मंगळवार, ३० मार्च, २०२१

जागतिक अहिराणी गौरव दिन

 👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑

                *जागतिक अहिराणी गौरव दिन!*

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

                पहिलं विश्व अहिराणी सम्मेलनमा एक ठराव असा व्हता की, *महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती 11 मार्च हाऊ रोज आपुन जागतिक अहिराणी गौरव दिन साजरा करूत!* त्या परमाने या साल फाईन आपुन सयाजी महाराज यासनी जयंती साजरी करी ऱ्हायनूत. हाऊ पहिला जागतिक अहिराणी गौरव दिन से. 

         यांना पयले आम्ही खान्देश हित संग्राम तर्फे गुढीपाडाना रोज अहिराणी दिन साजरा करूत. या दिनन महत्व आसा से. या रोज शालिवाहन राजानी जग दुन्यान पहिलं अहिराणी वाक्य दगडवर कोरी ठेयल से.

*क्षहरात वस निर्वस करस*

        हाऊ 2000 वरीस जुना शीला लेख नाशिकाना पांडव लेण्यासमा से. खरं ते या दिनले अहिराणी दिन मनाडाले जोयजे व्हता. पन आपलाज काही भाऊ बिनकामना गुढीपाडाना संबंध छ संभाजी महाराज यासना शहीद दिनले जोडा. तो भावनिक प्रश्न करा. समाजमा फूट नको म्हणीसन मंग आपुन गुढी पाडा सोडी दिना.

       दुसरा अहिराणी दिन मालेगावमा काही मित्र 3 डिसेंम्बर हाई बहिणाबाई चौधरी यासनी पुण्यतिथीले अहिराणी दिवस साजरा करेत. बहिणाबाई चौधरी यासन नाव आपुन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठले दिसनी त्यासना खूप मोठा सन्मान करेल से. तसज त्यासना ज्या गांना सेत त्या अहिराणी नहीत तावडी भाषामा सेत. म्हणीसंलन मंग अहिराणी भाषाना हाऊ मान दुसरा अहिर मणोसले देवो आस आपुन ठराव. मालेगावकर यासनी ते मान्य कर.

           काही मंडळीसन आस मत व्हत की, अहिराणी दिन आपुन बाशी आखाजीले साजरा करूत. त्यानं कारण त्यारोज गौराईना अहिराणी गांना बाया म्हणतीस. म्हणीसन बाशी आखाजीले लोकवाङ्मय दिन म्हणीसन साजरा करो. आते प्रश्न असा से बाशी आखाजीना नी अहिराणीना संबंध काय? बरं या लोक गीते नुसता आखाजीलेज म्हणतस का? नही. कानबाईले बी म्हणतस, घटयावर बी म्हणतस, लगीनमा बी म्हणतस. लगीनना गाणासना उपमा अलंकार ते काही ईचारु नका. मंग नुसती आखाजीच का? शिवाय आखाजी हाई खान्देशान नव साल से.  हाऊ खूप मोठा आरस्तोल से आखजिना. हाई नवं साल खान्देशमा त्रेताजुग फाईन सुरू से.

          अजून एक अहिराणी दिवस होता. एक महाराजनी लोकेसनी दिशाभूल करिसनी त्यांनी सोतानी जलम तारीख हाऊज अहिराणी दिवस आशी  बोम उठाडी दिनी. 🤣😂 ती काय कोनी पायत नही पन गोंधयमा आंखो एक नवा गोंधय. 

           यांना आभ्यास करा ते *तीन घरे नी तिरपा दारे!* आशी गत व्हती आपली. नी मंग उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळनी 26, 27 नी 28 डिसेंबर 2020 ले 5 खंड नी 27 देशना अहिर एक मजार करात. नी त्यासनी एक जुगमा सयाजी महाराजनी जयंती म्हणजे 11 मार्च हाऊ जागतिक अहिराणी गौरव दिन साजरा करान ठराव. तो पहिला कारेकरम जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद मार्फत आपुन आते 11 मार्च 2021 ले साजरा करी ऱ्हायानुत. आते काही मंडईनी सवाल करा,

*अहिराणी, खान्देश नी महाराजा सयाजीराव गायकवाड यासन संबंद काय?*

१ महाराजा सयाजीराव गायकवाड यासना जलम दक्षिण खान्देशमा म्हणजे कौळांना ता मालेगाव जि नाशिक या अहिराणी पट्टामा व्हयल से. त्यासन मूळ नाव गोपाळ. बडोदाना राणीनी त्यासले दत्तक लेवावर त्यासन नाव बदलीसन सयाजी ठेव.

