▫️मन्ही अहिरानी बोली▫️
बोल लाखना मोलना
मन्ही खान्देशी बोलनी
बोली खडी साखरनी
अहिरानी वं बोलनी॥धृ॥
ल्ह्यारे अहिरानी बोली
मराठीले जोडीसनी
एक गलीम्हा र्हातीन
सया बैनी म्हनीसनी॥१॥
हिनी शिकाडं बोलाले
माय भाऊ म्हनीसनी
हिना बठ्ठा भाऊबंद
हिले परका न कोनी ॥२॥
गोडी हिनी काय सांगू
जशी पोयी पुरननी
नित् गोडच बोलनी
पुरनम्हा घोयीसनी॥३॥
गोडी हिनी खान्देसले
पुरीसनी बी उरनी
काय खान्देसले हायी
आख्खी दुन्या फिरी उनी॥४॥
*--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
शब्दार्थ : मन्ही =माझी, ल्ह्यारे = घ्यारे, जोडीसनी =जोडून, गलीम्हा =गल्लीत, र्हातीन=राहतील, सया बैनी=मैत्रिणी, हिनी=हिने, शिकाड=शिकवलं, म्हनीसनी =म्हणून, हिले=हिला, पोयी पुरननी=पुरणाची पोळी, घोयीसनी=घोळून-मिसळून, पुरीसनी =पुरूनही, उरनी=उरली, आख्खी =सर्व-सगळी, दुन्या =दुनिया,
फिरी उनी=फिरुन आली.
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा