २०२१

जागतिक अहिराणी गौरव दिन

 👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑

                *जागतिक अहिराणी गौरव दिन!*

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

                पहिलं विश्व अहिराणी सम्मेलनमा एक ठराव असा व्हता की, *महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती 11 मार्च हाऊ रोज आपुन जागतिक अहिराणी गौरव दिन साजरा करूत!* त्या परमाने या साल फाईन आपुन सयाजी महाराज यासनी जयंती साजरी करी ऱ्हायनूत. हाऊ पहिला जागतिक अहिराणी गौरव दिन से. 

         यांना पयले आम्ही खान्देश हित संग्राम तर्फे गुढीपाडाना रोज अहिराणी दिन साजरा करूत. या दिनन महत्व आसा से. या रोज शालिवाहन राजानी जग दुन्यान पहिलं अहिराणी वाक्य दगडवर कोरी ठेयल से.

*क्षहरात वस निर्वस करस*

        हाऊ 2000 वरीस जुना शीला लेख नाशिकाना पांडव लेण्यासमा से. खरं ते या दिनले अहिराणी दिन मनाडाले जोयजे व्हता. पन आपलाज काही भाऊ बिनकामना गुढीपाडाना संबंध छ संभाजी महाराज यासना शहीद दिनले जोडा. तो भावनिक प्रश्न करा. समाजमा फूट नको म्हणीसन मंग आपुन गुढी पाडा सोडी दिना.

       दुसरा अहिराणी दिन मालेगावमा काही मित्र 3 डिसेंम्बर हाई बहिणाबाई चौधरी यासनी पुण्यतिथीले अहिराणी दिवस साजरा करेत. बहिणाबाई चौधरी यासन नाव आपुन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठले दिसनी त्यासना खूप मोठा सन्मान करेल से. तसज त्यासना ज्या गांना सेत त्या अहिराणी नहीत तावडी भाषामा सेत. म्हणीसंलन मंग अहिराणी भाषाना हाऊ मान दुसरा अहिर मणोसले देवो आस आपुन ठराव. मालेगावकर यासनी ते मान्य कर.

           काही मंडळीसन आस मत व्हत की, अहिराणी दिन आपुन बाशी आखाजीले साजरा करूत. त्यानं कारण त्यारोज गौराईना अहिराणी गांना बाया म्हणतीस. म्हणीसन बाशी आखाजीले लोकवाङ्मय दिन म्हणीसन साजरा करो. आते प्रश्न असा से बाशी आखाजीना नी अहिराणीना संबंध काय? बरं या लोक गीते नुसता आखाजीलेज म्हणतस का? नही. कानबाईले बी म्हणतस, घटयावर बी म्हणतस, लगीनमा बी म्हणतस. लगीनना गाणासना उपमा अलंकार ते काही ईचारु नका. मंग नुसती आखाजीच का? शिवाय आखाजी हाई खान्देशान नव साल से.  हाऊ खूप मोठा आरस्तोल से आखजिना. हाई नवं साल खान्देशमा त्रेताजुग फाईन सुरू से.

          अजून एक अहिराणी दिवस होता. एक महाराजनी लोकेसनी दिशाभूल करिसनी त्यांनी सोतानी जलम तारीख हाऊज अहिराणी दिवस आशी  बोम उठाडी दिनी. 🤣😂 ती काय कोनी पायत नही पन गोंधयमा आंखो एक नवा गोंधय. 

           यांना आभ्यास करा ते *तीन घरे नी तिरपा दारे!* आशी गत व्हती आपली. नी मंग उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळनी 26, 27 नी 28 डिसेंबर 2020 ले 5 खंड नी 27 देशना अहिर एक मजार करात. नी त्यासनी एक जुगमा सयाजी महाराजनी जयंती म्हणजे 11 मार्च हाऊ जागतिक अहिराणी गौरव दिन साजरा करान ठराव. तो पहिला कारेकरम जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद मार्फत आपुन आते 11 मार्च 2021 ले साजरा करी ऱ्हायानुत. आते काही मंडईनी सवाल करा,

*अहिराणी, खान्देश नी महाराजा सयाजीराव गायकवाड यासन संबंद काय?*

१ महाराजा सयाजीराव गायकवाड यासना जलम दक्षिण खान्देशमा म्हणजे कौळांना ता मालेगाव जि नाशिक या अहिराणी पट्टामा व्हयल से. त्यासन मूळ नाव गोपाळ. बडोदाना राणीनी त्यासले दत्तक लेवावर त्यासन नाव बदलीसन सयाजी ठेव.

२ सयाजी महाराज 12 वरीसना व्हयनात तवलोंग त्यासनी कौळांनामा गावड्या चाऱ्यात. तठे त्यासले अहिराणी शिवाय दुसरी भाषा येय नही. त्यासना जिवलग दोस्तार चिंधा भिल संगे त्या भिलाऊ भाषा बी बोलेत. दुष्काय पडना कधी ते महाराज अंगावर लिमना डकसा भांदी गावभर धोंड्या धोंड्या पानी दे करत फिरेत.  बडोदामा जाववर त्या मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकनात. *सयाजी महाराज या शेवटला अहिर राजा व्हतात.* त्यासनी जलमदेती माय उमाबाई नी बाप काशी बाबा यासले मरस्तवलोंग अहिराणी शिवाय दुसरी भाषा उनी नही. त्यासना संगे महाराज कायम अहिराणी भाषा बोलेत. 

३ भारतना खूप मोठा दानी राजा सयाजीराव महाराज व्हतात. त्यासनी डॉ बाबासाहेब आंबेडकर संमत 14 भारतरत्न घडावात. म फुले सावित्रीबाई फुले यासले मदत करी. बनारस हिंदु विद्यापीठ, अलिगढ  मुस्लीम विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था अशा गनज संस्थासले गच्ची आर्थ साहाय्य कर. अस्पृश्यता निवारण, शिक्षण, शेती, बँका, रोजगार, पाणी पुरवठा कला, भाषा, साहित्य, नाटक या क्षेत्रमा खूप काम कर. 

४ *महाराजाना दोस्तार चिंधा भिल त्यासले भेटाले बडोदाना दरबारमा ग्या तवय महाराजनी चिंधा भिलले भर राजदरबारमा बठा दरबारी लोकेसना समुर अहिराणी गाणं म्हणाले लाव. दिवाइले गाय बारसले कान्हदेशमा ते गाणं आज बी म्हणतस*

गाय भिंगरी गाय भिवरी चरस व माता डोंगरी।।धृ।।

गाय भिंगरीन शिंग जस महादेवन लिंग रे बा।

कृष्णानी गाय बरवी दुध भरुन देती चरवी।

उभीच माता तिरवी।।

        मंग शिंगना जागांवर ईतर एक एक अवयव नी दही दूध तूप लोणी लिसनी एक एक कडवं म्हणो. 

 *हाऊ अहिराणीना खूप मोठा आरस्तोल से. सम्राट शालिवाहन नंतर राजदरबरमा अहिराणीना आवडामोठा मान सन्मान दुसरा कोणी करा नही. म्हणीसन सयाजी महाराजनी जयंती जागतिक अहिराणी गौरव दिन म्हणीसनी साजरी कराना संकल्प आपिन करेल से. तो आपुन बठा अहिर एकमझार ईसनी पुरा करूत.* 

         11 मार्चले  गावे गाव नी घरे घर महाराजन चित्र पूजा. शाळा, कालेज, सरकारी हाफीस आठे जागतिक अहिराणी गौरव दिन मनाडूत. राजाना संगे अहिराणी नी अहिराणींना संगे राजा घरेघर भिडाऊत. अहिराणी भाषा नी सयाजी महाराज यासनी मोठाईकी गावेगाव भिडाऊत. आखोर एक गोट आजफाईन सात रोज हारेक अहिराणी ग्रुप वर सयाजी महाराजन चित्र आयडॉल ठेवा.

*जय शिवाजी जय सयाजी!*


*घरेघर संदेश सोनाना खान्देश!*


*आपली भाषा आपली वाणी।*

*अहिराणी माय अहिराणी।।*

जय कान्हदेश!

👑🇭🇰🙏🏻📚👑 बापू हटकर.

👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑

ता क - हाई बठीकडे फॉरवर्ड करा. फेसबुकवर टाका!

हायी खान्देसनी रानी

 हायी खान्देसनी रानी

अभिमानी मी आन्डेर

मन्हा धुयानी धुयानी 

नही आसा अभिमान 

         देखा कोठे दुनियानी॥धृ॥

मन्ही कविता फुलनी

आशी माटी से मयानी

दूर दूर फुलीसनी

           देखा किर्ती समायनी॥१॥

वाट झायी आपुरी वं

माले धरती मायनी

वाट देखा चाली गवू

             मीबी पुरी आभायनी॥२॥

खान्देसनी राजधानी 

राजभाषा अहिरानी 

मन्ही अहिरानी झायी

            देखा आशी राजरानी॥३॥

आशी कोनती से बोली

हिना सारखी वं रानी

म्हनीसनी म्हनतस

       हिले *हायी* से वं *रानी*॥४॥

    [हायी रानी-अहिरानी]