२ सयाजी महाराज 12 वरीसना व्हयनात तवलोंग त्यासनी कौळांनामा गावड्या चाऱ्यात. तठे त्यासले अहिराणी शिवाय दुसरी भाषा येय नही. त्यासना जिवलग दोस्तार चिंधा भिल संगे त्या भिलाऊ भाषा बी बोलेत. दुष्काय पडना कधी ते महाराज अंगावर लिमना डकसा भांदी गावभर धोंड्या धोंड्या पानी दे करत फिरेत.  बडोदामा जाववर त्या मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकनात. *सयाजी महाराज या शेवटला अहिर राजा व्हतात.* त्यासनी जलमदेती माय उमाबाई नी बाप काशी बाबा यासले मरस्तवलोंग अहिराणी शिवाय दुसरी भाषा उनी नही. त्यासना संगे महाराज कायम अहिराणी भाषा बोलेत. 

३ भारतना खूप मोठा दानी राजा सयाजीराव महाराज व्हतात. त्यासनी डॉ बाबासाहेब आंबेडकर संमत 14 भारतरत्न घडावात. म फुले सावित्रीबाई फुले यासले मदत करी. बनारस हिंदु विद्यापीठ, अलिगढ  मुस्लीम विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था अशा गनज संस्थासले गच्ची आर्थ साहाय्य कर. अस्पृश्यता निवारण, शिक्षण, शेती, बँका, रोजगार, पाणी पुरवठा कला, भाषा, साहित्य, नाटक या क्षेत्रमा खूप काम कर. 

४ *महाराजाना दोस्तार चिंधा भिल त्यासले भेटाले बडोदाना दरबारमा ग्या तवय महाराजनी चिंधा भिलले भर राजदरबारमा बठा दरबारी लोकेसना समुर अहिराणी गाणं म्हणाले लाव. दिवाइले गाय बारसले कान्हदेशमा ते गाणं आज बी म्हणतस*

गाय भिंगरी गाय भिवरी चरस व माता डोंगरी।।धृ।।

गाय भिंगरीन शिंग जस महादेवन लिंग रे बा।

कृष्णानी गाय बरवी दुध भरुन देती चरवी।

उभीच माता तिरवी।।

        मंग शिंगना जागांवर ईतर एक एक अवयव नी दही दूध तूप लोणी लिसनी एक एक कडवं म्हणो. 

 *हाऊ अहिराणीना खूप मोठा आरस्तोल से. सम्राट शालिवाहन नंतर राजदरबरमा अहिराणीना आवडामोठा मान सन्मान दुसरा कोणी करा नही. म्हणीसन सयाजी महाराजनी जयंती जागतिक अहिराणी गौरव दिन म्हणीसनी साजरी कराना संकल्प आपिन करेल से. तो आपुन बठा अहिर एकमझार ईसनी पुरा करूत.* 

         11 मार्चले  गावे गाव नी घरे घर महाराजन चित्र पूजा. शाळा, कालेज, सरकारी हाफीस आठे जागतिक अहिराणी गौरव दिन मनाडूत. राजाना संगे अहिराणी नी अहिराणींना संगे राजा घरेघर भिडाऊत. अहिराणी भाषा नी सयाजी महाराज यासनी मोठाईकी गावेगाव भिडाऊत. आखोर एक गोट आजफाईन सात रोज हारेक अहिराणी ग्रुप वर सयाजी महाराजन चित्र आयडॉल ठेवा.

*जय शिवाजी जय सयाजी!*


*घरेघर संदेश सोनाना खान्देश!*


*आपली भाषा आपली वाणी।*

*अहिराणी माय अहिराणी।।*

जय कान्हदेश!

👑🇭🇰🙏🏻📚👑 बापू हटकर.

👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑🇭🇰📚👑

ता क - हाई बठीकडे फॉरवर्ड करा. फेसबुकवर टाका!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...