मंगळवार, ३० मार्च, २०२१

बोलो तंस वागत निंघी जावो

 बोलो तंस वागत निंघी जावो

    🌷----------------🌷

.....नानाभाऊ माळी


भाऊ बहिनीस्वन!

काही मानसे माणूसपन लिसनी जगत ऱ्हातसं!चांगला इचार पह्येरी जगतं मव्हरे जात ऱ्हातसं!बोलतस तसा वागतं ऱ्हातसं!मन मनम्हा जायी बठी ऱ्हातंस!हिरदलें पटी तंसचं जगत ऱ्हातंसं!...अश्या गनज आशीर्वादनां फुलें देनारा महानुभाव आपला आंगेपांगे नशीबथिन भेटत ऱ्हातसं!🌷


काहीस्ना पायवर फुले टाकी पूजा करो!अश्या पूजनीय,वंदनीय जेठा मोठा ह्या जगम्हा भेटत ऱ्हातंस!त्यास्ना इचार गय्यरा बुद्धीलें

पटा जोगता ऱ्हातंस!            भाउस्वन!...हायी जग न्यामिंन सुंदर से!उज्जी आल्लग से!   ऊसनां रस से!मधाय से!गोड से! कमळ-गुलाबनं फुल से!डोयांनं पारंनं फिटस इतलं सुंदर से!मातरं सुंदरतांनी वयख लागालें जोइजे!बुद्धीनां खोल खड्डाम्हा उतरालें जोइजे!बुद्धीलें तान देवालें जोइजे!तव्हय कोटे सुंदरतांनां आंगे पोहचतंस!आपलं मन हाशी खुशी ऱ्हायनं!धीरधरी.. दुःखलें टिपरं धरी दूर तंगांडत ऱ्हायनं!ते बल्ला इतलं मोठं दुःखलें तोंड दि, मव्हरे सुखन्ह भूगलं नजरे पडतं ऱ्हास!🌷


भाऊ बहिनीस्वन!

आपुन सुखनां भूगला बनाडंतं ऱ्हावो!दुःखलें लामीनम्हा तंगाडतं ऱ्हावो!बठ्ठा आटा-फाटास्ले जोगे बलावतं ऱ्हावो!त्यास्नाघायी  सुखन्ह्या माया बनायी आखो  देव्हाराम्हा सुंदरफुलेस्ना साज चढावतं ऱ्हावो!जग सुंदर व्हत ऱ्हायी!मन सुंदर व्हत ऱ्हायी!मन मनम्हा अमृद संगयेत ऱ्हायी!थेंब थेंब दुन्यालें वाटत ऱ्हावो!जग दुन्यानां आशीर्वाद संगेसंगे लयी फिरो!त्या आशीर्वादस्न ऋण रुपी वझ कायम उतारतं ऱ्हावो!     त्याम्हा भारी सुखून भेटस!    आननं भेटत ऱ्हास!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

आथान्या तथान्या दुसरासन्या उलट्या उडतीन उतारा पेक्ष्या  लोकेस्ना कामे येवो!सुख दुःखलें दवडी जावो!दुसरास्न कनभर दुःख हालकं करालें भेटनं ते आपलं कर्म संमजी पयेत जावो!आपला जीव धाकला से!जीवन धाकलं से!कालावधी कमी से!आपला खाताम्हा येयेलं दिन कमी सेतस!भाऊस्वनं!...कमी दिनम्हा आपले चांगलं आनी मुकलं काम करी जानं से!🌷


धन दौलत व्हयी ते गरीबदुब्या गुंता थोडंफार मदतनां मोक्या सोडी देवो!इतलां भी लोभी व्हवो नयी ते बठ्ठ मालेच भेटो!..इतला भी कंजूस व्हवो नयी गरीब खाले हाते दारवरथींनं मव्हरे चालना जायी!कर्म आनी नशीबन्हा भागे आपला पदरे मुकल भेटेल ऱ्हास!...कष्ट आनी चांगला आशीर्वाद त्यांमांगे ऱ्हातंस!दान म्हा मोठी ताकद से!...मनन्ही तयारी लागस तव्हय हातम्हायीन सुटस!.....तव्हय हात वाटत ऱ्हातंस!...🌷


भाऊ बहिनीस्वन!

गरीब व्हयी ते लोकेस्ना कामे पडो!..रात दिन याद ऱ्हायी इतला कामे पडो!तुम्हनां दारे बलावर नारस्नि लाईन लागालें जोइजे!आपले नई!...आपलं काम लोके वयखतंस!...दारे येतस!....बलायी-बलायी कामलें लावतंस!..आखो मुखे हिरदथिन मुकला आशीर्वाद दि जातस!....अश्या लोके कायम दुन्यानां मनम्हा!...नजरम्हा ऱ्हातंस!लोकेस्ना दारे कायम सुख नां रोपे लावत ऱ्हावो!मव्हरे रोपेस्ना झाडे सावली देतस!..फय-फयावळ देतस!🌷


आपले देवबानी टाइम नेमी द्येल से!टाइम सरावर बठ्ठा हिशोब करी  बयतंनं संगे बांधी लयी जाना से!बयावर लोके उब्यानां ईस्तोकडे दखथिन!राखकडे नजर टाकथिन!...चांगला-वाईट बोल मनम्हा ठी घरेघर चालना        जाथिन!🌷


भाऊ-बहिनीस्वन!

मानोस कायमन्हा निंघी जावावर मांगे त्यांनी किर्ती ऱ्हायी जास!किर्ती त्यांना कामन्ही वयख ऱ्हास!....आपले आपली वयख तयार करनी से!डोयांस्ना आंसू पुसी हासू लंयन से!...हासूनं सुख दुन्यालें वाटतं मव्हरे अशीच एक दिन निंघी जानं से!.....🌷

           🌷---------------🌷

......नानाभाऊ माळी,

मु पो ता शिंदखेडा जि धुळे( ह मु हडपसर, पुणे-४११०२८)

मो नं ७५८८२२९५४६

        ९९२३०७६५००

दिनांक-१३मार्च२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...