सब्दे हिना एक एक 

आख्या हिरासन्या खानी

मन्हा संगे दुनियानी

             करी हिनी वाखाननी॥५॥

      *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

_______________________________________

फुलनी=फुलली, माटी=माती, आन्डेर= मुलगी, कन्या, फुलीसनी=फुलून,समायनी=सामावली, झायी=झाली, मयानी=मायेची, म्हनीसनी=म्हणून, म्हनतस=म्हणतात. हिले=हिला, हायी=ही

से=आहे, सब्दे =शब्द, हिना=हिचे, आख्या=सगळ्या, हिरासन्या =हिर्यांच्या, खानी=खाणी

_______________________________________

मन्ही अहिरानी बोली

 ▫️मन्ही अहिरानी बोली▫️

बोल लाखना मोलना

मन्ही खान्देशी बोलनी

बोली खडी साखरनी

         अहिरानी वं बोलनी॥धृ॥

ल्ह्यारे अहिरानी बोली

मराठीले जोडीसनी

एक गलीम्हा र्हातीन

         सया बैनी म्हनीसनी॥१॥

हिनी शिकाडं बोलाले

माय भाऊ म्हनीसनी

हिना बठ्ठा भाऊबंद

          हिले परका न कोनी ॥२॥

गोडी हिनी काय सांगू 

जशी पोयी पुरननी

नित् गोडच बोलनी

              पुरनम्हा घोयीसनी॥३॥

गोडी हिनी खान्देसले

पुरीसनी बी उरनी

काय खान्देसले हायी 

          आख्खी दुन्या फिरी उनी॥४॥

    *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*,  मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

शब्दार्थ : मन्ही =माझी, ल्ह्यारे = घ्यारे, जोडीसनी =जोडून, गलीम्हा =गल्लीत, र्हातीन=राहतील, सया बैनी=मैत्रिणी, हिनी=हिने, शिकाड=शिकवलं, म्हनीसनी =म्हणून, हिले=हिला, पोयी पुरननी=पुरणाची पोळी, घोयीसनी=घोळून-मिसळून, पुरीसनी =पुरूनही, उरनी=उरली, आख्खी =सर्व-सगळी, दुन्या =दुनिया,

फिरी उनी=फिरुन आली.

  ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

बोलो तंस वागत निंघी जावो

 बोलो तंस वागत निंघी जावो

    🌷----------------🌷

.....नानाभाऊ माळी


भाऊ बहिनीस्वन!

काही मानसे माणूसपन लिसनी जगत ऱ्हातसं!चांगला इचार पह्येरी जगतं मव्हरे जात ऱ्हातसं!बोलतस तसा वागतं ऱ्हातसं!मन मनम्हा जायी बठी ऱ्हातंस!हिरदलें पटी तंसचं जगत ऱ्हातंसं!...अश्या गनज आशीर्वादनां फुलें देनारा महानुभाव आपला आंगेपांगे नशीबथिन भेटत ऱ्हातसं!🌷


काहीस्ना पायवर फुले टाकी पूजा करो!अश्या पूजनीय,वंदनीय जेठा मोठा ह्या जगम्हा भेटत ऱ्हातंस!त्यास्ना इचार गय्यरा बुद्धीलें

पटा जोगता ऱ्हातंस!            भाउस्वन!...हायी जग न्यामिंन सुंदर से!उज्जी आल्लग से!   ऊसनां रस से!मधाय से!गोड से! कमळ-गुलाबनं फुल से!डोयांनं पारंनं फिटस इतलं सुंदर से!मातरं सुंदरतांनी वयख लागालें जोइजे!बुद्धीनां खोल खड्डाम्हा उतरालें जोइजे!बुद्धीलें तान देवालें जोइजे!तव्हय कोटे सुंदरतांनां आंगे पोहचतंस!आपलं मन हाशी खुशी ऱ्हायनं!धीरधरी.. दुःखलें टिपरं धरी दूर तंगांडत ऱ्हायनं!ते बल्ला इतलं मोठं दुःखलें तोंड दि, मव्हरे सुखन्ह भूगलं नजरे पडतं ऱ्हास!🌷


भाऊ बहिनीस्वन!

आपुन सुखनां भूगला बनाडंतं ऱ्हावो!दुःखलें लामीनम्हा तंगाडतं ऱ्हावो!बठ्ठा आटा-फाटास्ले जोगे बलावतं ऱ्हावो!त्यास्नाघायी  सुखन्ह्या माया बनायी आखो  देव्हाराम्हा सुंदरफुलेस्ना साज चढावतं ऱ्हावो!जग सुंदर व्हत ऱ्हायी!मन सुंदर व्हत ऱ्हायी!मन मनम्हा अमृद संगयेत ऱ्हायी!थेंब थेंब दुन्यालें वाटत ऱ्हावो!जग दुन्यानां आशीर्वाद संगेसंगे लयी फिरो!त्या आशीर्वादस्न ऋण रुपी वझ कायम उतारतं ऱ्हावो!     त्याम्हा भारी सुखून भेटस!    आननं भेटत ऱ्हास!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

आथान्या तथान्या दुसरासन्या उलट्या उडतीन उतारा पेक्ष्या  लोकेस्ना कामे येवो!सुख दुःखलें दवडी जावो!दुसरास्न कनभर दुःख हालकं करालें भेटनं ते आपलं कर्म संमजी पयेत जावो!आपला जीव धाकला से!जीवन धाकलं से!कालावधी कमी से!आपला खाताम्हा येयेलं दिन कमी सेतस!भाऊस्वनं!...कमी दिनम्हा आपले चांगलं आनी मुकलं काम करी जानं से!🌷


धन दौलत व्हयी ते गरीबदुब्या गुंता थोडंफार मदतनां मोक्या सोडी देवो!इतलां भी लोभी व्हवो नयी ते बठ्ठ मालेच भेटो!..इतला भी कंजूस व्हवो नयी गरीब खाले हाते दारवरथींनं मव्हरे चालना जायी!कर्म आनी नशीबन्हा भागे आपला पदरे मुकल भेटेल ऱ्हास!...कष्ट आनी चांगला आशीर्वाद त्यांमांगे ऱ्हातंस!दान म्हा मोठी ताकद से!...मनन्ही तयारी लागस तव्हय हातम्हायीन सुटस!.....तव्हय हात वाटत ऱ्हातंस!...🌷


भाऊ बहिनीस्वन!

गरीब व्हयी ते लोकेस्ना कामे पडो!..रात दिन याद ऱ्हायी इतला कामे पडो!तुम्हनां दारे बलावर नारस्नि लाईन लागालें जोइजे!आपले नई!...आपलं काम लोके वयखतंस!...दारे येतस!....बलायी-बलायी कामलें लावतंस!..आखो मुखे हिरदथिन मुकला आशीर्वाद दि जातस!....अश्या लोके कायम दुन्यानां मनम्हा!...नजरम्हा ऱ्हातंस!लोकेस्ना दारे कायम सुख नां रोपे लावत ऱ्हावो!मव्हरे रोपेस्ना झाडे सावली देतस!..फय-फयावळ देतस!🌷


आपले देवबानी टाइम नेमी द्येल से!टाइम सरावर बठ्ठा हिशोब करी  बयतंनं संगे बांधी लयी जाना से!बयावर लोके उब्यानां ईस्तोकडे दखथिन!राखकडे नजर टाकथिन!...चांगला-वाईट बोल मनम्हा ठी घरेघर चालना        जाथिन!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

मानोस कायमन्हा निंघी जावावर मांगे त्यांनी किर्ती ऱ्हायी जास!किर्ती त्यांना कामन्ही वयख ऱ्हास!....आपले आपली वयख तयार करनी से!डोयांस्ना आंसू पुसी हासू लंयन से!...हासूनं सुख दुन्यालें वाटतं मव्हरे अशीच एक दिन निंघी जानं से!.....🌷

           🌷---------------🌷

......नानाभाऊ माळी,

मु पो ता शिंदखेडा जि धुळे( ह मु हडपसर, पुणे-४११०२८)

मो नं ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-१३मार्च२०२१

तुन्हा बिगर रे मना

✴तुन्हा बिगर रे मना✴

मन्हा व्हयीसनी माले

कसा नही रे दिसना

सांग माले एक डाव

         कोठे दपी तू बसना॥धृ॥

मन्हा संगेच हासना

मन्हा संगेच रुसना

लपाछपी मन्हा संगे 

         सांग बा रे खेयसना॥१॥

धुंडी उनू घरभर

नही कोठेच दिसना 

तुले देखाना करता

         जीव मन्हा तरसना॥२॥

मन्हा कलेजाम्हा र्हास 

नही तरी बी दिसना 

डोया लायीनी बसनू

       मंग दिसना दिसना॥३॥

नही दिसना तरी बी

माले समजी तू उना

रस्ता जीवनना मन्हा

        तुन्हा बिगर से सुना ॥४॥

    --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे

शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...